या देशाचे मुसलमान कट्टर शत्रू, तरी आपल्या सैन्याला का शिकवतोय इस्लामी भाषा?
इस्रायली सैन्याने त्यांच्या गुप्तचर विभागातील सैनिक आणि अधिकाऱ्यांना आता इस्लामिक आणि अरबी भाषा शिकणे अनिवार्य केले आहे. पुढील वर्षापर्यंत सर्व सैनिकांना प्रशिक्षण दिले जाईल असे लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

साल २०२३ मध्ये ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलीची क्षेपणास्र प्रणाली भेदून मोठा हल्ला झाला. त्याचा अंदाज इस्रायलच्या गुपचर विभागास आला नाही. त्यानंतर इस्रायलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर इस्रायलने तिच्या गुप्तचर विभागाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यातील कमतरता दूर करण्यासाठी इस्रायलने पावले उचलली आहेत.
इस्राईलची मिलिट्री इंटेलिजन्स डायरेक्टोरेटने ( ज्यास AMAN म्हटले जाते ) ठरवले आहे की त्यांच्या प्रत्येक सदस्यांना इस्लामी आणि अरबी भाषा आली पाहीजे. याचा हेतू शत्रूचा विचार, भाषा, बोलचाल आणि सांस्कृतिक संकेत चांगल्या प्रकारे ओळखता आले पाहीजेत.
जवानांना अभ्यास करावा लागणार
आता इस्रायलच्या मिलिट्री इंटेलिजन्स डायरेक्टोरेटचे सर्व लोक इस्लाम धर्माची पायाभूत गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. याच बरोबर अर्ध्या जवानांना अरबी भाषा शिकवली जाणार आहे. हे प्रशिक्षण एक वर्षभरात पूर्ण केले जाणार आहे. म्हणजे आता केवळ बंदूक चालवणे नव्हे तर दुश्मन देशाची भाषा आणि विचार समजणे देखील गरजेचे झाले आहे.
अनेकदा गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांना कोणत्याही संभाषणाचा आणि संदेशाचा अर्थ समजण्यात अडचणी निर्माण होत असतात. खासकरुन अरबी भाषेत कोणी वक्तव्य करीत असेल तर अरबी भाषेतील अनेक बोलींमध्ये फरक आहे. त्यामुळे अधिकारी आणि जवानांना गुप्त माहिती गोळा करताना अडचणी येत आहेत.
का शिकणार अरबी भाषा?
अरबी भाषा एकाच प्रकारे बोलली जात नाही. प्रत्येक देशात तिचा प्रकार वेगळा आहे. उदा. येमेन, इराक आणि लेबनॉन येथे बोलली जाणारी अरबी वेगवेगळी आहे. इस्रायली सैन्य अधिकाऱ्यांना केवळ हुती ( येमेनचा एक गट ) आणि इराकी बोली भाषा समजताना प्रचंड अडचणी येतात.येमेनचे लोक ‘कात’नावाचे वनस्पती खातात त्याने हलकी नशा येते. याचा प्रभाव त्यांच्या बोलीवरही पडतो. त्यामुळे त्यांची भाषा समजणे अवघड होते. यामुळेच आता इस्रायली सैन्य अधिकारी या खास बोलींवर लक्ष ठेवत आहेत. त्यामुळे शत्रूची प्रत्येक गोष्ट सजण्यास सोपे व्हावे.
इस्रायलचे काय म्हणणे ?
AMAN च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इस्रायली रेडीओशी बोलताना सांगितले की आतापर्यंत ते भाषा, संस्कृती आणि इस्लामशी संबंधीत गोष्टींमध्ये कमजोर राहिले आहेत. ते म्हणाले की आम्ही आमच्या जवानांना असे बनवू शकत नाही की ते कोणा अरब गावात जन्मले आहेत. परंतू त्यांना जर योग्य प्रशिक्षण दिले तर ते शत्रूंच्या प्रत्येक हालचालींना अचूक समजू शकतील.
इस्रायली सैन्याने केवळ आपल्या जवानांना नव्हे तर देशातील शाळांमध्येही अरबी भाषा आणि इस्लामच्या अभ्यासाला महत्व देण्यास सुरु केले आहे. आधी TELEM नावाचा विभाग शाळांमध्ये मध्य पूर्वेचे शिक्षण द्यायचा, परंतू बजेटच्या कमतरतेने हा विभाग बंद झाला होता. त्यामुळे अरबी शिकणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली होती. आता या विभागाला पुन्हा सक्रीय करण्यात आले आहे. याचा हेतू येणाऱ्या पिढीलाही आधीच तयार करण्याचा आहे.
