AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत पाकिस्तानची फजिती, बिलावलच्या शिष्टमंडळाला यूएस खासदाराने कठोर शब्दांत सुनावले, आधी…

अमेरिकेत गेलेल्या पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला अमेरिकन खासदाराने दहशतवादावर सुनावले. बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी शिष्टमंडळाला अमेरिकेतील खासदाराने दहशतवादास समर्थन देणे बंद करण्याचे सांगितले.

अमेरिकेत पाकिस्तानची फजिती, बिलावलच्या शिष्टमंडळाला यूएस खासदाराने कठोर शब्दांत सुनावले, आधी...
brad-sherman
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 07, 2025 | 2:54 PM
Share

भारताची कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानची अमेरिकेत चांगलीच फजिती झाली आहे. भारताने विविध देशांमध्ये आपल्या खासदारांचे शिष्टमंडळ पाठवले. त्यानंतर पाकिस्ताननेही शिष्टमंडळ पाठवले. परंतु अमेरिकेत पाकिस्तानच्या या शिष्टमंडळाला दहशतवादावर चार कठोर बोल ऐकावे लागले. बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी शिष्टमंडळाला अमेरिकेतील खासदाराने सांगितले की, तुम्ही दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदचा खात्मा करा. तसेच धार्मिक अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करावे. वरिष्ठ खासदार ब्रॅड शेरमन यांनी पाकिस्तानला हा कडक संदेश दिला.

वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी शिष्टमंडळाने शेरमन यांची भेट घेतली. त्यावेळी ब्रॅड शेरमन म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादी संघटनेचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली पाहिजेत. त्यांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेविरुद्ध निर्णायक कारवाई करावी. वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येसाठी ही संघटना जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.

बिलावल यांना हे कठोर बोल काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ वॉशिंग्टनमध्ये असतानाच ऐकावे लागले. थरुरु ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबत पाकिस्तान समर्थित दहशतवादी जबाबदार असल्याचे अमेरिकेत सांगत होते. ब्रॅड शेरमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की, मी पाकिस्तानी शिष्टमंडळाला दहशतवादाविरुद्धच्या लढाईचे महत्त्व सांगितले. विशेषतः २००२ मध्ये माझ्या मतदारसंघातील रहिवासी डॅनियल पर्लची हत्या करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद गटाविरुद्ध कारवाई करण्याचे सांगितले. ओसामा बिन लादेनला ठार मारण्यास अमेरिकेला मदत केल्याबद्दल तुरुंगात असलेल्या डॉ. शकील आफ्रिदीची सुटका करण्याचा प्रश्नही शेरमन यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, डॉ. आफ्रिदीची सुटका करणे हे ९/११ च्या पीडितांसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

बिलावल भुट्टो यांनी शिष्टमंडळासह न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि सुरक्षा परिषदेच्या राजदूतांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी आणि भारतासोबतचा संघर्ष सोडवण्यासाठी मदतीची याचना केली. परंतु त्यांनी दहशतवाद निपटण्याचा सल्ला देण्यात आला.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?