व्लादिमीर पुतिन यांनी मान्य केली पहिल्यांदाच मोठी चूक, म्हणाले, त्याला रशिया जबाबदार असून ती एक…
रशिया युक्रेन युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसत आहेत. व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिका दाैरा देखील केला. मात्र, तरीही हे युद्ध रोखण्यात यश मिळाले नाही. आता नुकताच व्लादिमीर पुतिन यांनी आपली एक अत्यंत मोठी चूक मान्य केली आहे.

रशिया युक्रेन यांच्यातील युद्ध चांगलेच पेटल्याचे सध्या बघायला मिळतंय. अमेरिकेने या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमेरिकेलाही हे युद्ध रोखण्यात यश मिळाले नाही. या युद्धाची झळ फक्त रशिया आणि युक्रेन यांनाच नाही तर जगातील अनेक देशांना बसताना दिसत आहे. जग दोन भागांमध्ये विभागले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एक मोठा विमान अपघात झाला. अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळले. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली आणि आरोप प्रत्यारोपाचे जोरदार सत्र रंगले. हे विमान अझरबैजानची राजधानी बाकूहून रशियातील चेचन्या प्रदेशाची राजधानी ग्रोझनी येथे जात होते. यादरम्यानच हे विमान कोसळले. काही कारणामुळे हे विमान कझाकस्तानला वळवण्यात आले, जिथे त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आली.
या घटनेदरम्यान विमान अक्ताऊ शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर कोसळले. धक्कादायक म्हणजे विमानाची सरळ दोन तुकडे झाली. या अपघातात 38 लोकांचा जीव गेला. हा अपघात नेमका कसा झाला हे कळूच शकले नाही. आता यावर अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी विमान अपघातासाठी रशिया जबाबदार असल्याचा खुलासा केला. ज्याने जगात एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. रशियाने थेट आपली चूक मान्य केली.
पुतिन म्हणाले की, रशियाची हवाई संरक्षण प्रणाली या अपघातासाठी जबाबदार आहे. रशियन हवाई संरक्षण प्रणालींनी युक्रेनियन ड्रोनला लक्ष्य करून क्षेपणास्त्र टाकली जे विमानाजवळ स्फोट झाले आणि त्यामुळे ते कोसळले. या विमान अपघातानंतर अनेक दावे करण्यात आली. मात्र, ठोस काहीही माहिती या विमान अपघाताबद्दल मिळू शकली नव्हती. रशियावर त्यादरम्यान आरोप करण्यात आली. मात्र, त्यावेळी रशियाने माैन बाळगले होते.
आता नुकताच पुतिन यांनी त्या विमान अपघाताची जबाबदारी स्वीकारली असून युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला असताना विमानाच्या जवळ स्फोट झाल्याने विमानाचा अपघात झाल्याचे स्पष्ट पुतिन यांनी म्हटले असून चूक मान्य केली आहे. पुतिन यांनी विमान अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होण्याचे आश्वासन देत पीडितांना नुकसान भरपाई रशिया देणार असल्याचेही जाहीर केले.
