AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा-जेव्हा ट्रम्प अडचणीत, तेव्हा होतो गोळीबार, ताज्या हल्ल्याने पुन्हा नवी चर्चा

Attack on Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर साल २०२४ मध्येही निवडणूक रॅलीत गोळीबार झाला होता. अशा प्रकारच्या घटनानंतर नेहमीच दावे प्रतिदावे केले जातात. ट्रम्प जेव्हा जेव्हा संकटात असतात तेव्हाच त्यांच्यावर हल्ला का होतो असा सवाल केला जात आहे.

जेव्हा-जेव्हा ट्रम्प अडचणीत, तेव्हा होतो गोळीबार, ताज्या हल्ल्याने पुन्हा नवी चर्चा
Attack on Donald Trump
| Updated on: Apr 26, 2026 | 5:36 PM
Share

वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलात ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यात ट्रम्प वाचले आणि हल्लेखोर पकडला गेला आहे. मात्र, अमेरिकेत साल २०२४ मध्येही निवडणूकीच्या वातावरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला हा जगभरात चर्चेचा विषय बनला होता. ट्रम्प यांचा रक्ताने माखलेला चेहरा, चारी बाजूने उभे असलेले अमेरिकन सीक्रेट सर्व्हीसचे एजंट आणि ट्रम्प यांनी समर्थकांच्या दिशेने मुठ उठवत केलेला इशारा…हा फोटो काही क्षणात आयकॉनिक बनला होता. मात्र, आता या घटनेनंतर आता ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात झालेल्या हल्ल्याचा कटाची थिअरी पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आहे.

बटलर रॅलीची घटना …

ही घटना बटलर, पेन्सिल्वेनियात एका निवडणूक रॅली दरम्यान झाली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प यांचे एजंट त्यांना तातडीने व्यासपीठापासून सुरक्षित स्थानावर घेऊन जात होते. या दरम्याने घेतलेल्या फोटोत ट्रम्प यांचा रक्ताने भिजलेला चेहरा आणि त्यांनी आपल्या समर्थकांच्या दिशेने उचलेली मूठ दिसत होती.

सोशल मीडिया आणि कटाचे दावे

या घटनेनंतर लागलीत काही तासात इंटरनेटवर अनेक दावे केले जात होते. काही लोकांनी ही घटना स्टेज्ड वाटत होती आणि ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेला फायदा पोहचवण्यासाठी रचलेली कहानी वाटत होती. हा दावा अजूनही संपलेला नाही. ट्रम्प यांच्या समर्थकातील काही लोकांनी देखील हा दावा पुन्हा करायला सुरुवात केली होती. कॉमेडियन टिम डिलन यांनी त्यांच्या पॉडकास्ट मध्ये म्हटले होते की बटलर येथील घटना स्टेज केली होती. निवडणूकीत लोक असे करतात असे म्हटले होते. डाव्या विचारसरणीच्या टककर कार्लसन आणि मार्जोरी टेलर ग्रीन यांचे वक्तव्य देखील या थिअरीच्या दिशेने हवा देताना दिसत होते.

जगात आधीही असे आरोप झाले होते

असे पहिल्यांदा झालेले नाही एखाद्या मोठ्या हल्ल्याला ‘स्टेज्ड’ ( बनावट ) म्हटले गेले असेल. १९९५ मध्ये इस्रायलचे पंतप्रधान यित्झाक राबिन यांच्या हत्ये संदर्भात देखील काही डाव्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे आरोप केले होते. तसेच २०२२ मध्ये अर्जेंटीनाचे उप राष्ट्रपती क्रिस्टीन फर्नांडिस डी किर्चनर वर बंदूक ताणण्याच्या घटनेनंतर देखील आरोप लागले की यास भ्रष्टाचाराच्या केसवरुन लक्ष हटवण्यासाठी रचलेला डाव म्हणण्यात आले. तपासात काय पुढे आलेय़

बटलरची घटना हजारो लोक, पत्रकार आणि कॅमेऱ्यांच्या समोर झाले होते. व्हीज्युअल फॉरेन्सिक तपासात पुढे आले की एक व्यक्तीजवळ इमारतीच्या छतावर चढला आणि ट्रम्प यांच्या दिशेने आठ गोळ्या झाडल्या. यात एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला स्पर्शून गेली होती. या हल्यात एक व्यक्ती कोरी कॉम्पेरेटोर यांचा मृत्यू झाला होता. तर दोन अन्य गंभीर स्वरुपात जखमी झाले होते. हल्लेखोराला जागेवरच सीक्रेट सर्व्हीसने ठार केले होते. नंतर एफबीआयने त्याची ओळख २० वर्षीय थॉमस क्रुक्स अशी केली होती.

कोणी- कोणी केले आरोप ?

या घटनेनंतर वेगवेगळ्या राजकीय विचारधारेतील लोकांनी पुराव्यांशिवाय अनेक आरोप केले होते. काहींनी जो बायडन, काहींनी एफबीआय, काहीनी इस्रायल तर काहींनी स्वत: ट्रम्प यांच्यावर हा हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप लावला होता. मात्र, या दाव्यांच्या समर्थनार्थ कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाही.

कोणताही हल्ल्याचा बनाव करणे शक्य आहे का ?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मीडिया प्रोडक्शन तज्ज्ञ स्पेन्सर पार्सन्स यांनी एक काल्पनिक विश्लेषण केले. त्यांनी सांगितले की चित्रपटात शुटींगचा सीन तयार करण्यासाठी डायरेक्टर, कॅमेरा टीम, लायटींग, साऊंड, स्पेशल इफेक्ट्स आणि सेफ्टी टीम सारख्या मोठ्या संख्येत लोकांची गरज लागते. मात्र, एवढ्या मोठ्या घटनेला ‘स्टेज’ करायचे असेल तर कमीत कमी लोकांना सामील करावे लागेल, कारण त्याची गुप्तता राखणे अवघड ठरेल. त्यामुळे असा बनाव रचने अवघड असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बटलर येथील लाईव्ह रॅलीत असे करणे शक्य नव्हते, कारण केवळ एक संधी असते. चारही बाजूंनी पत्रकार आणि सर्वसामान्य लोक, मोबाईल कॅमेरे कोणत्याही डिजिटल छेडछाडीची शक्यता समाप्त करतात.

‘फेक हल्लेखोर’ आणि परफेक्ट टायमिंगचे आव्हान

जर असा बनाव करायचा असेल तर हल्ले खोराला अशा जागी ठेवावे लागेल जेथे लोक त्याला पाहू शकतील, तो फायर देखील करु शकेल आणि सुरक्षा एजन्सीनी त्याला आधीच ठार देखील करु नये. या साठी एक परफेक्ट टायमिंग हवे, जे जवळपास अशक्य आहे. आणि हल्लेखोराला इतका अचूक निशाला लावाला लागेल की त्याने ट्रम्प यांच्या खूप जवळ गोळी मारावी आणि त्यांना काही होऊ नये, हे खूपच कठीण काम आहे असे तज्ज्ञ स्पेन्सर पार्सन्स यांनी म्हटले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल