फादर स्टॅन स्वामी यांना वारंवार जामीन नाकारला, त्यांचा मृत्यू धक्कादायक : UNHC

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचा खटला सुरू असतानाच तुरुंगात झालेल्या मृत्यू प्रकरणी नाराजी व्यक्त केलीय.

फादर स्टॅन स्वामी यांना वारंवार जामीन नाकारला, त्यांचा मृत्यू धक्कादायक : UNHC
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 6:10 AM

जिनेव्हा : संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचा खटला सुरू असतानाच तुरुंगात झालेल्या मृत्यू प्रकरणी नाराजी व्यक्त केलीय. तसेच हा मृत्यू धक्कादायक असल्याचं मत व्यक्त केलंय. UNHC ने म्हटलं, “खटल्याची सुनावणी सुरु असतानाच 84 वर्षीय मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूने दुःख झाले आणि धक्का बसला. त्यांना अटक केल्यापासून त्यांना जामीन देण्यात आला नव्हता. 2018 मध्ये आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर दहशतवादी कलमं लावून गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते आदिवासींच्या हक्कांसाठी मोठ्या काळापासून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते होते. (United Nation Human Right commission on death of father Stan Swamy)”

“अर्ज करुनही स्टॅन स्वामी यांचा जामीन अर्ज वारंवार नाकारण्यात आला”

“फादर स्टॅन स्वामी यांना मुंबईतील तळोजा तरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथं त्यांची तब्येत खालावली. त्यांना कोविड संसर्ग झाल्याचंही सांगितलं गेलंय. आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सातत्याने जामिनासाठी अर्ज केला. मात्र, जामीन नाकारण्यात आला. त्यांचा जामिन नाकारल्याविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला,” असं मानवाधिकार आयोगाने सांगितलं.

“UAPAचा मानवाधिकार कार्यकर्त्यांविरोधात वापर काळजीत टाकणारा”

आयोगाने म्हटलं, “संयुक्त राष्ट्राचे उच्चायुक्त आणि स्वतंत्र तज्ज्ञांनी मागील 3 वर्षांपासून भीमा कोरेगाव प्रकरणात खटला सुरू असताना तुरुंगात असलेल्या फादर स्टॅन आणि इतर 15 मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या सुटकेबाबतचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय बेकायदेशीर कृत्य विरोधी कायद्याचा (UAPA) मानवाधिकार कार्यकर्त्यांविरोधात चुकीच्या वापराबाबतही काळजी व्यक्त करण्यात आलीय.”

“मुलभूत अधिकारांचा वापर केला म्हणून कुणालाही अटक केली जाऊ नये”

“कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतासारख्या देशाने केवळ विरोधी मत मांडलं आणि ठोस पुरेसे पुरावे नसलेल्या ‘अंडर ट्रायल’ कैद्यांची तुरुंगातून सुटका करावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततेच्या मार्गाने एकत्र जमा होण्यासारख्या आपल्या मुलभूत अधिकारांचा वापर केला म्हणून कुणालाही अटक केली जाऊ नये.” असं आवाहनही आयोगाने भारत सरकारला केलं.

हेही वाचा :

Stan Swamy Death: भीमा-कोरेगाव हिंसाप्रकरणात अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामींचं निधन

Stan Swamy Death: कोण होते फादर स्टॅन स्वामी?; वाचा सविस्तर

Cold Blooded Murder!, स्टॅन स्वामींच्या निधनानंतर स्वरा भास्करची संतप्त प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहा :

United Nation Human Right commission on death of father Stan Swamy

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.