विद्यार्थ्याने केले शाळेच्या नियमाचे उल्लंघन, शिक्षिकेने फोन सरळ पाण्यात टाकला

शाळेत मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी असते. एखाद्याने हा नियम मोडला तर त्या विद्यार्थ्याला शिक्षकालाही होते. शाळेत मोबाईल घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्याला चीनमधील शिक्षिकेने जी शिक्षा केली त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

विद्यार्थ्याने केले शाळेच्या नियमाचे उल्लंघन, शिक्षिकेने फोन सरळ पाण्यात टाकला
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 5:31 PM

Teacher submerges student’s phones in water : शाळेत शिकणार्‍या मुलांचा अभ्यास चांगला व्हावा यासाठी त्यांना अनेक नियम आणि अटींचे पालन करावे लागते. सध्याचे युग हे टेक्नॉलॉजीचे (technology) असून लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांकडेच मोबाईल (mobile) असतो. लहान मुलंही सर्रास मोबाईल वापरतात. पण जवळपास सर्वच शाळांमध्ये मुलांना शाळेत फोन घेऊन जाण्यास बंदी असून, ते पकडले गेल्यास त्यांना दंड भरावा लागतो तसेच पालकांकडेही तक्रार केली जाते. चीनमध्‍ये शाळेतील विद्यार्थ्‍याकडे फोन सापडल्‍यावर त्यांच्या शिक्षकाने वेगळीच शिक्षा दिली. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या गुइझोउ प्रांतातील एका माध्यमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या नियमांचे उल्लंघन केले. ते शाळेत मोबाईल घेऊन आले, तेव्हा त्यांच्या टीचरने त्यांना अतिशय कठोर शिक्षा केली. ही शिक्षा त्या मुलांच्या शारिरीक आरोग्यासाठी हानिकारक नव्हती पण पालकांच्या आर्थिक आरोग्यासाठी ती अतिशय वाईट होते.

विद्यार्थ्यांचा फोन पाण्यात टाकला

शाळेतील घटनेचा व्हिडिओ चिनी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की वर्गात पाण्याचे छोटे बेसिन ठेवण्यात आले असून त्यामध्ये फोन बुडवले आहेत. एकापाठोपाठ एक विद्यार्थी येऊन आपले मोबाईल या पाण्यात टाकत आहेत. ही घटना मिंग्या शाळेतील आहे, जिथे एका शिक्षकाने सांगितले की, शाळेत फोन आणण्यास कडक बंदी आहे. याशिवाय प्रेमसंबंध, स्मोकिंग आणि मद्यपान यावरही कडक कारवाई केली जाते.

भडकले लोक

विद्यार्थ्यांनी शाळेत फोन आणल्यास तो नष्ट केला जाईल, असा करार पालकांनी मान्य केल्याचेही सांगण्यात आले आहे. फोन फेकून दिल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर चांगला परिणाम होणार नसल्याने तो पाण्यात बुडवला जात आहे. मात्र या घटनेवर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. पैसे काय झाडावर उगवतात असे शाळेला वाटते का, असा सवालही काही लोकांनी विचारला आहे. तर एका युजरने असा सल्ला दिला की शाळेद्वारे हे फोन जप्त करून नंतर परत देता येऊ शकतात ना. अशा प्रकारे शाळा स्वतःच कायदा मोडत आहे. अशी कमेंटही लोकांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.