AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kamala Harris | कमला हॅरिस यांच्याकडून विजयाचे श्रेय आईला, जो बायडन यांनाही धन्यवाद

कमला हॅरिस यांनी विजयानंतर देशाला संबोधित केले. कमला हॅरिस यांनी विजयाचे श्रेय त्यांच्या आई श्यामला गोपालन यांना दिले आहे. US Vice-President Kamala Harris remembers her late Mother Shyamala Gopalan

Kamala Harris | कमला हॅरिस यांच्याकडून विजयाचे श्रेय आईला, जो बायडन यांनाही धन्यवाद
| Updated on: Nov 08, 2020 | 11:44 AM
Share

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस विजयी झाल्या आहेत.  डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कमला हॅरिस पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष  ठरल्या आहेत. कमला हॅरिस यांनी विजयानंतर देशाला संबोधित केले. कमला हॅरिस यांनी विजयाचे श्रेय त्यांच्या आई श्यामला गोपालन यांना दिले आहे. “श्यामला गोपालन यांनी अमेरिकेत मोठा संघर्ष केला, त्या वयाच्या 19व्या वर्षी भारतातून अमेरिकेत आल्या होत्या.”, असं कमला हॅरिस यांनी सांगितले. (US Vice-President Kamala Harris remembers her late Mother Shyamala Gopalan)

कमला हॅरिस यांनी ” मी देशातील पहिली महिला उपराष्ट्राध्यक्ष झाली आहे, मात्र, शेवटची ठरु नये,” असे म्हटले. देशातील जनतेला संबोधित करताना कमला हॅरिस यांनी त्यांच्या आईबद्दल भावना व्यक्त केल्या. “माझी आई भारतातून अमेरिकेत आली होती, त्यांनी आजच्या क्षणाची कल्पना केली नसेल, मात्र, अमेरिकेत हे अशक्य नाही, अशी त्यांची भावना होती. ” कमला हॅरिस यांनी यशाचे श्रेय आई श्यामला गोपालन यांना दिले. हॅरिस यांनी भाषणात अमेरिकेतील श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय महिलांचा उल्लेख केला.

देशातील ज्या श्वेत आणि कृष्णवर्णीय महिला न्याय, अधिकार, स्वातंत्र्यासाठी बलिदान देतात. त्या लोकशाहीचा कणा आहेत. अमेरिकेत 100 वर्षांपूर्वी महिलांनी मताधिकारासाठी लढा दिला, आज महिला त्यांच्या हक्क आणि अधिकारासांठी मतदान करतात, असं कमला हॅरिस म्हणाल्या.  कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल जो बायडन यांचे आभार मानले आहेत.

वकील ते उपराष्ट्राध्यक्ष प्रवास

मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरिस यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. कमला हॅरिस यांचा 20 ऑक्टोबर 1964 रोजी कॅलिफोर्नियाच्या ऑकलंडमध्ये जन्म झाला. त्यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे आफ्रिकेचे असून आई श्यामला गोपालन भारतीय आहेत. श्यामला गोपालन या तामिळनाडूतील चेन्नईच्या असून त्या स्तन कँसर रोगतज्ज्ञ होत्या. यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले येथे डॉक्टरेट करण्यासाठी त्या 1960मध्ये तामिळनाडूहून अमेरिकेत आल्या होत्या. कमला यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या कमला हॅरिस या पहिल्या आशियाई महिला आहेत. त्या डेमोक्रॅटच्या गेराल्डाइन फेरारो आणि रिपब्लिकनच्या सारा पॉलिननंतरच्या प्रमुख पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या तिसऱ्या महिला आहेत. कमला यांचं शिक्षण ऑकलंडमध्येच झालं. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून पदवी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यांनी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये जिल्हा अ‌ॅटर्नी म्हणून काम पाहिलं आहे. 2003मध्ये त्या सॅनफ्रान्सिस्कोमध्ये जिल्हा वकील बनल्या होत्या.

संबंधित बातम्या:

Kamala Harris | भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय, अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांचा पराभव

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकताच बायडन यांचं पहिलं ट्विट, म्हणतात…

(S Vice-President Kamala Harris remembers her late Mother Shyamala Gopalan)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.