AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज खाडीबद्दल जगाची झोप उडवणारा खुलासा, डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवले जगाचे टेन्शन, थेट..

इराण अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. जगाला या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. त्यामध्येच होर्मुज खाडी अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीनंतर स्थिती अधिक तणावात असल्याचे बघायला मिळत आहे. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा दावा केला.

होर्मुज खाडीबद्दल जगाची झोप उडवणारा खुलासा, डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवले जगाचे टेन्शन, थेट..
strait of Hormuz
| Updated on: Apr 22, 2026 | 9:17 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच जगाची झोप उडवणारा दावा केला. हेच नाही तर होर्मुज खाडीजवळ नाकेबंदी नक्की का केली, यावरही त्यांनी भाष्य केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, इराणला होर्मुज खाडी बंद करायची नाही, तशी त्यांची इच्छा नाही. ते होर्मुज खाडी खुली करू इच्छितात. कारण प्रत्येक दिवशी 50 करोड डॉलर त्यांना कमाई करायची आहे. होर्मुज खाडी बंद असेल तर त्यांचे मोठे नुकसान होणार. दररोज काही लोक माझ्याजवळ येतात आणि होर्मुज खाडी खुली करण्याबाबत बोलतात. जर आम्ही असे केले तर इराणसोबत कोणताही करार होणे शक्य नाही. मग जोपर्यंत आम्ही इराणला आणि त्यांच्या देशातील सर्व नेत्यांना संपवत नाहीत, तोपर्यंत. होर्मुज खाडी बंद असल्याने 500 मिलियन डॉलरचे इराणचे आतापर्यंत नुकसान झाले.

इराणला वाटते की, आम्ही नाकेबंदी हटवावी, पण सध्याच्या घडीला शक्य नाही. पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितल्यानंतर आम्ही इराणवरील हल्ले रोखण्याचा निर्णय घेतला. युद्धबंदी काही दिवसांकरिता पुढे ढकलली. अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीनंतर होर्मुज खाडी पूर्णपणे बंद आहे. होर्मुज खाडी पूर्णपणे बंद असल्याने एकच खळबळ उडाली.

अमेरिकेच्या नाकेबंदीपूर्वी थोड्याबहुत प्रमाणात होर्मुज खाडीतून जहाजांची ये-जा सुरू होती. मात्र, अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीनंतर बंदरातून एकही इराणी जहाज बाहेर पडू शकत नाही. 13 एप्रिल रोजी अमेरिकेने इराणभोवती नाकेबंदी केली. मंगळवारी इस्लमाबादमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बैठकीस येण्यास इराणने नकार दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काही धमक्या देण्यात आल्या.

शिवाय होर्मुज खाडीत तणाव आहे. अशा वातावरणात चर्चा करणे शक्य नसल्याचे म्हणते इराणने बैठकीस येण्यास नकार दिला. इराण आणि अमेरिका युद्धात पहिल्या दिवसापासून पाकिस्तानची लुडबुड राहिली आहे. स्थिती अधिक भयंकर होत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशांमध्ये एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. मात्र, अमेरिकेने स्पष्ट केले की, आम्ही नाकेबंदी उठवणार नाहीत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल