AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran – Israel War : इराण वि. इस्रायल- अमेरिका युद्धात ‘हा’ देश ठरणार बळीचा बकरा ? ट्रम्पच्या धमकीने टांगती तलवार

इराण-अमेरिका युद्धाने जागतिक राजकारणात खळबळ उडवली आहे. ट्रम्प यांनी इराणचे नेते मारले गेल्याचे घोषित करत युद्ध समाप्तीची भाषा केली, पण नाटो देशांच्या असहकारामुळे ते संतापले आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नाटो देशांना दबाव आणण्याकरिता ते युक्रेनला शस्त्रपुरवठा थांबवण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे आधीच युद्धग्रस्त युक्रेनला मोठा फटका बसू शकतो. ट्रम्प यांनी नाटोला 'कागदी वाघ' संबोधत बाहेर पडण्याची धमकीही दिली होती.

Iran - Israel War : इराण वि. इस्रायल- अमेरिका युद्धात 'हा' देश ठरणार बळीचा बकरा ? ट्रम्पच्या धमकीने टांगती तलवार
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Apr 02, 2026 | 8:17 AM
Share

अमेरिका-इस्रायलने संयुक्तरित्या इराणवर केलेल्या हल्ल्याला 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर हल्ला चढवण्यात आला, इराणकडूनही चोख प्रत्युत्र देण्यात आल्यावर युद्धाचा रणसंग्राम पेटला. याच पार्श्वभूमीवरव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ विधान केलं. इराणचे जवळपास सर्वच वरिष्ठ नेते, अधिकारी मारले गेले आहेत. युद्ध संपण्याच्या समीप आलं आहे असं ते म्हणाले. एकीकडे ते युद्ध संपण्याची भाषआ करत असतानाचा ट्रम्प हे नाटो समूहातील इतर साथीदर देशांवर प्रचंड भडकले आहेत. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नाटो देशांनी अमेरिकेला एकापाठोपाठ एक धक्के दिले आहेत, ज्यामुळे ट्रम्प खवळले असून त्यांनी नाटोमधून बाहेर पडण्याची धमकीही दिली.

मात्र आता या सर्वांचा फटका एका लहान देशाला बसू शकतो, असे वृत्त समोर येत आहे. तो देश म्हणजे युक्रेन. गेल्या चार वर्षांपासून रशियासोबत युद्ध करत असलेला युक्रेन आता इराणच्या युद्धात बळीचा बकरा बनू शकतो. वृत्तांनुसार, युरोपीय देशांवर दबाव आणण्यासाठी ट्रम्प युक्रेनला होणाऱ्या शस्त्रपुरवठ्यावर बंदी घालण्याचा विचार करत आहेत.

फायनान्शिअल टाइम्समधील एका वृत्तानुसार, ट्रम्प यांनी अलीकडेच युक्रेनला होणारा शस्त्रपुरवठा थांबवण्याची धमकी दिली होती. सूत्रांच्या मते, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेला मदत करण्याकरिता पाश्चात्य राष्ट्रांवर दबाव आणणे, हा ट्रम्प यांच्या धमकीचा उद्देश आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे वक्तव्य नाटोच्या मित्र राष्ट्रांसाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे असं मत विश्लेषकांनी मांडलं.

अनेक देशांचा झटका

नाटो देशांकडून मिळालेल्या झटक्यानंतर ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे. फ्रान्स, स्पेन आणि इटलीसह अनेक देशांनी ट्रम्प यांना, (अमेरिकेला) त्यांचे तळ वापरण्यास नकार देऊन मोठा धक्का दिला. एवढंच नव्हे तर अनेक पाश्चात्य राष्ट्रांनीही ट्रम्प यांच्या योजनेत सहभागी होण्यास नकार दिला, ज्याअंतर्गत त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली होती. हा काही आपला लढा नाही, असा युक्तिवाद करत युरोपीय देशांनी याला विरोध दर्शवला होता.

जगातील सर्वात महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक असलेली होर्मुजची सामुद्रधुनी, ही अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, सुरू झालेल्या युद्धामुळे बंद झाली. त्यातून जाणाऱ्या अनेक जहाजांना इराणने आत्तापर्यंत टार्गेट केलं असून परिणामी जगभरात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आता ही सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे जोरदार प्रयत्न करत आहेत.

नाटो म्हणजे कागदी वाघ

तेव्हापासून ट्रम्प यांनी सातत्याने नाटो देशांवर टीका केली आहे. मी नाटोचे सदस्यत्व संपुष्टात आणण्याचा विचार करत आहे, असं ते ‘टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. नाटोपासून वेगळे होण्याच्या शक्यतेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “हो,या मुद्यावर सध्या विचार सुरू आहे. मी नाटोने कधीच प्रभावित झालो नाही. मला नेहमीच माहित होते की तो फक्त एक ‘कागदी वाघ’ आहे आणि (रशियाचे राष्ट्राध्यक्ष) व्लादिमीर पुतिन यांनाही हे माहित आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बऱ्याच काळापासून टीका

दीर्घकाळापासून ट्रम्प यांनी नाटोवर टीका केली आहे, ते अमेरिकेवर प्रमाणापेक्षा जास्त अवलंबून असल्याचे म्हटले होते, एवढंच नव्हे तर त्यातून बाहेर पडण्याची वारंवार धमकी दिली. तथापि, अमेरिकेच्या कायद्यानुसार, नाटोमधून बाहेर पडण्यासाठी किंवा सदस्यत्व निलंबित करण्यासाठी, व्हाईट हाऊसला सिनेटचा ‘सल्ला आणि संमती’ घेणे आवश्यक आहे, ज्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची गरज असते.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा