ग्लोबल वॉर्मिंगमुळे नवं संकट; लॉस एंजालिस शहरापेक्षाही मोठ्या आकाराचा हिमनग झाला वेगळा

Rohit Dhamnaskar

Rohit Dhamnaskar |

Updated on: Mar 02, 2021 | 10:19 AM

या विलग झालेल्या हिमनगाचा आकार 1270 वर्ग किलोमीटर आहे. | giant iceberg

ग्लोबल वॉर्मिंगमुळे नवं संकट; लॉस एंजालिस शहरापेक्षाही मोठ्या आकाराचा हिमनग झाला वेगळा
अंटार्क्टिका येथील बर्फाळ जमिनीत भेग पडल्याची ही गेल्या दहा वर्षातील तिसरी मोठी घटना आहे.

नवी दिल्ली: ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्क्टिका खंडातील (antarctic) मोठ्या हिमनगांचे तुकडे होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. आतादेखील अशाच एका हिमनगाचा तुकडा अंटार्क्टिकापासून विलग झाल्याने शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटिशी अंटार्क्टिका सर्वेक्षणाच्या (BAS) माहितीनुसार, नुकताच एक हिमनग तुटल्याचे समोर आले. या विलग झालेल्या हिमनगाचा आकार 1270 वर्ग किलोमीटर आहे. याची तुलना करायची झाल्यास हिमनगाच्या या तुकड्याचा आकार अमेरिकेतील लॉस अँजेलिस शहरापेक्षाही मोठा आहे. (giant iceberg break off antarctic base)

अंटार्क्टिका येथील बर्फाळ जमिनीत भेग पडल्याची ही गेल्या दहा वर्षातील तिसरी मोठी घटना आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये याठिकाणी भेग पडली होती. त्यानंतर 26 फेब्रुवारीला या हिमनगाचा एक तुकडा वेगळा झाला. वातावरणातील बदलांमुळे बर्फ वितळण्याचा वेग वाढल्यामुळे हिमनग विलग होण्याचे प्रमाण वाढल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

डिसेंबर महिन्यातही मोठा हिमनग झाला होता विलग

गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यातही अंटार्क्टिकात एक मोठा हिमनग वेगळा झाला होता. तब्बल सहा हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा हिमनग (Iceberg) तुटून दक्षिण जॉर्जियाच्या दिशेनं समुद्रात पुढे सरकत गेला होता. या हिमनगाचा आकार दिल्ली शहराएवढा होता. हिमाच्छादित भागात हिमकडे, हिमनग तुटण्याची घटना सामान्य असते, ती वारंवार घडत असते; पण अंटार्क्टिकामधील हिमनग वेगळे होणं हा देखील पर्यावरण बदलाचा (Climate Change) परिणाम असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, आगामी काही वर्षांमध्ये हिमनगाच्या वितळण्यामुळे जगभरातील महासागरांची (Sea Level) पाणी पातळी किमान दहा सेंटीमीटरनं वाढण्याचा धोका आहे.

हिमनग विलग होण्याचे दुष्परिणाम काय?

पेंग्विन, सील यासारखे प्राणी हे खाद्याच्या शोधात समुद्रात खूप दूरवर जात असतात, ते या हिमनगामुळे रस्ता चुकतील आणि पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परत येऊ शकणार नाहीत. यामुळे खाद्य कमी पडल्यानं या प्राण्यांच्या पिल्लांचा मृत्यूही होऊ शकतो. याशिवाय, समुद्रातील जहाजांनाही त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

Glacier meaning : महापुरामुळे विनाश घडवणारा हिमकडा म्हणजे काय? उत्तराखंडापासून हरिद्वारपर्यंत अलर्ट कशासाठी?

उत्तराखंडमधील हिमकडा कशामुळे कोसळला?, अमेरिकेच्या संशोधकांचा खळबळजनक दावा

(giant iceberg break off antarctic base)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI