AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद या 10 विचारांमध्ये; महात्मा गांधींनी सांगितलेलं शाश्वत सत्य काय?

महात्मा गांधींच्या विचारांमध्ये कोणत्याही व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद आहे. 30 जानेवारी 1948 ला गांधीजींनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. जाणून घेऊ गांधीजींचे दहा विचारांबद्दल जे प्रत्येकाने आवर्जून वाचले पाहिजे.

तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद या 10 विचारांमध्ये; महात्मा गांधींनी सांगितलेलं शाश्वत सत्य काय?
Mahatma gandhiImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 30, 2025 | 2:48 PM
Share

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना कोण ओळखत नाही? भारत देशातील प्रत्येकाला त्यांचे नाव माहिती आहे. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींनी या जगाचा निरोप घेतला त्यांना नथुराम गोडसेने गोळ्या घातल्या. महात्मा गांधींनी देशाला नेहमीच अहिंसेचा मार्ग दाखवला पण ते स्वतः हिंसेचे बळी ठरले. साबरमतीचे महात्मा गांधी हे राम म्हणत या जगातून कायमचे निघून गेले. अर्थात गांधीजी आज आपल्यात नसतील पण त्यांचे विचार हे अजरामर आहे. त्यांचे शब्द आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. जाणून घेऊ गांधीजींचे 10 विचार जे त्यांचे जीवन आणि विचारधारा स्पष्ट करतात.

महात्मा गांधींचे दहा अनमोल विचार

अहिंसा : गांधीजींचे सर्वात मोठे तत्त्व अहिंसा होते. हिंसाचाराने कोणतीही समस्या सुटू शकत नाही असा त्यांचा विश्वास होता त्यांनी नेहमीच अहिंसेचे पालन केले.

सत्य : महात्मा गांधींनी सत्याला आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आदर्श मानला आहे. सत्याच्या सामर्थ्याने कोणालाही पराभूत केले जाऊ शकते यावर त्यांचा विश्वास होता.

उच्च विचार : गांधीजींच्या मते आपल्या विचारांचा आपल्या कृतीवर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे नेहमी चांगले आणि सकारात्मक विचार अंगीकारले पाहिजेत.

सेवा करणे : आपण जे काही कामे इतरांसाठी करतो तीच खरी सेवा असे गांधीजींचे मत होते. जेव्हा आपण आपल्या चांगल्या कृतीतून इतरांचे चांगले करतो तेव्हा आपण स्वतः चांगले बनतो.

समानतेची भावना : गांधीजींनी समाजातील जातीवाद भेदभाव विरुद्ध लढा दिला. त्यांनी ‘अस्पृश्यांच्या’ हक्कासाठी आवाज उठवला. तसेच त्यांना हरिजन म्हणजेच देवांचे लोक म्हणून संबोधन त्यांचा गौरव केला.

सामान्य जीवन : गांधीजींचे जीवन अत्यंत साधे होते. स्वच्छता, सत्य आणि अहिंसा ही तत्वे त्यांनी जीवनात अंगीकारली होती. साधी राहणी उच्च विचारसरणी हा त्यांचा आदर्श होता.

प्रयत्न करत रहा : गांधीजी नेहमी म्हणतात की कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत रहा. तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही सतत मेहनत आणि समर्पणाने काम केले पाहिजे.

स्वतःमध्ये बदल घडवून आणा : गांधीजींचा विश्वास होता की जर आपल्याला बदल घडवून आणायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागेल. जग बदल करायचा असेल तर आपले विचार आणि वर्तन सुधारावे लागेल.

स्वतःचा मार्ग तयार करा :

गांधीजी नेहमी म्हणायचे की स्वतःचा मार्ग स्वतः निवडा. दुसऱ्याच्या मार्गावर जाण्यापेक्षा आपल्या आत्म्याचा आवाज ऐकून स्वतःचा मार्ग ठरवणे चांगले.

सर्वांवर प्रेम करा : गांधीजींचा विश्वास होता की प्रेम ही सर्वात मोठी शक्ती आहे. यामुळे जगातील सर्वात मोठे वाद संपुष्टात येऊ शकतात.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.