AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेला मागे टाकणार भारत, २०३८ पर्यंत बनणार दुसरी मोठी अर्थव्यवस्था?, E&Y चा अहवालात दावा

अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला असला तरी त्याचा मोठा परिणाम भारतावर होणार नाही. भारताची अर्थव्यवस्था जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असा अहवाल E&Y ने दिला आहे.

अमेरिकेला मागे टाकणार भारत, २०३८ पर्यंत बनणार दुसरी मोठी अर्थव्यवस्था?, E&Y चा अहवालात दावा
INDIA GDP
| Updated on: Aug 28, 2025 | 10:41 PM
Share

सध्या भारत आणि अमेरिकेत टॅरिफचा वाद सुरु आहे.राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आहे. ज्यामुळे भारतातील अनेक सेक्टरवर वाईट परिणाम होणार आहे. याशिवाय भारताची जीडीपीच्या वाढीवर देखील याचा परिणाम होणार आहे. आता अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि भारत जगाची चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे. याच कारणाने अमेरिका आपली मनमानी केली आहे. परंतू E&Y च्या एका अहवालाने असा दावा केला आहे की भारत अमेरिकेला मागे टाकून दुसरी अर्थव्यवस्था बनू शकतो.

३४.२ ट्रीलियन डॉलरची अर्थव्यवस्था

भारताचा अर्थव्यवस्था २०३० पर्यंत २०.७ ट्रीलियन डॉलरपर्यंत ( PPP च्या आधारे ) पोहचू शकते. तसेच २०३८ पर्यंत ही ३४.२ ट्रीलियन डॉलरपर्यंत पोहचून जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवरही भारताच्या मजबूत घरगुती मागणी आणि आधुनिक तांत्रिक क्षमतेमुळे हे घडू शकते. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की जर भारताने काही आवश्यक पावले उचलली तर ५० टक्के टॅरिफचा प्रभाव खूपच कमी होऊ शकतो.

२०३० पर्यंत २०.७ ट्रीलियन डॉलरची अर्थव्यवस्था

E&Y रिपोर्टच्या मते भारताची अर्थव्यवस्था साल २०३० पर्यंत खरेदी शक्तीची समानता म्हणजे PPP आधारवर २०.७ ट्रीलियन डॉलरपर्यंत पोहचू शकते. हा अंदाज भारताचा उच्च बचत दर, गुंतवणूक क्षमता आणि अनुकूल लोकसंख्या ( Favourable demographics ) वर आधारित आहे.

अमेरिकेला मागे टाकू शकतो भारत

जर भारत आणि अमेरिका अनुक्रमे ६.५ आणि २.१ टक्के सरासरी विकास दर कायम ठेवला तर साल २०३८ पर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकू शकतो. PPP आधारावर भारतचा GDP ३४.२ ट्रीलियन डॉलरपर्यंत जाऊ शकतो. आणि ज्यामुळे चीन नंतर भारत जगातला दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो

टॅरिफचा परिणाम कमी करण्याची क्षमता

या अहवालात म्हटले आहे की अमेरिकेद्वारे भारतावर लावलेल्या सर्वाधिक टॅरिफमुळे सुमारे ०.९ टक्के जीडीपी प्रभावीत होऊ शकते. परंतू योग्य धोरणात्मक निर्णय घेतले तर याचा परिणाम केवळ ०.१ टक्क्यांपर्यंत मर्यादिक केला जाऊ शकतो. याचा अर्थ भारताचा अंदाजित ६.५ टक्के विकास दर ६.४ टक्क्यांपर्यंत राहू शकतो.

२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न

E&Y इंडियाचे चीफ पॉलिसी एडवाइजर डी.के. श्रीवास्तव यांनी सांगितले की भारत सर्वात मोठी ताकद तरुण आणि स्कील वर्क फोर्स आहे. मजबूत गुंतवणूक दर आणि टीकाऊ आर्थिक स्थितीच्या दमावर भारत हाय ग्रोथ रेट कायम ठेवू शकतो. सोबत नवीन तंत्रज्ञान क्षमता वाढवून भारत २०४७ पर्यंत विकसित भारताच्या ध्यैयाच्या जवळ पोहचू शकतो.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.