AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपला देश सोडून ग्रीसला जात आहेत श्रीमंत लोक, काय आहे त्या देशाचे वैशिष्ट्ये ?

रोकॉस शिवाय लक्ष्मी मित्तल आणि नसीफ साविरिस सारखे मोठे व्यावसायिक ब्रिटन सोडून दुसऱ्या देशात गेले आहेत. प्रत्येक व्यक्ती देश बदलण्याचे कारण वेगवेगळे असू शकते. आणि याला केवळ टॅक्सचे प्रकरण मानले जाऊ शकत नाही.

आपला देश सोडून ग्रीसला जात आहेत श्रीमंत लोक, काय आहे त्या देशाचे वैशिष्ट्ये ?
Greece
| Updated on: Sep 09, 2026 | 6:01 PM
Share

जगभरातील अब्जाधीश करदाते आता ग्रीस ( अथेन्स ) कडे जात आहेत. गेल्या २ ते ३ वर्षांत हा ट्रेंड सुरु झाला आहे. आता अलिकडे ब्रिटनचे अब्जाधीश हेज फंड मॅनेजर क्रिस रोकॉस यांनी लंडन सोडल्याने ही चर्चा सुरु झाली आहे. क्रिस रोकॉस यांनी आपल्या टॅक्स रेजिडेन्सी ग्रीसमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. रोकॉस कॅपिटल मॅनेजमेंटचे फाऊंडर रोकॉस यांनी गेल्यावर्षी ब्रिटनमध्ये सुमारे ३३० मिलियन पाऊंड म्हणजे सुमारे ४,२३५ कोटी रुपयांचा टॅक्स दिला आहे.

आता अब्जाधीशांनी ग्रीसकडे जाण्याचा निर्णय का घेतला ? ग्रीस एवढा आकर्षक का झाला आहे. रोकॉस यांचा निर्णय केवळ एक व्यावसायिकाचे देश बदलणे आहे. ही युरोपमध्ये श्रीमंत लोकांचा बदलता कल दाखवत आहे. ग्रीस आता त्या लोकांना आकर्षित करत आहे जे कमी कर,चांगले हवामान, समुद्रच्या किनाऱ्यावरील जीवन आणि युरोपमध्ये राहण्याची सुविधा या सर्वांना मिळवू इच्छीत आहेत. परंतू किती करोडपती ग्रीसला जात आहेत. आणि यामागे नेमकी कारणे काय आहेत ?

किती करोडपती ग्रीसला चालले

वेल्थ मायग्रेशनवर काम करणारी संस्था हेनली एंड पार्टनर्सच्या रिपोर्टनुसार २०२५ मध्ये ग्रीसमध्ये सुमारे १,२०० करोडपती आल्याचा अंदाज होता. आकडा ग्रीसला जगातील त्या देशांत सामील आहे, जो श्रीमंत लोकांना आकर्षित करतो. २०२६ च्या हेनली रिपोर्टमध्ये ग्रीसला जगातील त्या देशांमध्ये समाविष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय संपत्ती असणाऱ्या लोकांना ग्रीस आकर्षित करत आहे. असे नाही की ब्रिटनचे लोकच ग्रीसमध्ये स्थलांतरीत होत आहे. ग्रीसमध्ये येणारे श्रीमंत लोक वेगवेगळ्या देशांचे नागरित आहेत. ग्रीसची सर्वात मोठी खासियत त्यांचा नॉन-डोम टॅक्स रेसिडेन्सी प्रोग्रॅम आहे. याअंतर्गत काही अटी पूर्ण करणारे नवीन विदेशी टॅक्स रेजिडन्ट आपल्या परदेशातून होणाऱ्या इन्कमवर दर वर्षी एक लाख युरोचा फ्लॅट टॅक्स देऊ शकतात.

ही सुविधा किमान १५ वर्षांपर्यंत मिळू शकते. म्हणजे परदेशातून होणाऱ्या मोठ्या कमाईवर देखील टॅक्सची रक्कम एक निश्चित मर्यादेपर्यंत राहू शकते. ही गोष्ट त्या लोकांसाठी खास आहे ज्यांची कमाई खूप जास्त आहे. उदाहरणार्थ जर कोणा अब्जापतीची परदेशातून होणारे उत्पन्न करोडो युरोमध्ये असते. तर सामान्य इन्कम टॅक्सच्या तुलनेत १ लाख युरोचा निश्चित टॅक्स कमी पडू शकतो. मात्र, ही सुविधा प्रत्येक श्रीमंत व्यक्तीला आपोआप मिळत नाही. यासाठी ग्रीसच्या टॅक्स नियमांतर्गत पात्रता आणि अटी पूर्ण करावे लागते.

ब्रिटननंतर ग्रीस आवडते ठिकाण

ब्रिटनमध्ये श्रीमंत लोकांना टॅक्सचे वातावरण आधी सारखे नाही. सरकारने नॉन-डोम स्टेटस संपवले आहे. ही व्यवस्था आधी त्या लोकांना काही कर सवलत देत होती.ज्याचे स्थायी घर ब्रिटनच्या बाहेर मानले जात होते. आता परदेशातून होणारे उत्पन्न आणि संपत्तीवर टॅक्स संदर्भातील नियम कठोर झाले आहेत. याच बरोबर ब्रिटनमध्ये कॅपिटल गेन, वारसा आणि प्रायव्हेट इक्विटीनी जोडलेला टॅक्स संदर्भात श्रीमंत लोकात चिंता वाढली आहे. रोकॉस शिवाय लक्ष्मी मित्तल आणि नसीफ साविरिस सारख्या मोठ्या व्यावसायिकानी ब्रिटन सोडले आहे. आणि ते दुसऱ्या देशात गेले आहेत. प्रत्येक व्यक्ती देश बदलण्याचे कारण वेगवेगळे असू शकते. आणि यामागे केवळ टॅक्स सवलतीचे कारण मानले जाऊ शकत नाही.

Follow Us
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....