AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेच्या टॅरिफमुळे देशातील 10 लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, कोणत्या क्षेत्रावर परिणाम होणार ते जाणून घ्या

अमेरिकेने भारताची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्याने देशातील 10 लाख नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात बेरोजगारीच्या फार मोठ्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

अमेरिकेच्या टॅरिफमुळे देशातील 10 लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, कोणत्या क्षेत्रावर परिणाम होणार ते जाणून घ्या
अमेरिकेच्या टॅरिफमुळे देशातील 10 लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, कोणत्या क्षेत्रावर परिणाम होणार ते जाणून घ्याImage Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 27, 2025 | 3:46 PM
Share

अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावला असून त्याची अमलबजावणी 27 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. त्यामुळे भारतीय उत्पादनं अमेरिकेत 50 टक्क्यांनी महागणार आहेत. त्यामुळे भारतीय निर्यातीवर खूप मोठा परिणाम होणार आहे. दुसरीकडे, भारतीय वस्तू महाग झाल्यानंतर अमेरिकन ग्राहक खरेदीसाठी चीन, व्हिएतनाम आणि बांगलादेशी वस्तूंना पसंती देतील. त्यामुळे भारताला फार मोठा धक्का बसू शकतो. सीटीआयचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांच्या मते, भारताच्या व्यापारावर खोल परिणाम होणार आहे. तसेच लाखो नोकऱ्या अडचणीत येण्याची शक्यता आहेत. इतकंच काय तर काही क्षेत्रांचं मोठं नुकसान होऊ शकतं. अमेरिकेच्या टॅरिफमुळे कापड, चामडे, रत्ने-दागिने, ऑटो पार्ट्स, केमिकल, फार्मा, सीफूड आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रावर परिणाम होणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या 10 लाख नोकऱ्या अडचणीत येणार आहेत.

सीटीआयच्या अंदाजानुसार, अमेरिकेच्या टॅरिफ नितीमुळे भारताचं 48 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीवर थेट परिणाम होईल. दुसरीकडे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. टॅरिफ नेमका कोणत्या कंपन्यांना लागू होईल वगैरे वगैरे.. कारण ज्यांनी आधीच ऑर्डर घेतल्या आहेत त्यांना की आधीच जो माल मार्गावर आहे त्याला? याबाबत अमेरिकेने स्पष्ट असं काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी भारताने 1.25 लाख कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि 92 हजार कोटींची औषधे पाठवली होती. यापू्र्वी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 0.41 टक्के आणि औषधांवर शून्य टक्के शुल्क होते. मात्र या वस्तू आता 50 टक्क्यांनी महागणार आहेत.

भारत सरकार या स्थितीचा सामना कसा करणार याकडे आता लक्ष लागून आहे. दुसरीकडे, अमेरिकेतून येणारी मौल्यवान रत्ने, अणुभट्टीचे भाग, विमान उपकरणे, विद्युत वस्तू, प्लास्टिक, सुखा मेवा, स्टील या सारख्या वस्तूंवर तितकाच टॅरिफ लावावा. बृजेश गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे की, भारताने अमेरिकेला जसाच तसं उत्तर दिलं पाहीजे. अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करावं आणि जर्मनी, ब्रिटेन, सिंगापूर, मलेशिया या सारख्या देशात बाजारपेठा शोधाव्यात.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा