AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तालिबानींची आता महिलांच्या बोलण्यावरही बंदी, पर-पुरुषाकडे नुसते बघितले तरी दंड होणार

अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीने महिलांच्या बोलण्यावरही बंदी लादली आहे. अलिकडे अफगाणिस्तानात महिलांच्या आवाजाच्या सार्वजनिक वापरावर देखील बंदी होती. याशिवाय महिलांनी त्यांच्या संपूर्ण शरीराला झाकणं बंधनकारक करण्यात आले आहे.

तालिबानींची आता महिलांच्या बोलण्यावरही बंदी, पर-पुरुषाकडे नुसते बघितले तरी दंड होणार
| Updated on: Aug 25, 2024 | 12:34 PM
Share

तालिबान त्यांच्या कट्टरवादासाठी कुप्रसिद्ध आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येऊन आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान तेथील महिलांवरील अत्याचारात वाढच होत आहे. तालिबानने अलिकडेच नवा कायदा पास केलेला आहे. या कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक जागी संपूर्ण शरीराला झाकणे बंधनकारक आहे..यात चेहऱ्याचा देखील समावेश आहे. या नवीन कायद्याप्रमाणे महिलांचा आवाज हा देखील खाजगी मानला जाईल. त्या आवाजाला सार्वजनिक जागी ऐकण्यास देखील मनाई आहे. या नियमामुळे महिलांना कोणतेही गाणे म्हणणेच काय तर सार्वजनिक ठिकाणी बोलणेही महागात पडू शकते. याशिवाय महिलांना गैर पुरुषाशाकडे पाहण्यासाठी देखील मनाई करण्यात आली आहे.

सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी या निर्णयासंदर्भात बुधवारी कायदा पास केला. या कायद्यांतर्गत सार्वजनिक परिवहन, संगीत, शेव्हींग आणि उत्सव सारख्या दैनंदिन जीवनातील नित्य व्यवहारांना देखील सामील केले गेले आहे.या नवीन फतव्यानूसार महिलांना पर – मुस्लीम पुरुष आणि महिलांच्या समोर स्वत:ला संपूर्ण झाकावे लागले.या शिवाय कायद्यात हे स्पष्ट केलेले आहे की महिलांना पातळ, पारदर्शक आणि तंग कपडे देखील परिधान करायला नकोत असा दंडक आहे. हे नियम पाळले नाही तर महिलांना दंड आणि शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.

संयुक्त राष्ट्र संघटनेचे काय म्हणणे

संयुक्त राष्ट्र संघटनेने य तालिबानी नियमांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारचे नियम आणि कायदे महिलांना आणि तरुणींचे जीवन अधिक संकटात टाकतील. आंतरराष्ट्रीय समदायाने या मुद्यांचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. कारण हा केवळ अफगाणिस्तानी महिलांच्या अधिकारांचा विषय नसून मानवी अधिकारांचे देखील उल्लंघन असल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे.

Follow Us
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा