दहा कानशिलात लगावण्यासाठी ८१ हजारांचे बक्षिस, या बिझनेसमनने का दिली अशी ऑफर ?
मुलाचे अपराध पोटात घालणारे अनेक पालक आपण पाहिले असतील, परंतू एका पित्याने वाईट मार्गाला लागलेल्या आपल्या मुलाला धडा शिकवण्यासाठी आणि सूनेला न्याय मिळवून देण्याची अनोखे चॅलेंज दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.

एक थायलंडच्या एका बिझनेसमनने आपल्या विवाहित मुलानने एका अन्य महिलेशी संबंध ठेवल्याने त्याला त्याच्या संपत्तीतून बेदखल केले आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार थायलंडच्या चुम्फॉन प्रांतातील सर्वात मोठ्या डुरियन बाग आणि गोदामाचे मालक ६५ वर्षीय अर्नोन रोडथॉन्ग यांनी आधी त्यांच्या मुलगा ज्या महिलेशी अनैतिक नात्यात आहे त्या महिलेला दहा कानशिलात लगावण्यासाठी ८१ हजारांचे बक्षिस ठेवले होते.
वास्तविक रोडथॉन्ग यांचा मुलगा चाई याचे लग्न झाले आहे. त्यांना एक मुलगी आहे. परंतू लग्नानंतर चाई याने दुसऱ्या एका महिलेशी संबंध ठेवले होते. त्यानंतर चाईने त्याच्या पत्नीला बंदूक दाखवत धमकावले आणि घर सोडून जाण्यासाठी धमकावले. रोडथॉन्ग यांच्या मते, ज्या महिलेच्या प्रेमात चाई वेडा झाला आहे, ती आधी त्यांच्या नातवाला डेट करत होती.
बिझनेसमन रोडथॉन्ग यांनी घोषणा केली की जो त्या महिलेला किमान १० कानाखाली खेचेल त्याला ते ३० हजार बाट ( सुमारे ८१ हजार रुपये ) बक्षिस म्हणून देतील. रोडथॉन्ग यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘लँग सुआन जिल्ह्यातील जो कोणी या महिलेला कानशिलात मारेल त्याला ३० हजार बाट मिळतील. परंतू किमान १० तरी कानाखाली माराव्या लागतील.काम पूर्ण झाल्यानंतर त्याने माझ्याकडे यावे.’
पोलिसांचा दंड भरण्यासही तयार
रोडथॉन्ग यांनी हे ही सांगितले की कानखाली मारणाऱ्यांवर पोलिसांनी जर दंड केला तर त्याचीही भरपाई आपण करु, कायदेशीर कारवाई झाली तर त्यातून त्याची सुटका करण्यासाठी आपण तयार आहोत. रोडथॉन्ग यांनी म्हटले की ही पोस्ट मी माझ्या निर्दोष सूनेला न्याय मागण्यासाठी केली आहे. मात्र, नंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली.
रोडथॉन्ग यांनी नंतर खुलासा करताना सांगितले की माझ्या हिंतचिंतकांनी या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी हिंसेचा मार्ग न स्विकारण्याचा सल्ला मला दिला. त्यामुळे आपण हे चॅलेज मागे घेत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की आपण आपल्या मुलाशी अससेले सर्व नाते समाप्त केले आहे. त्याच्या नावावर केलेली संपत्ती देखील आपण सून आणि आपल्या नातवाच्या नावे केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
