AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asim Munir : हाथ को आया मुँह न लगा, CDF पदाच्या बाबतीत असीम मुनीर यांच्यासोबत पाकिस्तानात असच घडू शकतं, शरीफ बंधूच गेम करणार का?

Asim Munir : पाकिस्तानात चीफ ऑफ डिफेंस फोर्सेज (CDF) हे नवीन पद आकाराला आलं आहे. असीम मुनीर हे पद मिळवणारे पहिले पाकिस्तानी ठरु शकतात. पण सध्या त्यांच्याबाबतीत हाथ को आया मुँह न लगा असं म्हटलं जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि परदेशात असलेले त्यांचे बंधु नवाज शरीफ मिळून असीम मुनीर यांचा गेम करु शकतात. ही शक्यता नाकारता येत नाही, त्यामागे काय कारणं आहेत समजून घ्या.

Asim Munir : हाथ को आया मुँह न लगा, CDF पदाच्या बाबतीत असीम मुनीर यांच्यासोबत पाकिस्तानात असच घडू शकतं, शरीफ बंधूच गेम करणार का?
Pakistan Politics
| Updated on: Dec 02, 2025 | 2:21 PM
Share

पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना झटका बसला आहे. 29 नोव्हेंबरची डेडलाइन उलटून गेली आहे. मात्र, अजूनही चीफ ऑफ डिफेंस फोर्सेज (CDF) संबंधी कोणतही नोटिफिकेशन जारी केलेलं नाही. त्यामुळेच असीम मुनीर सध्या कुठल्या पदावर आहेत, या बद्दल स्पष्टता नाहीय. 29 नोव्हेंबरच्या रात्री चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) म्हणून त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यानंतर असीम मुनीर यांची CDF पदावर नियुक्ती होणार होती. पण त्यासाठी अजूनही पब्लिक नोटिफिकेशन जारी झालेलं नाही. आर्मी चीफ फिल्ड मार्शल असीम मुनीरला नव्या आणि अतिरिक्त पद चीफ ऑफ़ डिफेन्स फोर्सेजची (CDF) जबाबदारी दिली जाईल. त्यांच्या कार्यकाळात सुद्धा बदल होईल. 29 नोव्हेंबरला त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. अजूनपर्यंत शरीफ सरकारने त्यांच्या CDF पदाबद्दल कोणतही नोटिफिकेशन जारी केलेलं नाही. असीम मुनीर यांच्या कार्यकाळातच 1971 युद्धानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानला धोपटलं.

पाकिस्तानातील शहबाज शरीफ सरकारने अलीकडे संविधानात दुरुस्ती करुन या CDF पदाची घोषणा केली. या संशोधनानंतर असं म्हटलं जातय की, असीम मुनीर यांची ताकद वाढेल. पण आता नियुक्तीला विलंब होत असल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. संविधानात सुधारणा करुन चेअरमॅन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या जागी CDF पद बनवण्यात आलं आहे. 27 नोव्हेंबरला को चेअरमॅन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ पदावरुन जनरल साहिर शमशाद मिर्जा रिटायर झाले. आता एकच प्रश्न आहे कधी फिल्ड मार्शल असीम मुनीरची नव्या CDF पदावर वर्णी कधी लागणार?.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री काय म्हणाले?

अजूनपर्यंत असीम मुनीर यांची CDF पदावर नियुक्ती न झाल्याने प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सुरु झालेल्या या टीकेवर प्रतिक्रिया दिली. चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (CDF) नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाल्याच त्यांनी सांगितलं. सोशल मिडिया साईटवर त्यांनी सांगितलं की, नोटिफिकेशन जारी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

आता सर्वकाही शहबाज शरीफ यांच्या हातात

पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या यूनायटेड किंगडममध्ये आहेत. ख्वाजा आसिफ म्हणाले की, पंतप्रधान शहबाज शरीफ लवकरच मायदेशी परततील व CDF बाबत नोटिफिकेशन योग्यवेळी जारी केलं जाईल.पंतप्रधान शहबाज शरीफ लंडनवरुन परतल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेजसाठी एक फॉर्मल कमांड सोहळा होऊ शकतो. या आयोजनाच्यावेळी बहुप्रतिक्षित नोटिफिकेशन अधिकृतरित्या सार्वजनिक होईल अशी अपेक्षा आहे.

27 वं संविधान संशोधन काय आहे?

27 व्या संविधान संशोधनानंतर पाकिस्तानी सैन्य प्रमुख तिथल्या सैन्य रचनेत सर्वात वर असेल. त्याच्याकडे तिन्ही सैन्य दल आणि नॅशनल स्ट्रॅटेजिक कमांडचा कंट्रोल असेल. जाणकाराचं म्हणणं असं आहे की, नोटिफिकेशनला विलंब एक टेक्निकल कारण आहे. नियुक्तीला कुठलाही धोका नाही.

सैन्य बजेटमध्ये महत्वाची भूमिका

पाकिस्तानात सध्या CDF अस्तित्वात नाहीय. पण संरक्षण बजेटमध्ये CDF ची भूमिका महत्वाची असेल. सैन्य, एअरफोर्स आणि नौदलाच्या बजेट समन्वयात CDF ची भूमिका महत्वाची असेल.

पद द्यायला टाळाटाळ करण्यामागे काय कारण?

पाकिस्तानात 27 व्या संविधान संशोधनातंर्गत CDF पद बनवण्यात आलं आहे. नॅशनल स्ट्रॅटजिक कमांड म्हणजे NSC ची स्थापना. पाकिस्तानची अणवस्त्र आणि मिसाइल सिस्टिमच नियंत्रण CDF च्या हातात येईल. सध्या हे नियंत्रण नॅशनल कमांड अथॉरिटी म्हणजे NCA कडे आहे. त्याचे अध्यक्ष पंतप्रधान आहेत. आता NSC कडे अणवस्त्र वापर आणि मिसाइल डागण्याचे अधिकार येतील. म्हणजे पाकिस्तानात अणवस्त्रांच नियंत्रण पूर्णपणे सैन्याच्या हातात जाईल. शहबाज असिम मुनीर यांना हे पद द्यायला टाळाटाळ करतायत, त्यामागे हे सुद्धा एक कारण आहे.

सरकारला आपल्यापेक्षा मोठं बनू देत नाही

पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर तिथे लोकशाही आहे. पण ती डोळ्यात धुळफेक करणारी, जगाला दाखवण्यापुरती नावाला लोकशाही आहे. कारण पाकिस्तानातील महत्वाच्या निर्णयात नेहमीच सैन्याची भूमिका राहिली आहे. पाकिस्तानची लोकशाही कधीच समृद्ध होऊ शकली नाही. तिथे अनेकदा हुकूमशाही आली. हुकूमशाही नंतर पुन्हा लोकशाही असा खेळ तिथे सुरु असतो. पाकिस्तानचा कुठलाही सैन्य प्रमुख तिथल्या सरकारला आपल्यापेक्षा मोठं बनू देत नाही, महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा हस्तक्षेप असतो. असीम मुनीर सुद्धा हीच परंपरा पुढे चालवतोय.

पण असीम मुनीर अपवाद

खरंतर ऑपरेशन सिंदूरच्यावेळी चार दिवसाच्या लढाईत भारताने पाकिस्तानला इतकं धोपटलं की, त्यांना गुडघे टेकायला भाग पाडलं. भारताने हल्ले इतके अचूक आणि खोलवर केले की, पाकिस्तानातून एकही फायटर जेट उडू शकणार नाही अशी त्यांची हालत करुन ठेवली. ही स्थिती पाकिस्तान पुढची काही वर्ष नक्कीच विसरणार नाही. जगाने सुद्धा हे सर्व फोटो पाहिले. दुसरा एखादा सैन्य प्रमुख असता तर त्याने राजीनामा दिला असता. पण असीम मुनीर अपवाद आहे. त्याने उलट स्वत:ला फिल्ड मार्शल ही पदवी लावली. असा हा सैन्य प्रमुख आता CDF बनायला निघाला आहे.

प्यादा म्हणून शरीफ यांना बसवलं आहे

त्या पदाची तो आतुरतेने वाट पाहतोय. कारण CDF बनल्यानंतर त्याच्या हातात पद, पावर दोन्ही येईल. उलट पाकिस्तानात जे कुठलं सरकार असेल, ते त्याच्यासमोर अजून कमजोर होईल. हे शहबाज शरीफ आणि नवाज शरीफ दोघे बंधू ओळखून आहेत. म्हणूनच असीम मुनीरला या पदापासून दूर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मूळात म्हणजे शरीफ सरकार हे लोकशाही पद्धतीने आलेलं नाही. इमरान खान यांना जबरदस्तीने हटवून सैन्याने आपला प्यादा म्हणून शरीफ यांना बसवलं आहे. शरीफ सुद्धा हे जाणून आहेत. उलट असीम मुनीर अजून बळकट होईल.

इमरान खान सर्वात मोठा धोका

त्याशिवाय पाकिस्तानात अशी सुद्धा चर्चा आहे की, इमरान खान यांना पूर्णपणे संपवण्याचा शब्द असीम मुनीरने पूर्ण केलेला नाही, म्हणून शहबाज शरीफ नोटिफिकेशन काढायला टाळाटाळ करतायत. इमरान खान आज जेलमध्ये आहेत. पण त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. उलट अजून वाढलेली आहे. भविष्यात शरीफ बंधुंसाठी इमरान खानच मोठं आव्हान निर्माण करु शकतात. त्यामुळे इमरान खान यांना राजकारणातून पूर्णपणे संपवण्याचं मुनीर यांनी त्यांचं आश्वासन पाळलेलं नाही. म्हणून शहबाज शरीफ टाळाटाळ करतायत अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.