AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना समजणे कठीण नाही महाकठीण, थेट ट्रम्प यांच्या कंपनीची भारतात 1 लाख कोटींची गुंतवणूक, याठिकाणी…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील याचा अजिबातच भरोसा नाही. डोनाल्ड ट्रम्प अखेर भारताच्या पुढे झुकल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर भारत मालामाल होईल.

डोनाल्ड ट्रम्प यांना समजणे कठीण नाही महाकठीण, थेट ट्रम्प यांच्या कंपनीची भारतात 1 लाख कोटींची गुंतवणूक, याठिकाणी...
US President Donald Trump company
| Updated on: Dec 10, 2025 | 1:08 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगाची डोकेदुखी वाढली आहे. एकीकडे ते भारताला एका मागून एक धक्का देण्याबद्दल बोलतात, तर दुसरीकडे त्यांची कंपनी भारतामध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे. भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लादला. आता ते भारताच्या तांदळावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहेत. भारताने जर अमेरिकेत निर्णयात करणे बंद केले तर अमेरिकेमध्ये मोठा हा:हाकार बघायला मिळेल. हेच नाही तर खाद्यपदार्थांसोबतच अनेक वस्तूंचे भाव गगणाला पोहोचतील. भारतापेक्षा जास्त धक्का अमेरिकेला बसेल. भारताने अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर पर्यायी शोध घेतले असून आपले नुकसान टाळले आहे. डोनाल्ड ट्रम्प कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माझे जवळचे मित्र असल्याचे सांगताना दिसतात. मात्र, तरीही भारतावर टॅरिफ लावतात.

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे डावपेच कळणे सर्वात कठीण काम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिझनेस ग्रुपने तेलंगणामधील फ्युचर सिटी आणि इतर प्रकल्पांमध्ये ₹ 1 लाख कोटी पर्यंतच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप कॉर्पोरेशन (TMTG) चे संचालक एरिक स्विडर यांनी याबद्दलची घोषणा केली. नुकताच ही अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. स्विडर यांनी ट्रुथ सोशलचे संस्थापक सीईओ म्हणूनही काम केले आहे.

एरिक स्विडर यांनी या गुंतवणुकीबद्दल घोषणा करत म्हटले की, भारत वेगाने प्रगती करत आहे आणि तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करेल. डोनाल्ड ट्रम्प हे ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे मालक आहेत. आता त्यांच्याच कंपनीने इतकी मोठी गुंतवणूक भारतात केली.  तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान कोण विकसित करत आहे आणि कोण काम करत आहे हे पाहिले तेव्हा हे स्पष्ट झाले होते की, भारतातून बरेच लोक पुढे येत आहेत. टेक्नॉलॉजीमध्ये आता भारत थांबणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.

स्विडर म्हणाले की, भारतात तंत्रज्ञानात गुंतवणुकीच्या उत्तम संधी आहेत. भारताची प्रगती कोणालाही थांबवता येणार नाही. तंत्रज्ञानात भारत जगाचे नेतृत्व करेल. आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांनीच भारतात ही गुंतवणूक केल्याने जगाने भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारताने ज्याप्रकारे टेक्नॉलॉजीमध्ये झपाट्याने जी प्रगती केली ती जगाने बघितली. अनेक देश भारतात गुंतवणूक करताना दिसत आहेत.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान