AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डील मान्य करा, अन्यथा सर्वकाही .., ट्रम्प यांचा इराणला गर्भित इशारा, इस्लामाबादला शेवटचा डाव

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शेवटचा इशारा दिला आहे. इराणला आता कोणतीही दया दाखविली जाणार नाही. जर त्यांनी शांतता करार केला नाही, तर जे काही आवश्यक असेल ते करणे हे माझे कर्तव्य असेल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

'डील मान्य करा, अन्यथा सर्वकाही .., ट्रम्प यांचा इराणला गर्भित इशारा, इस्लामाबादला शेवटचा डाव
mojtaba and trump
| Updated on: Apr 19, 2026 | 9:17 PM
Share

अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी ( 19 एप्रिल 2026 ) इराणला संपूर्णपणे नष्ट करण्याची धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की इराणला आता सोडता कामा नये. ते लवकरच आणि सहज झुकतील आणि त्यांनी समझोता केला नाही तर त्यांना तो अवश्य करावा लागेल. आणि तो करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. जे गेल्या ४७ वर्षांत इतर राष्ट्राध्यक्षांनी करायला हवे होते. आता वेळ आली आहे की इराणच्या किलिंग मशीनचा अंत व्हावा.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर शेअर केली पोस्ट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी १९ एप्रिल रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर करुन इराणला मोठा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ईराणवर सीजफायरचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत म्हटले की इराणने काल शनिवारी ( १८ एप्रिल ) स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये गोळीबार केला. हा आमच्या दरम्यान झालेल्या सीजफायरचे संपूर्णपणे उल्लंघन आहे. यापैकी अनेक गोळ्या एका फ्रान्सच्या जहाजाला आणि युकेच्या एका मालवाहू जहाजाच्या (Freighter) दिशेने डागल्या होत्या. हे योग्य नव्हते, बरोबर ना?’

ते पुढे म्हणाले की माझे प्रतिनिधी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे जात आहेत. ते उद्या सोमवारी ( २० एप्रिल २०२६ ) सायंकाळपर्यंत चर्चेसाठी पोहचतील. ‘

होर्मुझच्या नाकेबंदीने इराणचे होत आहे नुकसान- ट्रम्प

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, इराणने अलिकडेच घोषणा केली होती की तो होर्मुझ स्ट्रेटला बंद करत आहे, जे खूपच अजब गोष्ट आहे. कारण आमची नाकेबंदीमुळे होर्मुझ आधीच बंद झाली आहे. जे काही न समजता आमची मदतच करत आहेत. आणि या बंद रस्त्याने सर्वात जास्त प्रत्येक दिवशी ५०० दशलक्ष डॉलरचे नुकसान त्यांचेच होत आहे! अमेरिकेचे यातून काही नुकसा होत नाहीए.’

त्यांनी सांगितले की वास्तविक अनेक जहाज या वेळी अमेरिकेच्या टेक्सास, लुइसियाना आणि अलास्काच्या दिशेने जात आहेत. जेथे ते लोडिंग करत आहेत. हे सर्व IRGC च्या मुळे होत आहे.जे नेहमी ताकतवान दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आम्ही निष्पक्ष आणि योग्य प्रस्ताव ठेवत आहोता – डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प म्हणाले की आम्ही एक खूपच निष्पक्ष आणि योग्य समझोता सादर करत आहोत आणि मला आशा आहे की ते यास स्वीकार करतील, कारण जर त्यांनी असे केले नाही तर अमेरिका इराणच्या प्रत्येक एक पॉवर प्लाट आणि पुलाला उद्धवस्त करु, आता आणखी सहन केले जाणार नाही. ते लवकरच सहज शरण येतील आणि आता ती वेळ आली आहे की इराणच्या किलिंग मशीनचा अंत व्हावा !

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...