AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्त्रायकडून लेबनानवर भीषण हल्ला, तीन पत्रकारांचा मृत्यू

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र हे युद्ध सुरू असतानाच आता इस्त्रायलकडून दक्षिणी लेबनानवर हल्ला करण्यात आला आहे.

इस्त्रायकडून लेबनानवर भीषण हल्ला, तीन पत्रकारांचा मृत्यू
LebanonImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 28, 2026 | 10:10 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र हे युद्ध सुरू असतानाच आता इस्त्रायलकडून दक्षिणी लेबनानवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये तीन लेबनानच्या पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिला पत्रकराचा समावेश आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इस्त्रायलकडून आपल्या हल्ल्यावेळी एक पत्रकाराच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आलं. हे पत्रकार या ठिकाणी हिजबुल्लाह संदर्भातील बातम्यांचं वृत्तांकन करण्यासाठी आले होते. लेबनानचे राष्ट्रपती जोसेफ औन यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार दक्षिणी लेबनानमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत ज्या पत्रकारांचा मृत्यू झाला आहे, ते पत्रकार हिजबुल्लाह समर्थक चॅनलचे पत्रकार असल्याची माहिती समोर येत आहे. अली शोएब आणि फातिमा फक्तोनी असं या घटनेत मृत्यू झालेल्या पत्रकारांचं नाव आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या तिसऱ्या पत्रकाराचं नाव अद्याप समोर आलेलं नाहीये. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा हे सर्व पत्रकार रिपोर्टिंग करत होते, अशी माहिती समोर येत आहे.

इस्त्रायली सैन्याने नेमकं काय म्हटलं?

ज्या पत्रकारांचा या घटनेत मृत्यू झाला आहे ते पत्रकार हे हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे एजेंट होते, असा आरोप इस्त्रायलकडून करण्यात आला आहे. या संदर्भात इस्त्रायलच्या सैन्यांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, त्यामध्ये हा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात मारले गेलेले व्यक्ती पत्रकार नसून ते हिजबुल्लाहचे एजेंट होते, ते या संघटनेला गुप्त माहिती पुरवण्याचं काम करयाचे असा आरोप इस्त्रायलकडून करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर आता लेबनानमध्ये वातावरण चांगलचं तापलं आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. इस्त्रायलकडून सामान्य लोकांचा बळी घेतला जात असल्याचा आरोप लेबनानच्या प्रशासनाने केला आहे. तर इस्त्रायलने मात्र हे लोक हिजबुल्लाहचे समर्थक असल्याचं म्हटलं आहे.

Follow Us
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?