सर्वात मोठा खुलासा, शेख हसीना अजूनही बांगलादेशच्या पंतप्रधान?

बांगलादेशमध्ये कोटा विरोधात आंदोलन हिंसक झाल्यानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला. त्यानंतर त्यांनी भारताकडे आश्रय मागितला. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असल्याचं लष्करप्रमुखांनी जाहीर केले होते. पण आता शेख हसीना यांच्या मुलांनं नवा दावा केला आहे.

सर्वात मोठा खुलासा, शेख हसीना अजूनही बांगलादेशच्या पंतप्रधान?
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 3:37 PM

बांगलादेशवर लागोपाठ 15 वर्षे राज्य करणाऱ्या शेख हसीना यांना देशातील हिंसक आंदोलनामुळे देश सोडावा लागलाय. बांगलादेशमध्ये नवं अंतरिम सरकार ही स्थापन झालं आहे. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन हे नवं सरकार बनवण्यात आलं आहे. पण या दरम्यान शेख हसीना यांच्या मुलाने मोठा खुलासा केला आहे. शेख हसीना यांचा मुलगा सबीब वाझेद यांनी सांगितले की, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलेला नाही. शेख हसीना यांचा हा मुलगा वॉशिंग्टनमध्ये राहतो. सजीब वाझेद जॉय यांनी शनिवारी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. बांगलादेशात आंदोलन जेव्हा हिंसक झालं तेव्हा लष्कर प्रमुखांनी शेख हसीना यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. इतकंच नाही तर त्यांना देश सोडून जाण्यास ही सांगण्यात आलं. सध्या शेख हसीना या दिल्लीत सुरक्षित ठिकाणी आहेत. सध्या भारताने त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे.

अधिकृतपणे राजीनामा दिला नाही

शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद यांनी रॉयटर्सला सांगितले की, “माझ्या आईने कधीही अधिकृतपणे राजीनामा दिला नाही. त्यांना त्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यांना निवेदन देऊन राजीनामा सादर करायचा होता. मात्र तोपर्यंत विरोधकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यास सुरुवात केली होती. त्यांच्याकडे खूप कमी वेळ होता. माझ्या आईला सामानही नेता आले नाही.

सजीब वाझेद पुढे म्हणाले की, ‘राज्यघटनेनुसार त्या अजूनही बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. लष्करप्रमुख आणि विरोधी नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपतींनी संसद विसर्जित केली असली तरी, पंतप्रधानांनी औपचारिकपणे राजीनामा न देता काळजीवाहू सरकारच्या स्थापनेला ‘कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते’.

अवामी लीग निवडणूक लढवणार

शेख हसीना यांचा अवामी लीग पक्ष पुढील निवडणुका लढवेल, असेही वाजेद म्हणाले. ‘मला विश्वास आहे की अवामी लीग सत्तेवर येईल. नाही तर आम्ही विरोधी पक्षात बसू. हसीनाच्या विरोधक खालिदा झिया यांच्या विधानाचे कौतुक केले, ज्यात त्यांनी बदला न घेण्याबाबत बोलले होते. वाजेद म्हणाले, ‘जे होऊन गेले ते विसरा, असे खालिदा झिया यांचे विधान ऐकून मला खूप आनंद झाला.’ ते पुढे म्हणाले, ‘भूतकाळ विसरू या. सूडाचे राजकारण करू नये. एकत्र काम करावे लागेल. बांगलादेशमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी आणि लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी बीएनपीसोबत काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेख हसीना खटल्यासाठी तयार

अवामी लीगच्या उमेदवार असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, याचा नक्की विचार करू. यासोबतच आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार खटल्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ‘माझी आई कधीच अटकेच्या धमकीला घाबरली नाही. माझ्या आईने काहीही चूक केलेली नाही. फक्त तिच्या सरकारमधील लोकांनी बेकायदेशीर गोष्टी केल्या, याचा अर्थ माझ्या आईने आदेश दिला असे नाही. निदर्शने दरम्यान लोकांना गोळ्या घालण्याची परवानगी देण्यास सरकारमधील कोण जबाबदार आहे हे त्यांनी सांगितले नाही.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.