AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शत्रू देशाशी गुप्त चर्चा, गोपनीय कागदपत्रे लिक… कोण आहेत एशली टेलिस?, घरातून काय काय सापडलं?

अमेरिकेतून खळबळजनक माहिती पुढे येताना दिसतंय. अमेरिकेच्या संरक्षण विभागाची अति संवेदनशिल माहिती लीक केल्याचा आरोप आहे. हेच नाही तर हेरगिरीचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या घरात काही धक्कादायक कागदपत्रे मिळाली असून त्याने चीनच्या अधिकाऱ्यांची अनेकदा भेटही घेतली.

शत्रू देशाशी गुप्त चर्चा, गोपनीय कागदपत्रे लिक... कोण आहेत एशली टेलिस?, घरातून काय काय सापडलं?
ashley tellis
| Updated on: Oct 15, 2025 | 10:48 AM
Share

अमेरिकेमध्ये मोठी खळबळ उडाली असून अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने धक्कादायक खुलासा केला. भारत आणि दक्षिण आशियावरील प्रसिद्ध तज्ज्ञ अ‍ॅशले टेलिस यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आली. गोपनीय माहिती चीनला देत त्यांनी चीनच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका देखील केल्या. हेच नाही तर आतापर्यंत ते वारंवार चीनच्या अधिकाऱ्यांना भेटत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या घरात काही हैराण करणारी कागदपत्रे देखील मिळाली आहेत. अ‍ॅशले टेलिस यांनी परराष्ट्र खात्यात वरिष्ठ सल्लागार आणि युद्ध विभागमध्ये कंत्राटदार म्हणून काम केले. 64 वर्षीय अ‍ॅशले टेलिस यांचा जन्म भारतात झाला आणि ते आता भारतीय-अमेरिकन नागरिक आहेत. 200 पासून ते परराष्ट्र खात्याचे सल्लागार म्हणून काम करत आहेत.

अ‍ॅशले टेलिस यांच्या घराची झडती घेतली असता ‘टॉप सिक्रेट अँड सिक्रेट’ असे लिहिलेले एक हजाराहून अधिक कागदपत्रे मिळाली. यापेक्षाही खळबळजनक बाब म्हणजे यामध्ये अमेरिकन हवाई दलाच्या क्षमता, शस्त्रास्त्र प्रणाली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धोरणात्मक तंत्रज्ञानाची माहिती असलेले कागदपत्रे आढळली आहेत. यामुळे आता अमेरिकेची सुरक्षा यंत्रणात धास्तावली आहे.

12 सप्टेंबर 2025 रोजी टेलिस यांनी त्यांच्या सहकाऱ्याला काही कागदपत्रे मागितली. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी त्यांनी लष्करी विमान क्षमतांचे अमेरिकन हवाई दलाचे कागदपत्रे प्रिंट काढून घेतली. त्यामुळेच त्यांच्यावरील संशय वाढत गेला आणि ते सुरक्षा यंत्रणेच्या संशयाच्या भोवऱ्यात आले. अहवालानुसार, टेलिस गेल्या काही वर्षांत अनेक वेळा चिनी अधिकाऱ्यांशी भेटले. व्हर्जिनियामधील एका रेस्टॉरंटमध्ये चिनी अधिकाऱ्यांसोबत ते यापूर्वी भेटले.

हेच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार, यादरम्यान  त्यांच्या हातामध्ये एक लिफाफा देखील होता. त्या लिफाफ्यात नेमके काय होते, याबद्दल माहिती मिळू शकली नाही. आता त्याबद्दल तपास केला जातोय. 11 एप्रिल 2023 रोजी चिनी अधिकारी इराण चीन संबंध आणि नवीन उदयोन्मुख लष्करी तंत्रज्ञानावर चर्चा त्यांनी केली. या प्रकरणाबद्दल न्याय विभागाने म्हटले की, टेलिसवर राष्ट्रीय संरक्षण माहिती बेकायदेशीरपणे साठवून ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

मुळात म्हणजे टेलिस हे 2001 पासून अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात कार्यरत आहेत. भारत-अमेरिका संरक्षण सहकार्यावर सल्ला देण्यासाठी वारंवार त्यांना बोलावले जाते. भारतावरील एक मान्यताप्राप्त तज्ञ ते बनले. टेलिस यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या घरात मिळालेल्या कागदपत्रांमुळे अमेरिकेची झोप उडालीये. एफबीआय आणि युद्ध विभागाचे पथक टेलिस यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाची कोणती माहिती चीनला दिली, याचा तपास करत आहेत. खरोखरच कोणती संवेदनशील माहिती देण्यात आली का? याबद्दल अजून काही खुलासा होऊ शकला नाहीये.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.