AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही एका आठवड्यात इस्लामाबाद ताब्यात घेणार’, ‘या’ नेत्याच्या घोषणेमुळे पाकिस्तानात खळबळ

भारताने केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच पाकिस्तानात अंतर्गत कलह देखील सुरु आहे. आता एका नेत्याने इस्लामाबादवर कब्जा करण्याची भाषा केली आहे.

'आम्ही एका आठवड्यात इस्लामाबाद ताब्यात घेणार', 'या' नेत्याच्या घोषणेमुळे पाकिस्तानात खळबळ
Shahbaz Sharif
| Updated on: Jun 30, 2025 | 4:51 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात अशांतता आहे. भारताने केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच पाकिस्तानात अंतर्गत कलह देखील सुरु आहे. अनेकदा बलूच लिबरेशन आर्मीने पाकच्या सैन्यावर हल्ले केले आहेत. त्यानंतर आता जमियत-उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तानचे प्रमुख मौलाना फजल-उर रहमान यांनी शाहबाज शरीफ सरकारला मोठा इशारा दिला आहे. एका आठवड्यात आमचे लोक इस्लामाबाद ताब्यात घेतील असं मौलाना फजल-उर रहमान यांनी म्हटलं आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

बट्टाग्राम येथील एका रॅलीत बोलताना मौलाना फजल-उर रहमान यांनी म्हटले की, ‘आमच्या लोकांवर अत्याचार होत आहेत, जे योग्य नाही. सरकारला आमची ताकद माहित नाही. आमचे लोक एका आठवड्यात इस्लामाबाद ताब्यात घेऊ शकतात. यापूर्वी आम्ही सरकारचा पाया हादरवला होता.’

सरकार बेकायदेशीर – फजल उर रहमान

पुढे बोलताना, फजल उर रहमान यांनी म्हटले की, ‘हे सरकार बेकायदेशीर आहे. 2024 च्या निवडणुका फसव्या पद्धतीने घेण्यात आल्या. जे सत्तेत आहेत ते सर्व फसव्या पद्धतीने निवडून आले आहेत.2018 मध्येही सार्वत्रिक निवडणुका लवकर झाल्या होत्या. त्यावेळीही एक बनावट सरकार आले होते, जे आम्ही उखडून टाकले. या सरकारने त्यातून धडा शिकायला हवा.

सरकार फार काळ टिकणार नाही

मौलाना म्हणाले की, ‘सध्याचे सरकार आमच्या पक्षात भांडण लावू इच्छित आहे. आम्ही राष्ट्रीय एकतेच्या मुद्द्यावर आवाज उठवत आहोत, परंतु जर गरज पडली तर आम्ही पाकिस्तानात जिहाद सुरू करू. हे सरकार आता फार काळ टिकणार नाही. शाहबाज शरीफ यांचे सरकार स्वतःला शक्तिशाली समजत आहे मात्र त्यांनी जनतेच्या इच्छेपुढे झुकले पाहिजे.’

मुनीर यांना फटकारले

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. यावर बोलताना फजल-उर रहमान म्हणाले की, ‘मुस्लिमांचा खून करणारा अमेरिका. पॅलेस्टाईन, लिबिया आणि सीरियामध्ये लाखो मुस्लिमांना मारणारा अमेरिका, आता आम्ही त्याच्याशी हातमिळवणी करत आहोत. जर ट्रम्प असतील तर शांतता नसेल आणि जर शांतता असेल तर ट्रम्प नसेल.’

ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.