AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात महागडा आणि मॉडर्न एअरपोर्ट अवघ्या तीन वर्षात बंद; कारण ऐकून डोकं खाजवाल

The most expensive and modern airport in the world | तब्बल 1 कोटी प्रवाशांची क्षमता असणारा जगातील सर्वात महागडा आणि मॉडर्न एअरपोर्ट 3 वर्षात बंद..., नक्की झालेलं तरी काय, कारण ऐकून डोकं खाजवाल

जगातील सर्वात महागडा आणि मॉडर्न एअरपोर्ट अवघ्या तीन वर्षात बंद; कारण ऐकून डोकं खाजवाल
Billion Dollar Ghost Airport
| Updated on: Nov 26, 2025 | 1:47 PM
Share

The most expensive and modern airport in the world | जगातील असा एक एअरपोर्ट जो सर्वात मोठा आणि मॉर्डन आहे… तोच बंद पडला… ज्याची तब्बल 1 कोटी प्रवाशांची क्षमता आहे… असा एअरपोर्ट सुरु होताच तीन वर्षात कसा बंद पडला असेल… हा एअरपोर्ट युरोप याठिकाणी आहे. या एअरपोर्टचं नाव रियल सिउदाद एयरपोर्ट (Real Ciudad Airport) असं होतं. त्या विमानतळाची ओळख आता शापित विमानतळ (Billion Dollar Ghost Airport) अशी आहे.

या विमानतळाची स्थापना कधी झाली असा प्रश्न तुम्हाला देखील नक्की पडला असेल. 2009 मध्ये जेव्हा विमानतळाची स्थापना झाली तेव्हा विमानतळ खरोखरच भव्य होता. त्याचा एकूण खर्च जवळपास 11,383 कोटी रुपये होता. परंतु युरोपमधील सर्वात लांब 4.1 किमी धावपट्टी आणि दरवर्षी 1 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असूनही, हा प्रकल्प अयशस्वी झाला.

असं का झालं असेल असा प्रश्न तुम्हाला देखील नक्की पडला असेल… प्रकल्प अयशस्वी होण्याचं नेमकं कारण काय असेल? सांगायचं झालं तर, हे अत्याधुनिक विमानतळ स्पेनची राजधानी माद्रिदपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर बांधण्यात आलं होतं आणि यामुळेच प्रकल्प अयशस्वी ठरला.

रिपोर्टमनुसार, तेथील सरकारने वचन दिलं होतं की, मॅड्रिट येथूल विमानतळापर्यंत एक हाय स्पीड ट्रेन चालवण्यात येईल. यामुळे लोकांना विमानतळावर पोहोचायला एक तास लागेल. पण स्टेशन कधी तयार झालाच नाही… परिणामी, प्रवाशांची संख्या इतकी कमी झाली की विमान कंपन्यांनी देखील माघार घेतली. 2011 मध्ये, शेवटच्या विमान कंपनीने कामकाज बंद केले आणि विमानतळ बंद पडले.

अब्जवधी रुपयांचा या प्रोजेक्टवर तीन वर्षात 3100 कोटींपेक्षा अधिक कर्जबाजारी झाला. जेव्हा ते विकण्याची वेळ आली तेव्हा कोणीही रस दाखवला नाही. नंतर, एका चिनी कंपनीने 11 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी फक्त 10 लाख रुपयांची बोली केली.

रिपोर्टनुसार, दीर्घ कायदेशीर लढाईनंतर, हे विमानतळ 2018 मध्ये त्याच्या किमतीपेक्षा खूपच कमी म्हणजे सुमारे 580 कोटी रुपयांना विकण्यात आलं. पण ते प्रवाशांसाठी नाही तर तुटलेली विमाने दुरुस्त करून त्यांना भंगारात रूपांतरित करण्यासाठी…

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.