निकोलस मादुरो सुटणार? अमेरिकेतील मोठी घाडमोड काय? कोर्टात घडलं काय?
Nicolas Maduro US Court: व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना आरोपीसारखं पकडून अमेरिकेत आणण्यात आले. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग, नार्को आणि दहशतवादाचा आरोप लावण्यात आला आहे. पण तितक्यात अजून एक मोठी बातमी आली आहे. ज्युलियन असांजे यांचे वकील बॅरी पोलक हे मादुरो यांचे वकील असतील.

Venezuela President Nicolas Maduro: अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर व्हेनेझुएलचा राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना सोमवारी 5 जानेवारी 2026 रोजी न्यूयॉर्क येथील फेडरल कोर्टासमोर हजर करण्यात आले. पहिल्या सुनावणीवेळी त्यांच्यावर ड्रग्स तस्करी, नार्को,दहशतवाद वाढवणे, मनी लाँड्रिंग यासारखे गंभीर आरोप लावण्यात आले. मादुरो यांना कोर्टात हजर केल्यानंतर राजकीय हालचाल आणि कुटनीती वाढली आहे. तर अमेरिकेतील बडे वकील बॅरी जे पोलक हे मादुरो यांची बाजू मांडण्यासाठी कोर्टात हजर झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हेरगिरी प्रकरण आणि विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना अमेरिकेतील कायदेशीर कचाट्यातून सहीसलामत काढण्याचे कसब बॅरी पोलक यांनी केले. त्यामुळे आता मादुरो यांच्या प्रकरणात ही चमत्कार घडण्याचा आशावाद त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. बॅरी पोलक यांची वॉशिंगटन येथे लॉ फर्म Harris St. Laurent & Wechsler मध्ये सहभागीदार आहेत. तर राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय कायदे आणि हाय प्रोफाईल प्रकारणात ते निष्णात कायदेपंडित म्हणून ओळखले जातात.
तीन दशकांपेक्षा अधिकचा कायदेशीर अनुभव
बॅरी पोलक हे गेल्या तीन दशकांपासून कायदा क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांनी अनेक कॉर्पोरेट दिग्गज, राजकीय नेते आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणातील अनेक आरोपींना सहज वाचवले आहे. त्यांच्या तडफदार स्वभाव, कायद्यावर घासून मांडलेला युक्तीवाद आणि त्यासाठी पुराव्यांचा भक्कम पाठिंबा आणि कायद्याचा काथ्याकूट यामुळे ते असामान्य ठरतात. त्यांनी सर्वात चर्चित मार्टिन टँकलेफ याची शिक्षा पालटवण्यात मोठी भूमिका निभावली होती. टँकलेफ हा 17 वर्षांपासून तुरुंगात खितपत पडलेला होता. पण त्याला निर्दोष सोडवण्यात पोलक यांची सर्वात प्रमुख भूमिका होती. आता हेच पोलक मादरो यांचे वकील आहेत.
मादुरो यांच्या पत्नीचा वेगळा वकील
कोर्टातील कागदपत्रांनुसार निकोलस मादुरो यांची पत्नी सीलिया फ्लोरेस यांची बाजू मांडण्यासाठी पोलक यांच्याऐवजी दुसरा वकील लावण्यात आला आहे. मार्क ई. डोनेली हे त्यांच्यावतीने न्यायालयात हजर झाले. विशेष म्हणजे डोनेली हे अमेरिकेच्या न्याय विभागाचे वकील राहिलेले आहेत. डोनेली यांनी कोर्टात याविषयीची माहिती दिली.
मी तर निर्दोष-मादुरो
जवळपास 30 मिनिटं युक्तीवाद चालला. त्यावेळी निकोलस मादुरो यांनी न्यायालयात सांगितले की मी निर्दोष आहे. आपण एक देशाचे राष्ट्रपती असताना जबरदस्ती अमेरिकेत आणण्यात आले. एका देशाच्या राष्ट्रपतीचे हे अपहरण आहे. तर आपल्यावर जे काही आरोप लावण्यात आले आहे. त्याच्याशी आपला काहीही एक संबंध नाही. तर त्यांच्या पत्नी सीलिया फ्लॉरेन्स यांनी सुद्धा न्यायालयात आपण निर्दोष असल्याचा दावा केला.
तीन महिने मादुरो पत्नीसह तुरुंगात
दरम्यान अमेरिकेच्या जिल्हा न्यायाधीश एल्विन हेलेरस्टीन यांच्या कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 17 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत मादुरो यांना पत्नीसह तुरुंगात काढवे लागतील. तर याप्रकरणावरून रशिया, चीन आणि उत्तर कोरियाने अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मंचावर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
