सर्वच ताडासारखे लांब सडक… कमावतात वर्षाला 82 कोटी, जगातलं आगळंवेगळं कुटुंब पाहिलं काय?
या फॅमिलीतील प्रत्येक जण ताडामाडासारखा वाढला आहे.या कुटुंबातील आई-वडील आणि त्यांची मुले सगळीच सहा फुटांपेक्षा अधिक उंच आहेत.

तुम्ही नेहमीच ऐकले असेल की मुलांची उंची त्यांच्या आई-वडीलांच्या उंचीवर अवलंबून असते. परंतू काही प्रकरणात मुलांची उंची त्यांच्या आई-वडीलांपेक्षा जास्त उंच असते. परंतू अमेरिकेतील एका कुटुंबातील सर्वांची उंची अगदी ताडामाडासारखी आहे. या कुटुंबातील सर्वच लोक ६ फूटांपेक्षा जास्त उंच आहेत. यामुळे या कुटुंबाला सहा फुटी परिवार असे म्हटले जाते. हे लोक दरवर्षी ८२ कोटी रुपये कमावतात. यांच्या कमाईची पद्धतही आश्चर्यकारक आहे.
अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे राहणारे टेमारा कुटुंब अलिकडे सोशल मीडियावर ‘सर्वात उंच कुटुंब’ म्हणून गाजत आहे.या कुटुंबातील सदस्यांची उंची ६ फूट ३ इंचापासून ते ६ फूट १० इंचापर्यंत आहे. हेच त्यांच्या प्रसिद्धीचे आणि कमाईचे साधन बनले आहे. या कुटुंबातील सर्वात चर्चित व्यक्ती ६ फूट २ इंच उंचीची मारी टेमारा आहे. तिचे इंस्टाग्रामवर ३० लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि वार्षिक सुमारे १० मिलियन डॉलर ( सुमारे ८२ कोटी ) तिची कमाई आहे. परंतू मारी कुटुंबातील सर्वात उंच नाही. तर तिचा मोठा भाऊ ट्रॉय याची उंची ६ फूट १० इंच आहे. आणि शेनची उंची ६ फूट ९ इंच आहे. दोन्ही बास्केटबॉल खेळाडू राहिलेले आहेत, आणि कमाईत एकमेकांची प्रतिस्पर्धी आहे. ट्रॉय वर्षाला १ लाख डॉलर कमावत आहेत तर शेन ५० हजार डॉलर कमावत आहे.
आई-वडील बनले इंटरनेट स्टार
मारी हीची आई क्रिस्टीन ( ६३ वर्ष, उंची ६ फूट ५ इंच ) ही आधी इमर्जन्सी ऑपरेटर म्हणून काम करायची. आता ऑनलाईन पुरुषांच्या बुटांचे ( युके साईज १३ ) फोटो विकून चांगली कमाई करते. मारीचे वडील मायकल ( ६५ वर्ष, उंची ६ फूट ३ इंच ) आधी इलेक्ट्रीएशन होते. आता कुटुंबाच्या कंटेन्ट प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊन वर्षाला ५० हजार डॉलर कमावत आहेत. मारी म्हणते की त्यांचे बालपण आर्थिक दृष्ट्या खडतर होते. आई-वडीलांनी नेहमीच मुलांच्या गरजांना प्राधान्य दिले. परंतू स्वत:साठी कधी जास्त पैसे खर्च केले नाही. त्यामुळे त्यांना आता आर्थिकदृष्ट्या सुरक्षित कुटुंबाला पाहून सर्वाधिक आनंद वाटतो आहे.
सुमारे चार वर्षांपूर्वी मारीने तिची एक लाख डॉलर वार्षिक पगाराची नोकरी सोडून OnlyFans वर काम सुरु केले. सुरुवातीला ती एकटी व्हीडीओ तयार करायची. परंतू आई-वडील आणि भाऊ नेहमीच बॅकग्राऊंडला दिसायचे किंवा मदत करायचे.
येथे पाहा पोस्ट –
View this post on Instagram
‘टॉल फॅमिली’ ची लोकप्रियता
हळूहळू मारीने त्यांनाही छोट्या-छोट्या स्किट्समध्ये सामील करणे सुरु केले. सर्वांनी विना तक्रार तयारी दाखवली. आईला हे मजेदार वाटले, तर वडीलांना हसु आले आणि भावांनी आव्हानाचे रुपात हे स्वीकारली. पहिल्या व्हिडीओत कुटुंबाने आपली उंचीची तुलना करत सर्वात उंच ते सर्वात छोटे ( जे वास्तविक उंचच होते ) असे ओळीने उभे रहात पोझ दिली. नंतर एका व्हिडीओत त्यांनी हे दाखवले की त्यांची उंची जास्त असल्याने सर्वसाधारण फर्निचर त्यांना कसे पुरेसे पुरत नाही असे दाखवले, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. आता हे कुटुंब ‘टॉल फॅमिली ऑनलाईन’ नावाने प्रसिद्ध आहेय त्यांच्या व्हिडीओतील उंचीमुळे येणाऱ्या मजेदार अडचणींना दाखवले जाते. जसे उंचावर ठेवलेली एखादी वस्तू सहज काढणे. दरवाजाच्या चौकटीला धडकणे, छोट्या कारमध्ये बसताना येणारी अडचण, या शिवाय डान्स,प्रॅक्स आणि रोजचे अनुभव मजेदार अंदाजात सादर केले जातात.
