पाकिस्तानचं कंबरडं मोडणारी बातमी… आधी बॉम्ब फोडला, नंतर गोळ्याचा पाऊस… पाकचे किती अधिकारी मेले? हादरवणारी घटना
नुकताच पाकिस्तानमधून खळबळ उडवणारी बातमी पुढे येतंय. पाकिस्तानमध्ये मोठा हल्ला झाला असून 9 सैनिकांसह दोन अधिकाऱ्यांचा जीव गेलाय. या हल्ल्याची जबाबदारी देखील स्वीकारण्यात आलीये.

दुसऱ्यांच्या घरात आग लावणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का बसला. नुकताच पाकिस्तानच्या अफगाणिस्तान सीमेजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर थेट मोठा हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानचे तब्बल 9 पॅरामिलिट्री सैनिक आणि दोन अधिकारी मारले गेले. या घातक हल्ल्याची जबाबदारी काही वेळातच पाकिस्तानी तालिबानने घेतली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली. या हल्ल्याबद्दल बोलताना पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, रस्त्याने जात असलेल्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. रस्त्याच्या कडेला काही बॉम्ब ठेवण्यात आली आणि ताफ्या तिथून जात असताना अगोदर स्फोट झाली.
पाकिस्तानी लष्करावर अत्यंत मोठा हल्ला
बॉम्ब हल्ला झाल्यानंतर लगेचच लष्कराच्या ताफ्यावर मोठा गोळीबारही करण्यात आला. हा हल्ला कुर्रम जिल्ह्यात झाला. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तानी तालिबान आहे. मागच्या काही महिन्यातील आकडेवारी जर बघितली तर पाकिस्तानच्या लष्करावरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामध्येच हा एक अत्यंत मोठा हल्ला म्हणावा लागेल. पाकिस्तानी तालिबान गटाला पाकिस्तानातील सरकार हटवून थेट इस्लामिक राजवट स्थापन करायची आहे.
या संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी
यादरम्यान इस्लामाबादचा आरोप आहे की, तालिबानी दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातील सीमेपलीकडून प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये अशाप्रकारच्या कारवाया करतात. मात्र, काबूलने अगोदरच पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचे अनेकदा म्हटले. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी तालिबानींनी केलेल्या हल्ल्यात या तीन महिन्यात 901 लोक मारले गेले आहेत. शिवाय 599 लोक गंभीर जखमी झाले.
पाकिस्तानातून धक्कादायक रिपोर्ट हाती
मागील तीन महिन्यांच्या तुलनेत हिंसाचारात 46 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका बसताना सध्या दिसतोय. सतत पाकिस्तानी लष्करावर हल्ले केली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला पहलगाममध्ये केला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मदतीने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे पूर्णपणे नष्ट केली. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मदतीने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. ज्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले.
