AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Iran Peace Talks In Islamabad : इराण जिवंत आहे फक्त… ट्रम्प यांची पुन्हा धमकी; शांतीवार्ते आधीच दिलं टेन्शन; आता…

40 दिवसांच्या संघर्षानंतर अमेरिका आणि इराणने युद्धविराम घोषित केला. शांतता चर्चेसाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधी आज पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये भेटणार आहेत. मात्र, या भेटीपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे, ज्यामुळे चर्चेचे भवितव्य अनिश्चित बनले आहे. ट्रम्प यांनी इराणवर अण्वस्त्रे आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.

US Iran Peace Talks In Islamabad :  इराण जिवंत आहे फक्त... ट्रम्प यांची पुन्हा धमकी; शांतीवार्ते आधीच दिलं टेन्शन; आता...
ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकीImage Credit source: Getty Images
| Updated on: Apr 11, 2026 | 10:59 AM
Share

40 दिवसांच्या अविरत संघर्षानंतर अखेर बुधवारी अमेरिका-इराणने एक पाऊल पुढे टाकत युद्धविरामाची घोषणा केली. त्यानंतर शांतता चर्चेसाठी दोन्ही देशांच प्रतिनिधी आज पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये भेटणार असून या भेटीकडे जगाचे लक्ष लागलं असून या युद्धावर अखेर काय तोडगा काढला जातो, हेही जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र पाकिस्तानमध्ये शांतता चर्चा सुरू होण्याआधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आंनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे, इराण केवळ चर्चेसाठीच जिवंत आहे, असं ट्रम्प म्हणाले. “इराणकडे दुसरा पर्याय नाही; ते केवळ चर्चेसाठीच जिवंत आहे.” असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले. इस्लामाबादमधील चर्चेच्या काही तास आधीच ट्रम्प यांनी ही धमकी दिली.

ट्रम्प यांनी ट्रुथसोशलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीचाही उल्लेख केला आहे. इराण आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर नियंत्रण मिळवून जगाकडून पैसे उकळत आहे, असं ते म्हणाले. ” आंतरराष्ट्रीय जलमार्गांचा वापर करून जगाला धमकावण्यासाठी इराणकडे कोणतेही अस्त्र नाही; वाटाघाटी करण्यासाठीच ते आज जिवंत आहेत.” असंही ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.

इराणला ट्रम्प यांची धमकी

‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहीलं की, इराणला हे समजून घेण्याची गरज आहे की, त्यांनी आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ट्रम्प यांनी पुढे असाही दावा केला की, इराणने सहकार्य केले नाही तरीही अमेरिका लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी पावले उचलेल. अमेरिका या मुद्द्यावरून माघार घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचं त्यांच्या या विधानावरून स्पष्ट होतंय.

ते (इराण) वाटाघाटींदरम्यान एक गोष्ट सांगतात आणि प्रसारमाध्यमांसमोर दुसरीच गोष्ट सांगतात, असा आरोपही ट्रम्प यांनी इराणवर केला. इराणने अण्वस्त्रे सोडून देण्याची आपली तयारी उघडपणे जाहीर केली, पण नंतर युरेनियम संवर्धनाबद्दल ते बोलले. इराणी लोक लढण्यापेक्षा प्रचार आणि प्रतिमा उभारणीत अधिक पारंगत आहेत असंही ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती इस्लामाबादेत दाखल

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि त्यांचे पथक इस्लामाबादमध्ये दाखल झाले असून, तेथे ते इराणी प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत असून दोन्ही देशांमध्ये करार घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. जर ही चर्चा यशस्वी झाली नाही, तर परिस्थिती पुन्हा चिघळू शकते, असे संकेत ट्रम्प यांनी दिले होत. अमेरिकेची युद्धनौका आधीच सज्ज असून, गरज पडल्यास कारवाई केली जाऊ शकते असा इशारा त्यांनी दिला होता.

त्यामुळे इराण-अमेरिकेदरम्यान हाँ युद्धविरा किती काळ टिकतो, इस्लामाबादमध्ये चर्चेत काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; काय म्हणाले?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप