टॅरिफच्या नावाखाली सोयाबीन विक्री, डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव जगासमोर, भारताने फाडला बुरखा
अमेरिकेने लादलेल्या टॅरिफकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. भारतावर अमेरिकेकडून 50 टक्के टॅरिफ लावण्यात आलाय. मात्र, भारताने अजून अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. भारत काय करणार याकडे सर्वांचे लक्ष असतानाच भारत वेगळ्या पर्यायांच्या शोधात असल्याचे स्पष्ट आहे आणि अमेरिकेला धक्का देण्याच्या तयारीत देखील.

टॅरिफच्या प्रश्नावरून भारत आणि अमेरिकेत तणाव वाढलेला असतानाच आता अमेरिकेकडून मोठा डाव खेळला जात आहे. अमेरिकेचा खरा चेहरा हा जगासमोर आला. भारताबद्दल डोनाल्ड ट्रम्प हे कठोर भूमिका घेत आहेत तर दुसरीकडे चीनबद्दल ते एक पाऊल मागे टाकताना दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्ध बघायला मिळालंय. मात्र, चीनने कधीच अमेरिकेला घाबरून गुडघे टेकली नाहीत. आता अमेरिकाच चीनसमोर लोटांगण घालताना दिसत आहे. अखेर अमेरिका चीनसमोर झुकण्याचे कारण पुढे आलंय.
अमेरिकेने चीनवरील टॅरिफबद्दल नरम भूमिका घेतली आहे. 90 दिवसांचा वेळ त्यांना दिला असून यामधून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला टॅरिफ डेडलाइन म्हणून 90 दिवसांची सवलत देत अमेरिकन सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी करावी असे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन सोयाबीन विकण्यासाठी चीनला टॅरिफमध्ये सवलत देत असल्याचे सांगितले जातंय.
चीन सोयाबीनच्या कमीमुळे चिंतेत आहे आणि आमचे शेतकरी हे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकवतात. यामुळे एक आशा आहे की, चीन लवकरच सोयाबीनची मागणी वाढवेल आणि चार पट्ट अधिक ऑर्डर देईल, अशाप्रकारची पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केली. यावर चीनच्या राष्ट्रपतींनी आभार देखील मानले होते. टॅरिफच्या माध्यमातून अमेरिका वेगवेगळे डाव खेळत असल्याचे स्पष्ट होताना दिसतंय. चीनची अर्थव्यवस्था अत्यंत मोठी आहे आणि मागील काही वर्षांमध्ये चीनवर दबाव टाकण्यासाठी सर्व प्रयत्न अमेरिकेकडून करण्यात आली.
मात्र, आता थेट अमेरिकेची चीनबद्दलची भाषा बदलल्याचे बघायला मिळतंय. भारताच्या तुलनेत चीनकडे अधिक झुकाव अमेरिकेचा दिसत आहे. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापार चर्चा बंद आहे. जोपर्यंत टॅरिफवर निर्णय होत नाही तोपर्यंत चर्चा केली जाणार नसल्याची भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. भारताने अमेरिकेच्या टॅरिफबद्दलच्या अटी मान्य करू नयेत, असे सांगितले जातंय. जर भारताने अमेरिकेच्या टॅरिफबद्दलच्या अटी मान्य केल्यातर त्याचा थेट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार हे स्पष्ट आहे.
