AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकेकाळी मराठ्यांनी भगवा फडकवलेला हा किल्ला आज आहे पाकिस्तानात; नाव माहितीये?

मराठ्यांनी 1757 मध्ये पाकिस्तानातील एक किल्ला मोठ्या जिद्दीने जिंकला होता. सिंधू नदीकाठी वसलेला हा किल्ला मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. या विजयाची कहाणी भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे. आज हा किल्ला पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असला तरी, मराठ्यांचा भगवा त्यावर फडकलेला होता हे इतिहास सांगतो.

एकेकाळी मराठ्यांनी भगवा फडकवलेला हा किल्ला आज आहे पाकिस्तानात;  नाव माहितीये?
| Updated on: Mar 06, 2025 | 3:01 PM
Share

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली स्वराज्य स्थापनेची सुरुवात ही त्यांच्यानंतरही मराठ्यांनी सुरू ठेवली होती.मध्यंतरीच्या काळात मराठा साम्राज्याने काही वाईट घटना देखील अनुभवल्या. पण पुन्हा नव्या जोमाने उभा राहत त्या शूर वीरांनी मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज नेहमी फडकवत ठेवला. पुढे पेशवाईचे युग आले, त्यांनी तर संपूर्ण देशभर मराठा साम्राज्याचा दबदबा निर्माण केला आणि त्यांनी होईल तशी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची सेवा केली. पेशव्यांनी भारताच्या वेगवेगळ्या भागात स्वराज्याचा ध्वज फडकावला होता. एवढंच नाही तर यात पाकिस्तानाचही नाव होतं. तिथला ही एक किल्ला मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता. तो किल्ला म्हणजे ‘अटकेचा किल्‍ला’.

पाकिस्तानातील ‘अटकेचा किल्‍ला’

28 एप्रिल 1757 रोजी रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्‍वात थोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांनी अत्‍यंत खडतर प्रवास करून पाकिस्‍तानात असलेला अटकेला किल्‍ला जिंकला होता. हे शहर पाकव्‍याप्‍त पंजाब प्रांतांतील तालुक्‍याचं ठिकाण. तेथील सिंधूनदीच्या काठावर हा अटकेचा किल्ला वसलेला आहे. पूर्वीच्‍या काळी ही नदी पार करून त्या किल्‍ल्‍यावर पोहोचणं अत्‍यंत अवघड होतं. मात्र शूर मराठ्यांनी जीवाची बाजी लावून हा किल्‍लाही काबिज केला होता.

भारतावर डोळा असलेला अब्दाल मुघल साम्राज्यावर आक्रमण केले होते. अशावेळी मराठ्यांनी मुघलांची मदत करावी असा करार मराठे आणि मुघलांमध्ये झाला होता. त्यानुसार रघुनाथराव पेशव्यांनी मोहीम आखली. यातच मराठ्यांनी आताच्या पाकिस्तानातील अटकेचा किल्ला जिंकला होता.

‘मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले’

हा किल्ला ताब्यात घेणं म्हणजे मराठा इतिहासातीत सुवर्णक्षण होता. कारण केवळ जिद्दीच्या आणि शौर्याच्या आधारे एका अनोळखी प्रदेशात तेथील वातावरणात तग धरून शत्रूला झुकवण्याचं काम आपल्या मराठ्यांनीच केलं. पाकिस्तानातील हा किल्ला जिंकणे म्हणजे इतिहासातील एक महत्त्वाची घटना मानली जाते. ‘मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले’असं म्हटलं जायला लागलं.

मराठ्यांमध्ये आणि मुघलांमध्ये झालेला करार

तेव्हा मराठ्यांमध्ये आणि मुघलांमध्ये एक करारही झाला होता. भारतावर डोळा असलेला अब्दाल मुघल साम्राज्यावर आक्रमण केले होते. अशावेळी मराठ्यांनी मुघलांची मदत करावी असा करार मराठे आणि मुघलांमध्ये झाला होता. त्यानुसार रघुनाथराव पेशव्यांनी मोहीम आखली. यातच मराठ्यांनी आताच्या पाकिस्तानातील अटकेचा किल्ला जिंकला. अकबराने हा किल्ला बांधला होता. त्याचे नाव अटक-बनारस असे ठेवले. 1812 तरणजितसिंहाने या किल्ल्यावर आक्रमण केले होतं. पहिल्या शीख युद्धांत इंग्रजांनी हा किल्ला घेतला होता. परंतु, दुसऱ्या युद्धांत तो त्यांना कायम ठेवता आला नाही. मात्र पुन्हा कालांतराने हा किल्ला पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेला.

पुढे जाऊन इंग्रजांनी 1873 मध्‍ये सिंधुनदीवर रेल्‍वेपूल आणि दुसरा एक रस्ता तयार केला. भारतीय आणि मराठी इतिहासातीत शौर्याचा जिवंत साक्षीदार असलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे. पण कधीकाळी त्यावर भगवी पताका फडकली होती हे सत्य कधीच पुसलं जाणारं नाही.

हा किल्ला आता पर्यंटकांसाठी आकर्षण आहे

हा किल्ला आता पर्यंटकांसाठी आकर्षण आहे. इथे तोफखाना देखील आहे. किल्याच्या समोरच कमालिया व जलालिया नावाच्या काळ्या दगडांच्या कड्यांमध्यें सिंधू नदीच्या पात्रांत भोवरे आहेत. तर नदीच्या वरच्या बाजूस, अटकपासून 16 मैलांवर, ओहिंद येथे होड्यांचा पूल करून अलेक्झांडर नदीपार आला असे म्हणतात. आता हा किल्ला पाकिस्तानच्या सैन्याचं केंद्र आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.