सूर्याला पृथ्वीच्या 60 पट आकाराचे महाकाय भगदाड; हा परिणाम होणार
जेव्हा सूर्याला एकाच ठिकाणी धरून ठेवणारे चुंबकीय क्षेत्र अचानक फुटते तेव्हा कोरोनल होल तयार होतात. त्यामुळे अंतराच्या ठिकाणी गडद रंगाचे भगदाड तयार होते. म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर प्रतिक्रिया देणारा गरम हेलियम काही काळ त्या ठिकाणापासून दूर जातो. या छिद्रातून नंतर भयानक सुपरफास्ट रेडिएशन बाहेर पडतात.
मुंबई : शास्त्रज्ञांना सूर्यावर एक भलेमोठे भगदाड (Hole on Sun) सापडले आहे. हे सूर्याच्या विषुववृत्तावर असल्याचे सांगितले जात आहे. 2 डिसेंबर 2023 रोजी याचा शोध लागला. पण 24 तासांत ते वेगाने पसरले आणि 8 लाख किलोमीटर रुंद झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याचा अर्थ या रुंदीमध्ये पृथ्वीच्या आकाराचे 60 ग्रह सामावू शकतात. शास्त्रज्ञांच्या मते हे भगदाड तात्पुरते पडलेले आहे. पण त्याची अचानक निर्मिती झाल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. या महाकाय भगदाडातून किरणोत्सर्गाचे भयंकर स्तर बाहेर पडत असल्याचेही सांगितल्या जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ते वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. या भगदाडाला कोरोनल होल म्हणतात. 24 तास विस्तारल्यानंतर या छिद्राची दिशा पुढील 24 तासांत म्हणजेच 4 डिसेंबर रोजी पृथ्वीकडे वळली. म्हणजेच या भगदाडाची दिशा थेट पृथ्वीच्या दिशेने आहे.
असे भगदाड तयार होण्यामागे नेमके काय कारण असते?
जेव्हा सूर्याला एकाच ठिकाणी धरून ठेवणारे चुंबकीय क्षेत्र अचानक फुटते तेव्हा कोरोनल होल तयार होतात. त्यामुळे अंतराच्या ठिकाणी गडद रंगाचे भगदाड तयार होते. म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर प्रतिक्रिया देणारा गरम हेलियम काही काळ त्या ठिकाणापासून दूर जातो. या छिद्रातून नंतर भयानक सुपरफास्ट रेडिएशन बाहेर पडतात. या छिद्रातून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग हा सौर वाऱ्यापेक्षा अधिक शक्तिशाली असतो.
ते सूर्याच्या चमकदार पृष्ठभागावर काळ्या डागांसारखे दिसतात. ज्याला सनस्पॉट्स म्हणतात. परंतु आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यांना पाहण्यासाठी अतिनील प्रकाशाचा अवलंब करावा लागतो. या गडद ठिपक्यांतून निघणारे रेडिएशन सामान्य सौर वाऱ्यापेक्षा कितीतरी पटीने वेगाने फिरतात.
अशाप्रकारे होवू शकतो पृथ्वीचा अंत
सूर्य पृथ्वीला गिळंकृत करेल असं भाकित अनेक शास्त्रज्ञांनी केले आहे, पण हे घडण्याआधी आपल्या या सुंदर ग्रहावरून जीवन नाहीसे झालेले असेल. सुमारे 1.3 अब्ज वर्षांनंतर म्हणजेच 130 कोटी वर्षांनंतर पृथ्वी बहुतेक सजीवांसाठी राहाण्या योग्य नसेल. याचे कारण सूर्य असेल. दिवसंदिवस हवामानात होणारा बदल यामागचे कारण आहे.
पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे मनुष्य. पण तरीही तो या आपत्तीतून स्वतःला वाचवू शकणार नाही. तो स्वत:च्या कृतीने त्याची संपूर्ण प्रजाती नष्ट करेल. येत्या काही शतकांमध्ये तो हे काम करणार आहे. मानवामुळे ज्या प्रकारे हवामान बदल होत आहेत, त्यामुळे श्वास घेण्यायोग्य हवा शिल्लक राहणार नाही. पाणी पिण्यायोग्य राहाणार नाही, असं शास्त्रज्ञ सांगतात.
(सुचना- वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. याच्या तथ्यांबद्दल Tv9 मराठी दावा करत नाही.)