दक्षिण पॅसिफिक सागरात 7.7 तीव्रतेचा भूकंप, ऑस्ट्रेलियावर त्सुनामी लाटांचं संकट, जगाची धाकधुक वाढली

दक्षिण पॅसिफिक सागरात 7.7 तीव्रतेचा भूकंप, ऑस्ट्रेलियावर त्सुनामी लाटांचं संकट, जगाची धाकधुक वाढली

दक्षिण पॅसिफिक सागरात झालेल्या 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हाहाकार माजवलाय. या भूकंपाने ऑस्ट्रेलियात त्सुनामी लाटांचं संकट आलंय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 11, 2021 | 12:32 AM

कॅनबेरा : दक्षिण पॅसिफिक सागरात झालेल्या 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हाहाकार माजवलाय. या भूकंपाने ऑस्ट्रेलियात त्सुनामी लाटांचं संकट आलंय. त्यामुळे जगाचीही धाकधुक वाढलीय. याआधी आलेल्या त्सुनामी लाटांनी जगभरात हाहाकार माजवला होता. त्यामुळेच या लाटांनी काळजी वाढवलीय. हवामान खात्याने Lord Howe Island भागाला धोक्याचा इशारा दिलाय. त्यामुळे या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलंय (Tsunami confirmed in South Pacific region Australia after 7.7 magnitude earthquake).

दरम्यान, याआधी न्युझीलंड प्रशासनाने देखील पॅसिफिक सागरात भुकंप आल्यानंतर उत्तर किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. किनारा, बीच किंवा समुद्रात गेलेल्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावं, असं आवाहन करण्यात आलंय.

ऑस्ट्रेलियाने स्पष्टपणे त्सुनामीचा धोका असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे संबंधित भागात युद्धपातळीवर बचावाचं काम सुरु करण्यात आलंय. दुसरीकडे न्यूझीलंडनेही त्सुनामीच्या संकटाचा धोका लक्षात घेऊन सर्व तयारी ठेवलीय.

हेही वाचा :

त्सुनामीमुळे इंडोनेशियात 281 जणांचा मृत्यू

त्सुनामीमुळे इंडोनेशियात 43 जणांचा मृत्यू तर 600 जखमी

व्हिडीओ पाहा :

Tsunami confirmed in South Pacific region Australia after 7.7 magnitude earthquake

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें