AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या बाळाची वेणी माझ्या डोळ्यासमोर दिसतेय… माळशिरस अपघाताचा थरार सांगताना प्रत्यक्षदर्शी ढसाढसा रडला

सोलापूरच्या माळशिरस येथील भीषण अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यात लहान मुलांचाही समावेश होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्रत्यक्षदर्शीने डोळ्यासमोर घडलेला थरार वर्णन करताना, मृत बाळाची आठवण येऊन तो ढसाढसा रडला. अपघाताचे मुख्य कारण रस्त्यांचे निकृष्ट काम आणि संरक्षक कठड्यांचा अभाव हे असून, स्थानिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

त्या बाळाची वेणी माझ्या डोळ्यासमोर दिसतेय... माळशिरस अपघाताचा थरार सांगताना प्रत्यक्षदर्शी ढसाढसा रडला
माळशिरस येथे भीषण अपघात
| Updated on: Jun 15, 2026 | 12:27 PM
Share

सोलापूरच्या माळशिरस येथे काल भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू ओझाला आहे. तर 7 जण बचावले आहेत. मृतांमध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. या घटनेमुळे सर्वच हादरून गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक होती. अंगाचा थरकाप उडवणारी होती. प्रत्यक्षदर्शीने या घटनेची माहिती दिली. या घटनेचा थरार सांगताना हा प्रत्यक्षदर्शी ढसाढसा रडत होता. खासकरून अपघातात दगावलेल्या बाळाच्या आठवणीने हा प्रत्यक्षदर्शी धायमोकलून रडत होता.

या प्रत्यक्षदर्शीने माळशिरसमधील अपघाताचा घटनाक्रमच सांगितला. माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर महामार्गावरील भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 7 जण बचावले आहेत. अपघातातील 6 महिन्याच्या बाळाचा मृतदेह बाहेर काढणारा हा प्रत्यक्षदर्शी धायमोकलून रडला. विहिरीत पडलेल्या गाडीमागे मी होतो. माझ्यासमोर ही गाडी विहिरीत पडली. जवळपास 200 फूट अलीकडून गाडी हेलकावे खाते होती आणि शेवटी ती विहिरीत पडली. गाडी विहिरीत पडली तेव्हा मी गावकऱ्यांना कॉल केला आणि पाण्यात उडी मारली. पाण्यात असलेल्या 3 वर्षाच्या मुलाला बाहेर काढले, असं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

काही मिनिटात ग्रामस्थ आले आणि त्यांनीही 4 लोकांना बाहेर काढले. या अपघातात मृत्यू पावलेल्या 6 महिन्याच्या बाळाला माझ्या हाताने मी बाहेर काढले. माझ्या डोळ्यात अजूनही पाणी येतंय. त्या बाळाची वेणी घातलेली माझ्या डोळ्यासमोर दिसतेय, असं हा प्रत्यक्षदर्शी म्हणाला. हे सांगताना प्रत्यक्षदर्शी ढसाढसा रडत होता.

गोरे यांचा इशारा

दरम्यान, रस्त्याचे काम निकृष्ठ तसेच तंत्रशुद्ध नसल्याने वारंवार अपघात होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि एमएसआरडीसीच्या काही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

धोकादायक स्पॉट

माळशिरसमधील भीषण अपघातानंतर सातारा-पंढरपूर महामार्गावरील आणखी धोकादायक स्पॉट समोर आले आहेत. याच महामार्गावरील पिलीव गावातून जाणाऱ्या कालव्यावर संरक्षक कठडे नसल्याने ग्रामस्थ आणि प्रवासी धोकादायक प्रवास करत आहेत. नीरा उजवा कालव्यावर असलेल्या पुलाला संरक्षक कठडे नसल्याचे समोर आलं आहे. एमएसआरडीसीला वारंवार पत्रव्यवहार करूनही या पुलावर संरक्षक कठडे उभारण्यात आलेले नाहीत. यापूर्वी अनेक वाहने या कालव्यात कोसळलेत. मात्र तरीही प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. जवळच असलेल्या शाळेतील विद्यार्थी देखील जीव मुठीत घेऊन प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. माळशिरस पंचायत समितीचे उपसभापतींच्या कुटूंबातील व्यक्तीदेखील याच कालव्यात पडून मृत्यू पावले होते. त्यामुळे येत्या 10 दिवसात या पुलावर कठडा न केल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Follow Us
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं...
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत
शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव!
Pune Mordern School First Day | शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव! उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा उल्लेख करत राऊतांनी अखेर सगळंच सांगितलं
सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार
Gold -Silver Rate | सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार, तर चांदीचा भाव काय?
रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर..
Rohit Pawar Protest | रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर 4 जुलैला पुन्हा रणशिंग
तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?
tv9 Marathi Special Report | तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?; तर जरांगेंचा सरकारला थेट इशारा काय?
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
Solapur | काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?