AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-India Trade Deal: भारत-अमेरिकेचे जुळले सूर, व्यापारी करारावर शिक्कामोर्तब, पडद्यामागील सूत्रधार कोण?

US-India Trade Deal: भारत आणि अमेरिकेत अखेर व्यापारी करारावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याची घोषणा केली. हा व्यापारी करार करण्यामागील मास्टरमाईंड कोण हे तुम्हाला माहिती आहे का? या व्यक्तीमुळे सुटला हा पेच.

US-India Trade Deal: भारत-अमेरिकेचे जुळले सूर, व्यापारी करारावर शिक्कामोर्तब, पडद्यामागील सूत्रधार कोण?
सर्जियो गोर-पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 03, 2026 | 11:05 AM
Share

US-India Trade Deal Sergio Gor: भारत आणि अमेरिकेत अखेर व्यापारी करार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि या कराराची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून हा करार अडकलेला होता. पेच काही सुटत नव्हता. उलट व्यापारी करार अडकल्याने आणि टॅरिफ वॉरमुळे दोन्ही देशातील राजकीय संबंधही ताणल्या गेले होते.ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या कराराची माहिती दिली. आज सकाळी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. ते माझ्या चांगल्या मित्रांपैकी ते एक आहेत. ते एक सन्माननीय आणि शक्तिशाली नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मैत्री, आदर आणि त्यांच्या विनंतीवरून आम्ही लागलीच अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी कराराला मंजूरी दिली असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे टॅरिफ 25 टक्क्यांहून थेट 18 टक्क्यांपर्यंत खाली आले तर लवकरच ते शून्यापर्यंत कमी होण्याची शक्यता ट्रम्प यांनी वर्तवली. पण इतक्या दिवसांपासून लांबलेला हा करार कसा लवकर पूर्ण झाला हे तुम्हाला माहिती आहे का?

अमेरिकन राजदूतांची मोठी भूमिका

मंगळवारी अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापारी कराराच्या बातम्या सकाळी धडकल्या. पण त्यापूर्वीच अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी त्याचे सोमवारीच संकेत दिले होते. ते ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. 38 वर्षीय सर्जियो गोर (US Ambassador Sergio Gor)  यांनी अवघ्या एक महिन्यापूर्वीच भारतातील अमिरेकन राजदूतवासात पाऊल ठेवले. त्यांनी सूत्र हातात घेतली आणि पेच निवळण्यात त्यांना यश आले. त्यांनी मुत्सद्दीगिरी केली. त्याला यश आल्याचे दिसून आले. पडद्यामागे गोर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. दोन्ही देशात तानलेले संबंध पूर्ववत करण्यात त्यांचा मोठा हातभार लागला.

कोण आहेत सर्जियो गोर?

सर्जियो गोर यांचा प्रवासही तितकाच रोमाचंक आहे. त्यांचा जन्म 1986 मध्ये उज्बेकिस्तानमध्ये झाला. त्यांचे मूळ नाव सर्गेई गोरोखोव्सकी होते. ते पुढे छोटे करून सर्जियो गोर करण्यात आले. त्यांचे कुटुंब अगोदर माल्टा येथे राहत होते. 1990 मध्ये त्यांचे कुटुंब अमेरिकेत आले. तिथे गोर यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले. त्यांचे आई-वडील हे रशियन आहेत. त्यांच्या आईकडे इस्त्रायलचे सुद्धा नागरिकत्व आहे. त्यांनी जॉर्ज वॉशिग्ंटन विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी रिपब्लिकनसाठी काम केले. सीनेटर रँड पॉल यांच्या कार्यालयासाठी त्यांनी कामास सुरुवात केली. त्यानंतर ते हळूहळू ट्रम्प यांच्या संपर्कात आले.

2020 मध्ये सर्जियो गोर यांनी ट्रम्प विक्ट्री फायनान्स कमिटीसाठी मोठ्या प्रमाणात निधी जमवला. ट्रम्प हे निवडणूक हरले असले तरी गोर हे त्यांचे विश्वासू ठरले. त्यांनी ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरसह एक प्रकाशन संस्था सुरू केली. त्यात ट्रम्प यांच्या अनेक विक्रमी खपाची पुस्तक प्रकाशित करण्यात आली. दरम्यान या करारातंर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेले अतिरिक्त 25% टॅरिफ हटवले. भारताने रशियाकडून इंधन खरेदी सुरूच ठेवल्याने हा टॅरिफ लावण्यात आला होता. आता 25 टक्क्यांहून थेट 18 टक्क्यांपर्यंत खाली आले तर लवकरच ते शून्यापर्यंत कमी होण्याची शक्यता ट्रम्प यांनी वर्तवली.

Follow Us
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड