AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धार्मिक स्थळांवर आता बिनधास्त प्रसाद खा!; प्रसादाच्या दर्जासाठी दिले जाणार ‘भोग प्रमाणपत्र’

'भोग प्रमाणपत्र'ची वैधता दोन वर्षांसाठी असेल. सध्या या प्रमाणपत्राबाबत सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र महत्वाची मंदिरे, गुरुद्वाऱ तसेच इतर धार्मिक स्थळांना स्वेच्छेने या प्रमाणपत्राचे पालन करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

धार्मिक स्थळांवर आता बिनधास्त प्रसाद खा!; प्रसादाच्या दर्जासाठी दिले जाणार 'भोग प्रमाणपत्र'
धार्मिक स्थळांवर आता बिनधास्त प्रसाद खा!; प्रसादाच्या दर्जासाठी दिले जाणार 'भोग प्रमाणपत्र'
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 15, 2021 | 8:05 AM
Share

नवी दिल्ली : धार्मिक स्थळांमध्ये पूजा-अर्चा केल्यानंतर मिळणाऱ्या प्रसादामुळे प्रकृती बिघडण्याचे प्रकार आता थांबणार आहे. यापुढे भक्त मंडळी धार्मिक स्थळांच्या आवारातील प्रसाद बिनधास्त खाऊ शकतील. प्रसादाचा दर्जा योग्य आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आता सरकार पातळीवर ठोस पावले उचलली गेली आहेत. राजधानी दिल्‍लीमध्ये या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. अर्थात दिल्ली सरकारने याची अंबलबजावणी सुरु केली आहे. दिल्लीतील सर्व प्रमुख धार्मिक संस्थांना भारतीय खाद्य संरक्षण संस्थेकडून ‘बीएचओजी’ ( BHOG ) अर्थात ‘भोग प्रमाणपत्र’ प्राप्त करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भक्त मंडळींना यापुढे दिल्लीतील कोणत्याही धार्मिक स्थळी कुठलीही चिंता न करता प्रसाद किंवा महाप्रसादाचा लाभ घेता येईल. (Eat Bindhast Prasad at religious places now; Bhog certificate to be given for the quality of prasada)

‘भोग प्रमाणपत्र’ नेमके काय आहे?

‘भोग प्रमाणपत्र’ सर्व प्रकारच्या ‘प्रसाद’ आणि ‘महाप्रसाद’साठी लागू असेल. भक्त मंडळींना दिल्या जाणाऱ्या प्रसादाचा दर्जा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रमाणपत्राचा मुद्दा पुढे आला आहे. धार्मिक स्थळी मिळणारे अन्नपदार्थ तसेच प्रसाद कमी दर्जाचे घटक वापरून बनवले जातात, अशा अनेक तक्रारी पुढे आल्यानंतर सरकार पातळीवर प्रसाद आणि महाप्रसादाची गुणवत्ता राखण्याचा विचार झाला आहे. ‘भोग प्रमाणपत्र’ची वैधता दोन वर्षांसाठी असेल. सध्या या प्रमाणपत्राबाबत सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र महत्वाची मंदिरे, गुरुद्वाऱ तसेच इतर धार्मिक स्थळांना स्वेच्छेने या प्रमाणपत्राचे पालन करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

राजधानी दिल्‍लीच्या अक्षरधाम मंदिर आणि साईबाबा मंदिराने आधीच प्रशिक्षण आणि ऑडिट पूर्ण केल्यानंतर हे भोग अर्थात बीएचओजी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. याव्यतिरिक्त अन्य धार्मिक स्थळेही ‘भोग प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाशी बोलणी करीत आहेत.

सरकारच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे मोठे प्रकरण समोर आले तर त्या प्रकरणात राज्याचा संबंधित विभाग त्या धार्मिक स्थळाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांवर आणि व्यवस्थापनावर कारवाई करू शकणार आहे. त्या कारवाईनंतरही सुधारणा दिसून आली नाही, तर प्रमाणपत्र रद्देदेखील केले जाऊ शकते. तसेच पुढीलवेळी अनुपालन अहवाल सादर केल्याशिवाय नव्याने भोग प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

‘भोग प्रमाणपत्र’ कसे मिळेल?

सर्वात आधी ऑडिट केले जाणार आहे. मंदिर किंवा अन्य धार्मिक स्थळ ‘एफएसएसएआय’द्वारा मान्यताप्राप्त त्रयस्थ पार्टीच्या एजन्सीकडून ऑडिट करून घेतात. गुणवत्तेच्या आधारे काही स्टार दिले जातात. त्यानंतर या स्थळांवर खाण्यापिण्याचे पदार्थ बनवणाऱ्या व्यक्तींना विशेष प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण ‘फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन’मार्फत (FoSTaC) दिले जाते. जर पहिल्या ऑडिटमधून समाधानकारक निष्कर्ष पुढे आले नाहीत तर दुसऱ्यांदा ऑडिट केले जाते. त्यानंतर संबंध‍ित ‘फूड सेफ्टी कमिशनर’ अर्थात अन्न सुरक्षा आयुक्तांमार्फत सीईओंना प्रमाणपत्र जारी करण्याची शिफारस केली जाते. त्यानंतर भारतीय खाद्य संरक्षण संस्थेकडून (FSSAI ) प्रशिक्षण आणि ऑडिटच्या अहवालासोबत भोग प्रमाणपत्र जारी करण्यात येते. (Eat Bindhast Prasad at religious places now; Bhog certificate to be given for the quality of prasada)

इतर बातम्या

रात्र झाली तरी पालकांचा शाळेत ठिय्या; महागडी पुस्तके आणि वाढीव फीविरोधात पालक आक्रमक

नशा का करतो म्हणून विचारताच भडकला, विचित्र हावभाव करत छेड काढल्यामुळे महिला पोलिसाने दिला चोप, व्हिडीओ व्हायरल

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?