ट्रम्प-पुतिन यांच्यापैकी कोण पॉवरफुल? मिटींगपूर्वी हात मिळवताच तुम्ही ओळखाल!
अमेरिका आणि रशिया हे जगातील सर्वात प्रबळ देशांपैकी आहे. या दोन देशांवर इतर देशांची गणित अवलंबून आहेत. असं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन 15 ऑगस्टला भेटणार आहे. त्यामुळे या भेटीची चर्चा रंगली आहे.

अमेरिकेच्या कठोर धोरणांमुळे संपूर्ण जगावर त्याचे विपरीत परिणाम होताना दिसत आहेत. भारत आणि अमेरिकेत गेली अनेक वर्षे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या स्वभावाने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. दुसरीकडे, रशियाकडून तेल खरेदीवरही अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे भारत दुहेरी कोंडीत सापडला आहे. असं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांची भेट 15 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे दोन बलाढ्य देशांच्या नेत्यांच्या भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. ही भेट अलास्कामध्ये होणार आहे. दोन्ही नेते अल्मेंडॉर्फ-रिचर्डसन लष्करी तळावर पहिल्यांदा भेटतील. या बैठकीपूर्वी दोन्ही नेते एकमेकांना हस्तांदोलन करतील आणि त्यानंतर चर्चेसाठी टेबलवर बसतील. ट्रम्प आणि पुतिन यांचं हस्तांदोलन कायमच चर्चेत राहिलं आहे. दोघांची हस्तांदोलनाची स्टाईल वेगवेगळी आहे.डोनाल्ड ट्रम्प पॉवरप्ले स्टाईलमध्ये समोरच्या व्यक्तीशी हस्तांदोलन करतात. तर रशियाचे राष्ट्रपती पुतिन लो ग्रिप स्टाईलमध्ये हस्तांदोलन करतात.
पॉवरप्ले आणि लो ग्रिप हँडशेकमध्ये फरक काय?
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पहिल्यांदा विराजमान झाल्यानंतर त्यांनी समोरच्या व्यक्तीसोबत आक्रमकपणे हस्तांदोलन केल्याचं दिसून आलं. 2017 मध्ये डोनाल्ड ट्रम्प हस्तांदोलन स्टाईलमुळे चर्चेत आले होते. हस्तांदोलन करताना समोरीला व्यक्तीच्या हाताला झटका दिल्यासारखं करतात. त्यामुळे या हस्तांदोलनाला पॉवरप्ले असं नाव दिलं गेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा जापानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांना अशा पद्धतीने हस्तांदोलन केलं होतं. त्यामुळे शिंजो आबे यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ट्रम्प साधारणत: समोरील व्यक्तीला 17 सेकंद हस्तांदोलन करतात. तसेच हात दाबून ठेवतात.
दुसरीकडे, पुतिन यांचं हस्तांदोलन लो ग्रिप आहे. ते समोरच्या व्यक्तीला अगदी अलगद हात पकडून हस्तांदोलन करतात. पुतिन हात मिळवताना हँड ओव्हर हँड पॉलिसी वापरतात. म्हणजेच समोरच्या व्यक्तीचा हात खाली आहे आणि पुतिनचा हात वर असतो. या माध्यमातून ते मी समोरच्यापेक्षा वर आहे आणि नियंत्रणात आहे असं दर्शवतात. 2019 मध्ये, जपानमध्ये झालेल्या G20 बैठकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन हे भेटले होते. तेव्हा असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तांदोलनासाठी पॉवर प्ले स्टाईलचा वापर केला. तसेच ट्रम्प यांनी पुतिन यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. तसेच पुन्हा भेटण्याचं मान्य केलं होतं. पण त्यानंतर पुन्हा कधीच भेटले नाहीत. आता ट्रम्प आणि पुतिन पुन्हा सहा वर्षांनी भेटत आहेत. त्यामुळे या भेटीची चर्चा रंगली आहे. टॅरिफ वॉर दरम्यान त्यांच्या हस्तांदोलनाची चर्चा रंगली आहे.
