‘पाकिस्तानकडून तेल खरेदी करु शकतो भारत,’ ट्रम्प यांच्या दबावनिती मागची 3 कारणे
अमेरिकेने पाकिस्तानशी करार केला आहे आणि असेही म्हटले आहे की अमेरिका कच्च्या तेलासाठी पाकिस्तानला मदत करेल. त्याच वेळी ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ लावून मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामागील हेतू नेमके काय ?

अमेरिकेने पाकिस्तानला गोंजारत डील केली आहे. आणि आता अमेरिका तेलाचा पहिला स्लॉट पाकिस्तानला पाठवत आहे. पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या रिफायनरी कंपनी एनर्जीला ऑक्टोबरमध्ये १ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा होणार असल्याचे कंपनीच्या अधिकारी उसामा कुरेशी यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.
या बातमीच्या एक दिवस आधीच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर दबाव वाढवत सांगितले होते की काय माहिती येणाऱ्या काळात भारताला पाकिस्तानकडून तेल खरेदी करावे लागेल ? ट्रम्प यांचे हे वक्तव्य पाकिस्तानसाठी चांगली गोष्ट असेल नसेल पण भारतावर दबाव टाकण्याची निती दिसत आहे. या नितीमागे काय नेमकी कारणं आहेत हे पाहूयात…
ट्रम्प यांची दबावाची रणनीती!
अमेरिका पाकिस्तानला कच्च तेलाची पहिली खेप व्यापार डील झाल्यानंतर पाठवत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफसह रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड लावण्याची देखील धमकी दिली आहे. हा टॅरिफ ७ ऑगस्ट पासून प्रभावी होऊ शकतो. तर ट्रम्प यांनी भारतावर तिखट शब्दात हल्लाबोल करीत भारताच्या अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी म्हटले आहे.
भारत दबावाखाली येणार नाही
सरकारी अधिकाऱ्यांच्या दुजाऱ्याने आलेल्या काही बातम्यानुसार भारत दबावाखाली करार करणार नाही. तो आपल्या कृषी, डेअरी आणि MSME सेक्टर्सशी कोणतीही तडजोड करणार नाही, भारतासाठी शेतकऱ्यांचे हित सर्वोपरि आहे.
भारताला तेल विकू शकतो पाकिस्तान – ट्रम्प
ट्रम्प यांनी येणाऱ्या काळात पाकिस्तान भारताला तेल विकू शकतो असा दावा केला आहे. परंतू पाकिस्तान तेल उत्पादनाच्या बाबतीत खूप मागे आहे. जुलै २०२५ पर्यंत पाकिस्तानचे कच्च्या तेलाचे उत्पादन सुमारे ६२,००० बॅरल प्रति दिन आहे. जे जगातील ५३ व्या क्रमाकांवर आहे. तर भारताकडे तेल खरेदी करण्यासाठी रशिया आणि इराण शिवाय देखील अनेक पर्याय आहेत. त्यात सौदी अरब, युएई, कुवैत, ब्राझील आणि कतार यांचा समावेश आहे.
ट्रम्प यांच्या दबावतंत्राचे कारण?
1. भारतावर अमेरिकेने लावलेले टॅरिफ ट्रम्प यांच्या व्यापार रणनितीचा एक भाग दिसत आहे. ट्रम्प भारतावर अतिरिक्त दबाव वाढवू इच्छीत आहेत, म्हणजे भारत अमेरिकेच्या तालावर व्यापार करारासाठी तयार होईल.
2. रशियासंदर्भातही ट्रम्प वारंवार भारतावर टीप्पणी करत आहेत आणि तेल- डिफेन्स आयातीवर नाराजी व्यक्त करीत आहेत. ट्र्म्प यांची इच्छा अशी आहे की भारताने रशियाच्या ऐवजी अमेरिकेकडून शस्रास्रे खरेदी करावीत आणि कच्चे तेल आयात करावे. २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यात भारताने आपल्या एकूण तेल पुरवठ्याचा ३५ टक्के भाग रशियाकडून खरेदी केला आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी पेनाल्टी लावण्याचा इशारा दिला आहे.
3. ट्रेल डील बाबत भारत आणि अमेरिकेत अजूनही करार झालेला नाही. कारण भारत कोणत्याही प्रकारे कृषी आणि डेअरी प्रोडक्ट्सवर टॅरिफ कमी करण्यावर राजी होऊ इच्छीत नाही. परंतू ट्रम्प यांची इच्छा आहे की भारताने अमेरिकेसाठी मार्केट खोलावे. डील संदर्भात ट्रम्प कोणताही आशावाद दिसेना म्हणून त्यांनी चिडून टॅरिफची घोषणा केली आहे.
