व्हेनेझुएलानंतर इराणवर हल्ला? डोनाल्ड ट्रम्प यांच्या तो खतरनाक प्लॅन, खोमेनींचा अगोदरच मोठा इशारा
America Attack on Iran after Venezuela: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हल्ला करताच दुसरीकडं इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी सजग झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून इराणमध्ये Gen Z चीं आंदोलनं पेटलेलं आहे. त्यामागे ट्रम्प असल्याचा त्यांचा दावा आहे. आता त्यांनी ट्रम्प यांना असं शिंगांवर घेतलं आहे.

Ayatollah Khomeini Big Waring: व्हेनेझुएलावर अमेरिकेने जसा हल्ला केला तो एखाद्या युद्धपटासारखा आहे. गेल्या अनेक दशकांपासून व्हेनेझुएला आणि दक्षिण अमेरिकेतील देश अमेरिकेविरोधात तंबू ठोकून आहेत. क्युबावर हल्ला करून मागे अमेरिकेचे हात पोळले होते. पण यावेळी पहिल्यांदाच अमेरिकेने मोठे धाडस केले आहे. अमेरिकेचे हेलिकॉप्टर व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये घुसले. त्यांनी राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला उचलून आणले. ट्रम यांनी या कारवाईनंतर अमेरिकी लष्करावर कौतुकाचा वर्षाव केला. तिकडे कोलंबियावर कारवाईची भीती असतानाच अमेरिका इराणवर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या इराणमध्ये Gen Z रस्त्यावर उतरली आहे. 50 हून अधिक शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यामागे ट्रम्प असल्याचा दावा इराणने केला आहे. तर आता सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेला आगाऊ इशारा दिला आहे. त्यामुळे मध्य-पूर्वेत काहीतरी शिजत आहे हे नक्की.
इराणवर अमेरिकेची स्ट्राईक?
आता व्हेनेझुएलनानंतर अमेरिका इराणवर हल्ला करणार का? असा सवाल केल्या जात आहे. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांनी व्हेनेझुएलावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. दक्षिण अमेरिकेतील देशांचे सार्वभौमत्व आणि एकजुटता याचे अमेरिकेने उल्लंघन केले आहे. अमेरिकेने संयुक्त राष्ट्र चार्टरच्या मुळ सिद्धांताला हरताळ फासल्याचा आरोप इराणने केला आहे. इराणने या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेला संयुक्त राष्ट्र संघाचे कलम 2(4) ची आठवण करून दिली आहे. या कलमानुसार, असा बळपूर्वक केलेला हल्ला जागतिक शांततेसाठी घातक असल्याचा आरोप इराणने केला आहे.
खोमेनीने दिला ट्रम्प यांना इशारा
अमेरिका त्यांच्या सरकारवर खोटे दावे थोपवत आहे. शत्रूची ही चाल खपवून घेऊ नका. असे खोटे दावे करणाऱ्या शत्रूविरोधात एकजुटतेने उभे ठाका. आम्ही त्यांच्यासमोर अजिबात झुकणार नाही. देवाचा विश्वास आणि लोकांचे समर्थन याच्या जोरावर शत्रूला आम्ही गुडघ्यावर टेकवू असा इशारा खोमेनी यांनी दिला. गेल्यावेळी दहा दिवस दोन्ही देशातील संघर्ष दिसून आला. इस्त्रायल आणि इराण संघर्षात अमेरिकेने मध्यस्थी करत इराणला माघार घेण्यासाठी लष्करी तळावर हल्ला चढवला होता. विशेष म्हणजे या हल्ल्यासाठी आखाती देशातील लष्करी तळांचा वापर झाला होता. त्यामुळे अमेरिका पुन्हा हल्ला करण्याची भीती इराणला सतावत आहे. येत्या दिवसात आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
