AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडून पाकिस्तानची ‘आयएमएफ’मध्ये पोलखोल, भारताने बेल आउट पॅकेजवर का केले नाही मतदान?

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत आली आहे. पाकिस्तान पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीवर अवलंबून आहे. भारताने या मतदानावर बहिष्कार टाकत महत्वाचा संदेशही दिला आहे. त्यात आयएमएफसारख्या संस्थांनी दिलेल्या या मदतीमुळे प्रादेशिक सुरक्षेला धोका निर्माण होतो.

भारताकडून पाकिस्तानची 'आयएमएफ'मध्ये पोलखोल, भारताने बेल आउट पॅकेजवर का केले नाही मतदान?
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला कर्ज मंजूर केले
| Updated on: May 10, 2025 | 8:44 AM
Share

भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 1 बिलियन डॉलरचे कर्ज दिले. परंतु यासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत भारत मतदान करु शकला नाही. मात्र, भारताने आयएमएफसमोर पाकिस्तानची पोलखोल केली आहे. यापूर्वी पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा उपयोग पाकिस्ताने योग्य पद्धतीने केला नाही. हा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा आरोप भारताने केला. भारताच्या तीव्र विरोधानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला कर्ज मंजूर केले.

9 मे रोजी वॉशिंग्टनमध्ये आयएमएफ बोर्डाची बैठक झाली. त्या बैठकीत पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटी पूर्ण केल्या गेल्या नसल्याचे भारताने सांगितले. त्यासाठी भारताने आयएमएफचा रिपोर्टचा आधार घेतला. वारंवार बेलआउट पॅकेज घेतल्यानंतर पाकिस्तानवर कर्जाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्यानंतरही आयएमएफ पाकिस्तानला कर्ज देत आहे. आयएमएफकडून मिळालेल्या या कर्जाचा वापर पाकिस्तानकडून योग्य पद्धतीने केला गेला नाही. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांसाठी त्या कर्जाचा वापर केला गेला आहे. आयएमएफकडून मिळालेल्या या मदतीमुळे पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांना पाठिंबा मिळत आहे.

आयएमएफमध्ये निर्णय सहसा एकमताने घेतले जातात. परंतु जेव्हा मतदान होते, तेव्हा नाही म्हणून मतदान करण्याचा पर्याय नसतो. सदस्य देश फक्त समर्थनार्थ मतदान करू शकतात किंवा मतदानापासून दूर राहू शकतात. भारताने बेलआउट पॅकेजला उघडपणे विरोध केला. परंतु होकार नसल्याने नियमांनुसार भारत मतदानापासून दूर राहिला. भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील आपले कार्यकारी संचालक कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांना नियोजित कालावधीच्या सहा महिने आधी परत बोलावले होते. यामुळे भारत सध्या आयएमएफमध्ये मतदान करण्याच्या स्थितीत नव्हता.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत आली आहे. पाकिस्तान पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीवर अवलंबून आहे. भारताने या मतदानावर बहिष्कार टाकत महत्वाचा संदेशही दिला आहे. त्यात आयएमएफसारख्या संस्थांनी दिलेल्या या मदतीमुळे प्रादेशिक सुरक्षेला धोका निर्माण होतो. मतदान न करता भारताने जगाला आपला संदेश दिला आहे.

हे ही वाचा…

कंगाल पाकिस्तानला दिलासा, भारताच्या विरोधानंतरही ‘आयएमएफ’कडून एक अब्ज डॉलरचे कर्ज

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.