AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका, विरोधात घेतला मोठा निर्णय

Donald Trump : दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकी काँग्रेसला संबोधित करत आहेत. राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचं हे पहिलं संबोधन आहे. सगळ्या जगाची ट्रम्प यांच्या भाषणावर नजर आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच काही निर्णय घेतलेत. त्याचा फटका जगातील अनेक देशांना बसला आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका, विरोधात घेतला मोठा निर्णय
Donald Trump
| Updated on: Mar 05, 2025 | 9:40 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकी काँग्रेसमध्ये संबोधन सुरु आहे. त्यांच्या भाषणावर सगळ्या जगाची नजर आहे. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ते अमेरिका इज बॅक म्हणाले. अमेरिकेचा अभिमान, विश्वास परत आलाय असं ट्रम्प म्हणाले. “आपण निवडणुकीत शानदार विजय मिळवला. सर्व स्विंग स्टेट्स जिंकली” असं ट्रम्प म्हणाले. “सत्तेत आल्यानंतर मी अनेक आदेशांवर स्वाक्षरी केली. मी सहाआठवड्यात 400 पेक्षा जास्त निर्णय घेतले. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी सर्वांना एकत्र मिळून काम करावं लागेल. ही मोठी स्वप्न पाहण्याची वेळ आहे” असं डोनाल्ड ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले.

“मी WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. मी माझ्या पहिल्या कार्यकाळात अनेक नियम बनवले होते. यावेळी सुद्धा तसच करतोय. अमेरिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य परत आलय. इंग्रजीला अमेरिकेची अधिकृत भाषा बनवण्यासंबंधीच्या एका आदेशावर मी स्वाक्षरी केलीय” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मेरिटच्या आधारावर नोकऱ्यांमध्य भरती होईल असं ट्रम्प म्हणाले. बायडेन यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, “त्यांच्या सरकारमध्ये अंड्याची किंमत गगनाला भिडलेली. पण आम्ही महागाईवर नियंत्रण मिळवतोय. आम्ही पॉवर प्लांट बनवत आहेत. आमचा फोकस त्यावर आहे” “आमचं सरकार अलास्का येथे गॅस पाईपलाईनवर काम करत आहे. करदात्यांचा पैसा वाचवण्यासाठी आम्ही DOGE ची स्थापना केलीय. त्याची जबाबदारी मी इलॉन मस्कवर सोपवलीय” असं ट्रम्प म्हणाले.

भारताबद्दल काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅक्स कटची घोषणा केली. ते म्हणाले की, “चीन, भारत, ब्राझील सारखे देश आपल्यावर टॅरिफ लावतात. हे चांगलं नाहीय” “जे देश आमच्यावर टॅरिफ लावणार, आम्ही सुद्धा त्यांच्यावर टॅरिफ लावणार. ही प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरु होईल. टॅरिफच्या माध्यमातून पुन्हा अमेरिकेला श्रीमंत बनवायच आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. आपल्या संबोधनात त्यांनी पोलिसांसाठी मोठी घोषणा केली. “अमेरिकेत पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्यास मृत्यूदंडची शिक्षा दिली जाईल” असं ट्रम्प म्हणाले. सध्या अमेरिका आणि युरोपचे संबंध ताणले गेले आहेत. ट्रम्प नाटोमधून बाहेर पडण्याची सुद्धा घोषणा करु शकतात. पण असं केल्यास अमेरिकेच युरोपवरील वर्चस्व कमी होईल.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.