AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’मध्ये जे घडलं तेच पाकिस्तानात…उझैर बलोचच्या भावावर धाड-धाड गोळीबार, ल्यारीत गँगवॉर भडकणार

Lyari Gang War : धुरंधर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कराचीतील कुख्यात ल्यारीत पुन्हा एकदा दोन गटातील वाद उभाळून आल्याचे समोर आले आहे. उझैर बलोचच्या भावावर गोळीबार करण्यात आला आहे.

‘धुरंधर’मध्ये जे घडलं तेच पाकिस्तानात…उझैर बलोचच्या भावावर धाड-धाड गोळीबार, ल्यारीत गँगवॉर भडकणार
Firing on Uzair baloch brotherImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 31, 2026 | 9:06 PM
Share

गँगवॉरमुळे पाकिस्तान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धुरंधर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कराचीतील कुख्यात ल्यारीत पुन्हा एकदा दोन गटातील वाद उभाळून आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी सायंकाळी कुख्यात गँगस्टर उझैर बलोच याचा भाऊ जुबैर बलोच याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिर्झा आदम खान रोडवरील या घटनेत किमान तीन जण जखमी झाले आहेत.

कराची साऊथच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘जखमींपैकी एक जण हा बंदी घालण्यात आलेल्या पीपल्स अमन कमिटी या संघटनेचा प्रमुख उझैर बलोच याचा भाऊ जुबैर बलोच असण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची अधिकृत ओळख अद्याप पटलेली नाही. डॉन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी चेहरे झाकले होते. त्यांनी जुबैरवर गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेवेळी जुबैर बलोच आपल्या घराबाहेर उभा होता.

धुरंधर चित्रपटात ल्यारी गँगवॉरची झलक

2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या धुरंधर सिनेमात अभिनेता दानिश पंडोर यांनी उझैर बलोचची भूमिका साकारली होती, तर उझैरचा गुरु रहमान डाकैत याची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना यांनी साकारली होती. हा चित्रपटात गँगवॉरची झलकही दाखवण्यात आली होती.

तपास सुरू

समोर आलेल्या माहितीनुसार, जुबैर बलोचला 2012 मध्ये अटक करण्यात आली होती आणि गेल्या वर्षी जानेवारीमध्ये त्याची सुटका झाली होती. पोलिस या हल्ल्याचा गँगमधील अंतर्गत वैर, वैयक्तिक शत्रुत्व आणि इतर शक्य कारणांवरून तपास करत आहेत. जुबैरवरील हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये ल्यारीतील गँगवॉर पुन्हा सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र कराची पोलिसांनी अद्याप या हल्ल्याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

ल्यारीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी जुबैर बलोच एका राजकीय पक्षात सहभागी झाला होता आणि त्याने परिसरात त्या पक्षाचे झेंडेही लावले होते. त्याच कार्यकर्त्याने असेही सांगितले की, कराची ऑपरेशन नंतर दुबई आणि इराणमध्ये पळून गेलेले काही गँगस्टर अमेरिका-इराण युद्धानंतर पुन्हा कराचीत परतल्याच्या अफवा परिसरात पसरल्या आहेत.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?