चीनचा सर्वात मोठा कर्जदार कोण ? पाकिस्तान तर किस झाड की पत्ती, मग कोण ?
जगातील दुसरा सर्वात मोठा आर्थिक महासत्ता असलेला चीन हा आता अमेरिकेच्या पुढे जाण्याच्या बेतात आहे. चीनने विकसनशील देशांनाच नव्हे तर श्रीमंत देशांना देखील कर्जे दिलेली आहेत.

जो दरवेळी दुसऱ्यांना सावध करत असतो की चीनच्या सरकारी बँकांतून मिळणाऱ्या कर्जावर भरोसा करु नका , तोच आता दोस्त बनून मलई खात आहे. त्याच्या ओठात एक आणि पोटात एक आहे. आपण बरोबर ओळखले हा देश म्हणजे अमेरिका आहे. आता एका नव्या अहवालात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. अमेरिका अनेक वर्षांपासून चीनची कर्जे विकसनशील देशांना जाळ्यात अडकवत आहेत आणि त्यांना महाशक्ती बनण्यापासून रोखतात असे म्हणत आला आहे.परंतू या नव्या अहवालाने धक्का बसला आहे.
आपण आतापर्यंत चीनचा सर्वात मोठी कर्जदार पाकिस्तान असेल असे समजत होतो. परंतू सत्य काही वेगळे आहे. अमेरिकाच चीनचा सर्वात मोठा कर्जदार आहे. चीनच्या सरकारी बँकातून अमेरिकन कंपन्यांना आणि प्रकल्पांना गेल्या 25 वर्षात 200 अब्ज डॉलरहून अधिक कर्ज मिळाले आहे.
व्हर्जीनियाच्या विलियम एण्ड मॅरी कॉलेजच्या संशोधन लॅब एडडाटाच्या रिपोर्टनुसार चीनच्या सरकारी बँकांनी 2000 ते 2023 जगभरात 2.2 ट्रिलियन डॉलरहून अधिक कर्ज आणि अनुदान दिले आहे. या आधीच्या अंदाजानुसार दुप्पट आहे. यात अमेरिका सर्वात मोठा कर्जदार आहे. यातील अनेक कर्ज गुप्त ठेवलेली आहे. कारण पैसे थेट चीनमधून अमेरिकेत गेले नाही. त्याऐवजी केमॅन, आयलँड्स, बर्म्युडा, डेलावेअर आणि अन्य टॅक्स हेवन शेल कंपन्यांनाच्या द्वारे रुट केले गेले. त्यामुळे सोर्सचा पत्ता लपला गेला आहे.
एडडाटाच्या रिसर्चनुसार सर्वात चिंताजनक बाब ही आहे की यातील जास्त कर्जाच्या बदल्यात चीनी कंपन्यानी अमेरिकेतील कंपन्यात भागीदारी केलेली आहे. अनेक प्रकरणात या कंपन्या अमेरिकेसाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि महत्वाच्या तंत्रज्ञानाशी जुळलेल्या होत्या. ( उदा. रोबोटीक्स निर्माते, सेमीकंडक्टर कंपनी आणि बायोटेक फर्म ) अहवालातून समजते की चीने कर्जाचे नेटवर्क आधीच्या अंदाजा पेक्षा अधिक व्यापक आहे. हे कर्जाचे जाळे केवळ विकसनशील देशांपर्यंत मर्यादित नाही. ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स सारख्या धनाढ्य देश आणि अमेरिकेच्या सहकाऱ्यापर्यंत पसरलेले आहे.
हा अहवाल समोर आल्यानंतर व्हाईट हाऊसचे माजी गुंतवणूक सल्लागार विल्यम्स हेनागन यांनी सांगितले की जेव्हा उर्वरित जग चेकर्स खेळत होते तेव्हा चीन बुद्धीबळ खेळत होता. त्यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की गुप्त मार्गाने दिलेली कर्जे महत्वाच्या तंत्रज्ञानावर कब्जा मिळवण्याची चीनला ताकद देत आहेत. त्यांनी सांगितले की भविष्यातील युद्धे यावर अवलंबून असतील की अर्थव्यवस्था चालवणारे आवश्यक उत्पादनांवर कोणाचे नियंत्रण आहे.
एडडाटाच्या मते धनाढ्य देशांना दिलेले बहुतांशी कर्जे महत्वपूर्ण खनिज आणि हाय टेक संपत्तींवर केंद्रीत होती. उदा. लढाऊ विमान, पाणबुड्या. रडार सिस्टीम, अचूक मिसाईल आणि दूर संचार नेटवर्कसाठी आवश्यक रेअर अर्थ आणि सेमीकंडक्टर.
अमेरिका बनला चीनचा सर्वात मोठा कर्जदार
एडडाटाचे कार्यकारी संचालक ब्रॅड पार्क्स यांनी सांगितले की ट्रम्प आणि बायडेन दोन्ही प्रशासनानी एक दशकाहून अधिक वेळ ढोल बडवला आहे की बीजींग एक सावज हेरणारा कर्जदाता आहे. परंतू विडंबना पहा की अमेरिका स्वत: चीन सरकारकडून सर्वात मोठा कर्जदार बनला आहे..
