वाईन, व्हिस्की की रम, यापैकी कोणती दारू असते नॉनव्हेज ? तुम्हाला माहीत आहे का ?
Wine, Whisky or Rum which is Non-Veg : सर्व अल्कोहोलिक ड्रिंक्स अर्थात दारू ही काही व्हेज, म्हणजे शाकाहारी नसतात. काही ड्रिंक्स अशीदेखील असतात ज्यामध्ये जनावरांपासून मिळवलेल्या गोष्टींचा वापर फाइनिंग एजंट म्हणून केला जातो. त्यामुळे हे एजंट ते ड्रिंक नॉनव्हेज अर्थात मांसाहारी बनवतं. पण वाईन, व्हिस्की आणि रम यापैकी कोणतं ड्रिंक हे मांसाहारी असतं, हे तुम्हाला माहीत आहे का ?

बहुतांश लोकांना असं वाटतं की सर्व अल्कोहोलिक पेयं म्हणजेच दारू ही पूर्णपणे शाकाहारी असते.अनेकांचा तसा समज असतो खरा, पण वाईन तज्ज्ञ सोनल हॉलंड यांच्या सांगण्यानुसार, हे सगळं खरं नाही. अल्कोहोलपासून बनवल्या जाणाऱ्या काही ड्रिंक्समध्ये प्राण्यांपासून मिळवलेले पदार्थ वापरले जातात. मग असा प्रश्न उरतो की वाईन, व्हिस्की आणि रम यांच्यापैकी कोणतं ड्रिंक व्हेज आहे आणि कोणतं ड्रिंक नॉनव्हेज कॅटेगरीमध्ये येतं ? चला जाणून घेऊया.
याची सुरूवात आपम वाईनपासून करूया, बऱ्याच लोकांना माहीत असेल की वाईन ही खरंतर द्राक्षांपासून बनवली जाते. द्राक्षांचा रस काढून, तो अनेक प्रक्रियांच्या टप्प्यांतून गेल्यानंतर अखेर त्याची वाईन तयार केली जाते. परंतु वाईन साफ करण्यासाठी अनेक प्रकारचे फायनिंग एजंट वापरले जातात.
वाईन व्हेज असते की नॉनव्हेज ?
अनेक प्रकारची वाईन साफ करण्यासाठी जे फाइनिंग एजेंट्स वापरले जातात, ते जनावरांपासून, प्राण्यांपासून मिळवले जातात. उदाहरणार्थ, आयसिंग्लास – खरंतर हे कोलेजनचं एक असं रूप आहे, जे माशांपासून मिळतं. ते वाईन आणि बिअर साफ करण्यासाठी वापरलं जातं. याशिवाय, प्राण्यांपासून मिळवलेले जिलेटिन देखील त्यासाठी वापरलं जातं.
पण असं असलं तरी अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या व्हिगन वाईन्सही बनवतात, ज्यामध्ये प्लांट बेस्ट मिनरल एंजट्सचा वापर केला जातो. अशा गोष्टींचं ब्रँडिंग कंपनी आपल्या बॉटल्सवर देखील करते. त्यामुळे ड्रिंकच्या बाटलीवर ब्रँडिंग पाहून तुम्ही ते समजू शकता.
व्हिस्कीबद्दल तज्ज्ञांचं म्हणणं काय ?
वाईन एक्सपर्ट सोनम हॉलंड यांच्या सांगण्यानुसार, व्हिस्की ही 100 टक्के शाकाहारी आहे. कारण त्यात प्राण्यांपासून बनवलेले पदार्थ बिलकूल वापरले जात नाहीत. हे पेय व्हेगन फ्रेंडली आहे. व्हिस्की ही कॉर्न, राई आणि बार्लीपासून बनवली जाते. त्यानंतर ती यीस्ट आणि पाण्यासोबत मिसळून फर्मेंट केली जाते. त्यानंतर ती एखाद्या लाकडी बॅरलमध्ये ठेवून बऱ्याच काळासाठी स्टोअर केली जाते किंवा साठवून ठेवली जाते. अशा पद्धतीनेच व्हिस्की तयार होते. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत यामध्ये प्राण्यांपासून मिळणारे काही घटक, गोष्टी वापरल्या जात नाही, म्हणून ती शाकाहारी ठरते.
रमचं काय, ती व्हेज असते की नॉनव्हेज ?
बऱ्याचं जणांना माहीत नसेल पण रम हे पेय उसाच्या रसापासून बनवलं जातं. साधारणपणे, त्यात असे कोणतेही घटक वापरले जात नाहीत जे ते मांसाहारी श्रेणीत येतात. मात्र काही ब्रँड्स हे फिनिशिंग साठी त्यामध्ये जिलेटिन, अंड्याचा पिवळा भाग आणि आयसिंग्लास वापरतात, हे पदार्त प्राण्यांपासून मिळवले जातात. जर तुम्हाला 100 टक्के शाकाहारी रम प्यायची असेल तर त्यासाठी त्याच्या बाटलीवरूल लेबल वाचा. किंवा मग त्या ब्रँडच्या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही त्यातील घटकांची माहिती वाचू शकता, सजमून घेऊ शकता. अल्कोहोल हे कोणत्याही स्वरूपात असो, ते व्हेज असो कि नॉनव्हेज, ते आपल्या शरीरासाठी घातक असतं, हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
