AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराण-इस्रायल युद्धात आणखी एका बलाढ्य देशाची उडी, अमेरिकेला दिला थेट इशारा; आता महायुद्ध…

अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरोधात आता आणखी एका देशाने दंड थोपटले आहे. हा देश अधिकृतरित्या युद्धात उतरला आहे.

मोठी बातमी! इराण-इस्रायल युद्धात आणखी एका बलाढ्य देशाची उडी, अमेरिकेला दिला थेट इशारा; आता महायुद्ध...
benjamin netanyahu and ayatollah ali khamenei tv9
| Updated on: Jun 23, 2025 | 6:01 PM
Share

Iran Israel War Update : इराण आणि इस्रायल यांच्यात मोठं युद्ध चालू आहे. या युद्धात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. त्यामुळे इराण आता इस्रायल आणि इमेरिका अशा दोन्ही देशांना तोंड देत आहे. इराणने रशियाकडे मदत मागितली होती. मात्र रशियाने आता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. असे असतानाच आता रशियाने जरी मदत करण्यास नकार दिलेला असला तरी एका महत्त्वाच्या देशाने इराणसोबत युद्धात उतरण्याचं ठरवलं आहे. येमेन या देशाने आम्ही इराणसोबत युद्धात सहभागी होत असल्याचं म्हटलं आहे.

महायुद्धाचे ढग आणखी गडद

यमनच्या लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सरीअ यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. यमनच्या या घोषणेनंतर आता तिसऱ्या महायुद्धाचे ढग आणखी दाट झाले आहेत.

येमेन हा देश आता अधिकृतरित्या…

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाला 13 जून रोजी सुरुवात झाली. या युद्धात आता येमेन हा देशही अधिकृतरीत्या सहभागी झाला आहे. ब्रिगेडियर जनरल याह्या सरीअ यांनीच तशी माहिती दिली आहे. “येमेन हा देश आता अधिकृतरित्या अमेरिका आणि इस्रायल यांच्याविरोधातील युद्धात सामील झाला आहे. तुमच्या जहाजांना आमच्या सागरी सीमांपासून दूर ठेवा,” असा इशाराच सरीआ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलाय.

अमेरिकेने केले होते इराणवर हल्ले

अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर येमेन देशाने ही अधिकृत भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने मीडनाईट हॅमर या ऑपरेशनअंतर्गत इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांत फोर्दो, इस्फान, नतांज या भागातील आण्विक केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं होतं. याशिवाय इस्रायली सेनेनेही फोर्दो आण्विक केंद्रावर हवाई हल्ले केले होते.

आमच्या सागरी सीमांपासून दूर राहा, अन्यथा…

अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांची जोडी धोकादायक आहे, असं येमेनने म्हटलंय. अमेरिकेचे समर्थन मिळवून इस्रायल अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही याच्या विरोधात आहोत. तसेच आम्ही सूचना देतोय की आमच्या सागरी सीमांपासून दूर राहा. अन्यथा याचे परिणाम वाईट होतील, असं येमेननं म्हटलं आहे. या देशाने गाझा, लेबनॉन, सिरिया तसेच अन्य इस्लामी देशांवर इस्रायलकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांचाही निषेध केला आहे.

दरम्यान, आता येमेनने या युद्धात उडी घेतल्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेपुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे आता या युद्धात आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.