धडाम, धाड, धाड… मध्यरात्री पाठोपाठ भीषण स्फोट, थेट तेल डेपोला भीषण आग! आकाशात धुराचे आगीचे लोट

अमेरिकेने कालच म्हटले होते की, आम्ही इराणवर अत्यंत मोठा हल्ला करणार आहोत. खरोखरच इराणच्या विमानतळांसह अन्य काही भागात अमेरिकेकडून मोठा हल्ला करण्यात आला, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली.

धडाम, धाड, धाड... मध्यरात्री पाठोपाठ भीषण स्फोट, थेट तेल डेपोला भीषण आग! आकाशात धुराचे आगीचे लोट
US attacks on oil tankers and airports
| Updated on: Mar 08, 2026 | 9:15 AM

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले आहे. 28 फेब्रुवारीला अचानक इराणवर मोठा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आला. त्यानंतर इराणकडूनही असे काही हल्ले करण्यात आले आणि इस्त्रायल आणि अमेरिकेला सळो की पळो करून सोडले. इराणी युद्धनाैकेवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर थेट इराणने इस्त्रायलमध्ये असलेल्या परमाणू ठिकाणांवर हल्ला करण्याची धमकी दिली. मोठे हल्ले इस्त्रायवर करण्यात आले. समोर अमेरिकेसारखी ताकद असतानाही इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानताना दिसत नाहीये. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मध्यरात्री मोठा हल्ला करणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर अमेरिका आणि इस्त्रायलकडून अत्यंत घातक हल्ला इराणवर करण्यात आला. तेहरानमध्ये हा मोठा हल्ला अमेरिकेने केला. या हल्ल्यानंतर मोठे नुकसान झाले.

इराणची राजधानी तेहरानवर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने मेहराबाद विमानतळाला बॉम्ब हल्ले केले. विमानाच्या इंधन डेपोवरही हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर मोठा धमका झाला. इराणच्या तेहरानमध्ये अमेरिकेने थेट तेल डेपोवर हल्ला करत आग लावली. यानंतर आकाशात धूर पसरला. आग मोठी भडकली आणि फक्त धूरच दिसत होता.

या हल्ल्यानंतर आखाती देशांवरील हल्ले इराणकडून वाढवण्यात आली. दुबईमध्ये मोठे हल्ले इराणकडून करण्यात आली. युएईने म्हटले आहे की, ते इराणकडून येणारी क्षेपणास्त्रे रोखत आहेत. युएईच्या अध्यक्षांनी म्हटले युद्धानंतर देश अधिक मजबूत आणि समृद्ध होईल. अमेरिकेच्या दूतावासावरही मोठा हल्ला करण्यात आला.

अमेरिकेने केलेल्या इंधन डेपोवरील हल्ल्यानंतर मोठे नुकसान इराणचे झाल्याची माहिती मिळत आहे. तेहरान शहर अमेरिका आणि इस्त्रायलच्या सुरूवातीपासूनच निशाण्यावर आहे. त्यामध्येच आता थेट हल्ले करण्यात आली. आता या हल्ल्याचा बदला इराण नक्की कसा घेतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. इतके मोठे हल्ले होत असतानाही इराण हार मानताना दिसत नाही. इराणमधील काही धक्कादायक व्हिडीओ सतत पुढे येत आहेत. लहान मुलांनाही गंभीर दुखापत या हल्ल्यामध्ये होत आहे.

Follow Us