AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DMart : डी-मार्ट खरोखर दाऊदचं आहे का ? त्या ‘D’ चा अर्थ तरी काय ?

डी-मार्ट (DMart) मध्यमवर्गीयांसाठी स्वस्त खरेदीचे ठिकाण बनले आहे. मात्र, याच्याबाबत दाऊद इब्राहिमशी संबंधाची अफवा पसरवली जाते. हे दावे बऱ्याच वेळा केले जातात. मग डी-मार्टचे मालक कोण ? जाणून घ्या सविस्तर

DMart : डी-मार्ट खरोखर दाऊदचं आहे का ? त्या 'D' चा अर्थ तरी काय ?
डी-मार्टचा मालक कोण ?
| Updated on: Aug 04, 2026 | 2:19 PM
Share

स्वस्तात आणि दर्जेदार खरेदीचा विषय निघाला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सर्वात पहिले नाव येतं ते डी-मार्ट (DMart) चं. महिन्याचं राशन असो, किचनमधील रोजच्या वापराच्या वस्तू असोत, कपडे असोत किंवा गृहपयोगी साहित्य – सर्व काही एकाच छताखाली आणि तुलनेने कमी किमतीत उपलब्ध असल्याने डी-मार्टने देशभरातील मध्यमवर्गीय कुटुंबांचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळेच वर्षभर डी-मार्टमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आज भारतातील छोट्या शहरांपासून ते मोठ्या महानगरांपर्यंत डी-मार्टची मजबूत उपस्थिती आहे. स्वस्त दर, मर्यादित पण आवश्यक उत्पादनांची निवड आणि ग्राहककेंद्री धोरण यामुळे डी-मार्टने भारतीय रिटेल क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

डी-मार्टबद्दल अनेक अफवा

मात्र, डी-मार्ट जितकं लोकप्रिय आहे तितक्याच त्याच्याबाबत विविध अफवाही सोशल मीडियावर फिरताना दिसतात. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला दावा म्हणजे, डी-मार्टचा संबंध कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आहे. काहीजण तर “DMart” मधील ‘D’ म्हणजे दाऊदचं ‘D’ असल्याचा दावा करतात. इतकंच नाही तर दाऊद दुबईमधून डी-मार्टचा व्यवसाय चालवतो किंवा कंपनीत त्याची मोठी गुंतवणूक आहे, अशाही चर्चा वेळोवेळी सोशल मीडियावर रंगतात. परंतु या दाव्यांमध्ये खरंच काही तथ्य आहे का? डी-मार्ट आणि दाऊद इब्राहिम यांचा काही संबंध आहे का? यामागचं खरं उत्तर जाणून घेऊया.

डी-मार्टचा दाऊदशी काही संबंध आहे का?

याचं थेट उत्तर म्हणजे नाही. उपलब्ध अधिकृत माहिती आणि सार्वजनिक नोंदींनुसार डी-मार्टचा अंडरवर्ल्ड, दाऊद इब्राहिम किंवा त्याच्या कोणत्याही व्यवसायाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारे असे दावे पूर्णपणे निराधार असून त्याला कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही.

मग डी-मार्टचा मालक कोण?

डी-मार्टची स्थापना देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि गुंतवणूकदार राधाकृष्ण दमाणी यांनी केली आहे. राजस्थानातील बिकानेर येथे 1954 मध्ये जन्मलेल्या दमाणी यांनी सुरुवातीला शेअर बाजारात गुंतवणूक करून स्वतःचं नाव कमावलं. भारतातील सर्वात यशस्वी व्हॅल्यू इन्व्हेस्टर्सपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे, त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेलं नसतानाही व्यवसायातील दूरदृष्टी, संयम आणि योग्य निर्णयक्षमतेच्या जोरावर अब्जावधी रुपयांचं साम्राज्य उभं केलं. त्यांच्या मालकीच्या Avenue Supermarts Ltd. या कंपनीअंतर्गत डी-मार्टची संपूर्ण साखळी चालवली जाते.

2002 मध्ये झाली सुरुवात

राधाकृष्ण दमाणी यांनी 2002 मध्ये डी-मार्टचं पहिलं स्टोअर सुरू केलं. त्यामागचा मुख्य उद्देश होता – ग्राहकांना दर्जेदार वस्तू शक्य तितक्या कमी किमतीत उपलब्ध करून देणं.

गेल्या दोन दशकांत डी-मार्टने भारतीय रिटेल क्षेत्रात वेगाने विस्तार केला. देशभरात शेकडो स्टोअर्स उभारल्यानंतर कंपनीने 2017 मध्ये शेअर बाजारात पदार्पण केलं. विशेष म्हणजे, कंपनीचा आयपीओ प्रचंड यशस्वी ठरला आणि शेअर तब्बल 102 टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध झाला. त्यानंतर डी-मार्ट भारतातील सर्वाधिक यशस्वी आणि नफेखोर रिटेल कंपन्यांपैकी एक बनली.

डी-मार्टमध्ये वस्तू स्वस्त कशा मिळतात?

डी-मार्टच्या यशामागे त्यांचं वेगळं व्यवसाय मॉडेल असल्याचं मानलं जातं. कंपनीने बहुतांश ठिकाणी स्टोअर्ससाठी जागा भाड्याने घेण्याऐवजी ती स्वतः खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दरमहा मोठ्या प्रमाणात भाडे देण्याचा खर्च वाचला. याशिवाय, मोठ्या मॉल्स किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दुकानं उघडण्याऐवजी स्वतंत्र जागांवर स्टोअर्स सुरू करण्यात आली. त्यामुळे मॉलच्या देखभाल शुल्कासह इतर अतिरिक्त खर्चही टाळता आला.

या बचतीचा फायदा कंपनीने थेट ग्राहकांना दिला. कमी ऑपरेटिंग खर्चामुळे अनेक वस्तू तुलनेने कमी दरात विकणे डी-मार्टला शक्य झाले. त्याचबरोबर मर्यादित ब्रँड्स, मोठ्या प्रमाणावर खरेदी, प्रभावी पुरवठा साखळी आणि खर्चावर कठोर नियंत्रण या धोरणांमुळेही कंपनी स्पर्धात्मक दर कायम ठेवू शकली.

डी-मार्टने सुरुवातीपासूनच मध्यम उत्पन्न गटातील ग्राहकांना लक्ष्य केलं. ज्या भागात किंमतीबाबत जागरूक आणि बचतीला महत्त्व देणारे ग्राहक मोठ्या संख्येने राहतात, अशा परिसरांमध्ये स्टोअर्स सुरू करण्यात आली. “कमी किंमत, चांगला दर्जा आणि आवश्यक वस्तू” या सूत्रामुळे डी-मार्ट आज लाखो भारतीय कुटुंबांच्या मासिक खरेदीचा अविभाज्य भाग बनलं आहे.

Follow Us
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात, पुण्यात असं काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...