AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झोपेत शरीर संबंध ठेवायचा नंतर लाथ मारून बेडवरून ढकलायचा.. माजी महिला खासदाराच्या दाव्याने खळबळ

ब्रिटनच्या माजी खासदार केट नाइवेटन यांनी त्यांच्या माजी पती आणि खासदार अँड्र्यू ग्रिफिथ्स यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ग्रिफिथ्सने त्यांच्यासोबत झोपेत लैंगिक अत्याचार केले, नवजात बाळावर ओरडले आणि धमक्या दिल्या. वर्षानुवर्षे चाललेल्या या शोषणाबद्दल केट यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे आणि त्यांची कहाणी महिलांना प्रोत्साहन देईल अशी आशा व्यक्त केली आहे.

झोपेत शरीर संबंध ठेवायचा नंतर लाथ मारून बेडवरून ढकलायचा.. माजी महिला खासदाराच्या दाव्याने खळबळ
| Updated on: Jul 22, 2025 | 12:08 PM
Share

ब्रिटनच्या माजी खासदार केट नाइवेटन यांनी पहिल्यांदाच जगासमोर वैवाहिक जीवनातील अनेक वेदना उघड केल्या आहेत. मेट्रोच्या वृत्तानुसार, केट यांनी तिचे माजी पती आणि माजी खासदार अँड्र्यू ग्रिफिथ्स यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केट या 2019 ते 2024 सालापर्यंत युकेच्या बर्टन मतदारसंघातून खासदार होत्या. ग्रिफिथ्सने झोपेत तिचे लैंगिक शोषण केले, तो त्यांच्या नवजात बाळावर ओरडला आणि जेव्हा केटने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली तेव्हा तो म्हणाला, “कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही.” असा दावला केट यांनी केला आहे.

काही वेळा मी अत्याचारादरम्यान रडायचे आणि ते पाहून रागाच्या भरात ग्रिफिथ्सने मला अनेकदा लाथ मारून बेडवरून खाली ढकललं असा धक्कादायक दावाही केट यांनी केला आहे. .

सगळ्यांना वाटायचं की आमचं नातं परफेक्ट आहे

केट म्हणाली की, 2013 साली तिचं ग्रिफिथ्सशी लग्न झालं आणि 2018 साली ते दोघे वेगळे झाले. बाहेरून पाहणाऱ्यांसाठी ग्रिफिथ्स एक मनमिळावू, मोहक आणि आनंदी व्यक्ती होता. तो खूप चलाख आणि मनमिळावू होता.” आता मी विचार करते तेव्हा जाणवतं की काही संकेत दिसत होते. पण तेव्हा मी असा विचार करायचे की तो (ग्रिफिथ्स) कामामुळे ताणात आहे. ”

पण प्रत्यक्षात तिचे आयुष्य नरक बनले होते. केट म्हणाली की ग्रिफिथ्सने अनेक वर्षे तिचे शोषण केले. “केट, कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मी येथील खासदार आहे, पोलिस माझा खूप आदर करतात ” असंही तो तिला म्हणायचा.

झोपेत करायचा जबरदस्ती

ग्रिफिथ्स अनेकदा झोपेत तिच्यावर जबरदस्ती करायचा असा दावाही केटने केला. मला जेव्हा जाग यायची तेव्हा तो आधीच सेक्स करत असायचा. कधीकधी मी चूपचाप सहन करायचे, पण कितीतरी वेळा मला रडू यायचं. काही वेळा तो (ग्रिफिथ्स) थांबायचा, पण मग त्याचा मूड खराब व्हायचा आणि तो लाथ मारून मला बेडवरून खाली ढकलायचा. मी दुसऱ्या खोलीत जाऊन दार बंद करायचे किंवा सरळ घरातून बाहेर पडायचे, असा दावाही केटने केला.

नवजात बाळाचीही आली नाही दया

पण केटसाठी सर्वात वेदनादायक क्षण आला, जेव्हा तिनं पाहिलं की तिची दोन आठवड्यांची मुलगी देखील ग्रिफिथ्सच्या रागाची बळी बनत आहे. एके दिवशी सकाळी, जेव्हा त्यांची छोटी मुलगी दुधासाठी रडत होती, तेव्हा ग्रिफिथ्स तिच्या अंगावर इतक्या जोरात ओरडला की ते ऐकून केट घाबरलीच. त्याच क्षणी तिन ठरवलं की ती आता हे सहन करू शकत नाही आणि तीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.