
टॅरिफच्या मुद्यावरून भारत-अमेरिकेदरम्यान अद्यापही तणाव आहे. अमेरिकेने भारतवार 50 टक्के टॅरिफ लावला असून त्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. ट्रम्प त्यांच्या आडमुठ्या भूमिकेवर ठाम असले तरी भारतानेही त्यांच्यासमोर झुकण्यास नकार दिला आहे. एकीकडे ट्रम्प यांची भारतावर नाराजी असतानाच आता ते रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यावर खुश नसल्याचे समोर आले आहे. खुद्द ट्रम्प यांनीच हे कबूल केलं आहे. रशिया आणि यूक्रेनदरम्यान पेटलेल्या युद्धात समेट घडवण्याचा अमेरिकेच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कसून प्रयत्न करत आहेत, मात्र यात अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. झेलेंस्की आणि पुतिन या दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींची ट्रम्प यांनी भेटही घेतली. या युद्धात होमाऱ्या प्राणहानीबद्दलही ट्रम्प यांनी अनेकवेळा चिंता व्यक्त केली आहे. मात्र ट्रम्पच्या प्रयत्नांना न जुमानता रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्याप सुरूच आहे. म्हणूनच ट्रम्प हे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामुळे खऊप निराश असून त्यांनी उघडपणे ही नाराजी बोलूनही दाखवली आहे.
मंगळवारी ( 2 सप्टेंबर) स्कॉट जेनिंग्ज रेडिओ शोला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी यावर खुलेपणाने मत मांडलं. युक्रेनमधील युद्धावरून ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर खूप निराश आहेत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. अलास्का येथील बैठकीनंतरही युक्रेनच्या मुद्यावर शांतता करार होऊ न शकल्याने ते पुतिन यांच्यावर खूप निराश असल्याचे ट्र्म्पम्हणाले. आमचे संबंध खूप चांगले होते पण आता मी निराश झालो आहे, हे मी म्हणू शकतो असंही त्यांनी नमूद केलं.
लोकांचं आयुष्य वाचवण्यासाठी काही पावलं उचलत आहोत.
युक्रेनविरुद्ध रशियाच्या युद्धात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी वॉशिंग्टन पावले उचलत आहे, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी लवकरच पाऊले उचलणार आहत, काहीतरी करणार आहोत, असे ते म्हणाले, मात्र त्याबद्दल अधिक माहिती देणं त्यांनी टाळलं.
रशिया-चीनच्या वाढत्या मैत्रीमुळे चिंता नाही
रशिया आणि चीनमधील वाढत्या मैत्रीबद्दल अजिबात काळजी नसल्याचेही त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं. त्यांना मॉस्को आणि बीजिंगमधील वाढत्या संबंधांबद्दल काळजी नाही असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेकडे जगातील सर्वात मजबूत सैन्य आहे आणि चीन आणि रशिया कधीही अमेरिकेविरुद्ध त्यांचे सैन्य वापरू शकत नाहीत असा ठाम विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. .
जिनपिंग यांच्याकडून पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांचे स्वागत
अलिकडेच चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शिखर परिषदेच्या काही दिवसांनंतर ट्रम्प यांचं हे विधान समोर आलं आहे. तिथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह इतरांचे स्वागत केले होते. बैठकीदरम्यान जिनपिंग यांनी पुतिन आपले जुने मित्र असल्याचे म्हटले होते. याशिवाय, जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही चर्चा केली. भारताच्या रशियासोबतच्या ऊर्जा संबंधांवर ट्रम्प यांनी टीका केली होती. रशियाचे अध्यक्ष पुतिन सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते लष्करी परेड समारंभातही सहभागी होतील.
अलास्कार ट्रम्प -पुतिन भेट
ऑगस्टच्या मध्यात ट्रम्प यांनी अलास्कामध्ये पुतिन यांची भेट घेतली आणि नंतर वॉशिंग्टनमध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह युरोपियन आणि नाटो नेत्यांचे स्वागत केले. त्या बैठकींनंतर ट्रम्प यांनी आशा व्यक्त केली होती की की प्रथम झेलेन्स्की आणि पुतिन द्विपक्षीय बैठक करतील आणि नंतर ते स्वतः ( ट्रम्प) त्यात सामील होतील आणि त्रिपक्षीय बैठक घेतील. परंतु रशिया सतत या बैठकीला अडथळा आणत असल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला तर , ‘अजेंडा अद्याप तयार नाही’ असा रशियाचा युक्तिवाद आहे.