US Election 2020: मतदान होऊन 3 दिवस उलटले, अमेरिकेतील निकाल कधी लागणार?

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल (US Election 2020 Results) मतदानानंतर 3 दिवस उलटूनही लागलेला नाही.

US Election 2020: मतदान होऊन 3 दिवस उलटले, अमेरिकेतील निकाल कधी लागणार?
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 4:37 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल (US Election 2020 Results) मतदानानंतर 3 दिवस उलटूनही लागलेला नाही. मागील 62 तासांपासून मतमोजणी सुरु असून राज्यनिहाय निकालाचा वेगवेगळा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडेन रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे आहेत. मात्र, अजूनही बहुमत कुणाला मिळणार हे स्पष्ट झालेलं नाही. या स्थितीला बायडन यांना 253 इकेल्टोरल मतं आणि डोनाल्ड ट्रम्प यांना 214 मतं मिळालेली आहेत. बहुमतासाठी 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे (US election 2020 when we might know results of America president elections).

अमेरिकेच्या इतिहासात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीचे निकाल कधीपर्यंत जाहीर होणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण होणार याची घोषणा कधी होणार असाही प्रश्न विचारला जात आहे. मात्र, या प्रश्नाचं थेट उत्तर कुणाकडेही नाही. कारण अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमधील मतमोजणीची स्थिती वेगळी आहे. असं असलं तरी मतमोजणीची प्रक्रिया 12 नोव्हेंबरपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत 6 राज्यांमधील मतमोजणी सुरुच

अमेरिकेत सध्या 6 राज्यांमध्ये मतमोजणी सुरु आहे. यापैकी नेवादा (6 इलेक्टोरल मतं) आणि एरिजोना (11) या राज्यांमध्ये बायडन आघाडीवर आहेत. अलास्का (3), पेनसिल्वेनिया (20), नॉर्थ केरोलीना (15), जॉर्जियामध्ये (16) ट्रम्प आघाडीवर आहे.

कोणत्या राज्याला किती वेळ लागणार?

अलास्का (3 इलेक्टोरल मतं)

या राज्यातील निकाल पुढील आठवड्याच्या आधी लागणं शक्य नाही. या राज्यातील मेल बॅलेट आणि मतदानपूर्व बॅलेटची मोजणी 29 ऑक्टोबरनंतर झालेली नाही.

एरिजोना (11)

एरिजोनामधील (Arizona Election Results) निकाल आज (6 नोव्हेंबर) येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी बायडन जवळपास 2 टक्के मतांनी पुढे आहेत.

जॉर्जिया (16)

जॉर्जियामध्ये (Georgia Election Results) आजही मतमोजणी सुरुच राहणार आहे. या ठिकाणी ट्रम्प यांना आघाडी आहे, मात्र तो फरक खूप कमी आहे. येथील 98 टक्के मतांची मोजणी झालीय. त्यामुळे आज रात्री उशिरा किंवा उद्या निकाल स्पष्ट होईल.

नेवादा (6) –

नेवादामध्ये (Nevada Election Results) जो बायडन केवळ 1 टक्के मतांनी आघीडीवर आहेत. येथील 89 टक्के मतमोजणी झाली आहे. या ठिकाणी देखील आज निकाल लागणार नाहीये. येथे 10 नोव्हेंबरपर्यंत येणाऱ्या मेल बॅलेटची मोजणी होणे बाकी आहे.

नॉर्थ कॅरोलीना (15) –

राज्यात 95 टक्के मतमोजणी झाली. 12 नोव्हेंबरला पोहचणाऱ्या मेल-इन बॅलेटची मोजणी बाकी.

पेनसिल्वेनिया (20)

पेनसिल्वेनियामध्ये (Pennsylvania Election Results) फिलाडेल्फिया आणि पिट्सबर्गमधील मतमोजणी बाकी आहे.

संबंधित बातम्या :

US Election 2020 Live Update: अमेरिकेत निकालापूर्वी हिंसाचाराच्या घटना, हजारो आंदोलक रस्त्यांवर

US Election 2020 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक मतमोजणीत अडथळा, हँड सॅनिटायझरमुळे बॅलेट स्कॅनर खराब

US Election : ट्रम्प-बायडनमध्ये कोण जिंकणार? सनी लिओनी म्हणते ‘ही आतुरता माझा जीव घेतेय’

US election 2020 when we might know results of America president elections

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.