रस्त्याने चालताना समोर अचानक ‘माऊंटेन लायन’, 6 मिनिटांपर्यंत चाललेल्या पाठलागाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

रस्त्याने चालताना समोर अचानक 'माऊंटेन लायन', 6 मिनिटांपर्यंत चाललेल्या पाठलागाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक प्युमा ज्याला माऊंटेन लायन म्हणून ओळखलं जातं तो या व्यक्तींवर एकदा नाही तर अनेकदा चाल करुन येताना दिसत आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 13, 2020 | 8:01 PM

वॉशिंग्टन : रस्त्याने चालता चालता अचानक एखादा मांसभक्षी प्राणी समोर आला तर अगदी कुणाच्याही ह्रद्याचे ठोके चुकतील आणि त्याला आपला काळ समोर आल्याचं दिसेल. ही स्थिती माणसाला घाम फोडायला पुरेशी आहे. अशीच वेळ ओढावलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक प्युमा ज्याला माऊंटेन लायन म्हणून ओळखलं जातं तो या व्यक्तींवर एकदा नाही तर अनेकदा चाल करुन येताना दिसत आहे (Video of Cougar stalks Man in the US hill area get viral).

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्याने जात असताना त्याच्यासमोर अचानकपणे प्युमा म्हणजेच माऊंटेन लायन आला. यानंतर या व्यक्तीने उलटा जात मागे पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरम्यानच्या काळात या माऊंटेन लायनने जवळपास 6 मिनिटे पाटलाग करत झडप टाकण्याचा प्रयत्न केला. प्युमा आणि या व्यक्तीमधील जीवन मरणाच्या स्थितीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा उभा राहतो.

संबंधित व्हिडीओ अमेरिकन बास्केटबॉल प्लेअर Rex Chapman ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती रस्त्याने जात असताना अचानक समोरुन प्युमा येताना दिसतो. तो या व्यक्तीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न करतो. 59 सेकंदाच्या या व्हिडीओला रेक्सने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘हा व्यक्ती उटाजवळ स्लेट कॅनियनमध्ये फिरायला निघाला होता. त्यावेळी जवळपास 6 मिनिटं प्युमाने त्याचा पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.’

प्युमाला कूगर किंवा माऊंटेन लॉयनच्या नावाने देखील ओळखलं जातं. तो वाघ, बिबट्या यांच्या प्रजातीतील प्राणी आहे. तो उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात राहतो.

भारतातही या व्हायरल व्हिडीओवर प्राणीमित्रांकडून प्रतिक्रिया येत आहेत. प्राणीमित्रांनी म्हटलं आहे, “संबंधित व्हिडीओत तो व्यक्ती प्युमाला डिवचत आहे. त्यामुळे प्युमा स्वतःच्या रक्षणासाठी त्याला घाबरवतो आहे. प्युमाकडून हल्ले होण्याचं प्रमाणं अगदीच नाहीच्या बरोबर आहे. या व्हिडीओत हा व्यक्ती गाडीत बसला आहे आणि गाडी पुढं नेत त्याला घाबरवतो आहे.”

हा धडकी भरवणारा व्हिडीओ YouTube वर 3 लाखपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. ट्विटरवर देखील त्याला 30 लाख वेळा पाहिलं गेलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना काहीजण याला भीतीदायक म्हणत आहेत, तर काहीजण माणसाने प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केल्याने असे हल्ले होत असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा :

आमदार भास्कर जाधव यांचा मंदिरात गोंधळ; वयोवृद्ध व्यक्तिला शिवीगाळ करत मारहाण

“बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे” चिमुरड्याची रडत देवाकडे प्रार्थना

“मोदींनी 15 लाख बुडवले, पण काकूंनी तक्रार केली नाही, आता 1800 ची नोट काढा” व्हायरल काकूंनंतर काका जोशात

Video of Cougar stalks Man in the US hill area get viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें